बीड : रोटरी आणि रोटरी इंटरनॅशनलच्या आर्थिक मदतीतून केलेल्या कार्यातून व्यक्तीची समाजात नव्याने ओळख निर्माण होते, असे प्रतिपादन रोटरी डिस्ट्रिक्ट ३१३२ च्या नवनिर्वाचित प्रांतपाल स्वाती हेतकळ यांनी केले.
रोटरी क्लब बीडच्या पद्ग्रहण समारंभात त्या बोलत होत्या. यावेळी प्रमुख अतिथी म्हणून माजी प्रांतपाल हरिष मोटवाणी उपस्थित होते.
यासाठी प्रत्येक रोटेरियने समाजाला कायम लक्षात राहतील असे काम रोटरीच्या प्रोजेक्टमधून केले पाहिजे. सातारा जिल्ह्यात रोटरी क्लब वाई आणि इतर क्लब आणि रोटरी इंटरनॅशनलच्या आर्थिक मदतीने जवळपास साडेतीन कोटींची समाजाभिमुख कामे करण्यात आम्हाला यश आले आहे आणि या कामामुळे आमची आमच्या गावात नव्याने ओळख निर्माण झाल्याचे स्वाती हेतकळ म्हणाल्या.
यावेळी क्लबचे मावळते अध्यक्ष मुकुंद कदम, सचिव सुनील खंडागळे यांनी नूतन अध्यक्ष गणेश मुळे आणि सचिव विकास उमापूरकर यांना पदभार सोपविला. डॉ. मनोज पोहनेरकर आणि प्रा. सुनील जोशी यांनी सूत्रसंचालन केले. प्रोजेक्ट चेअरमन म्हणून राधेश्याम मुंदडा, संदीप खोड, पंडित खाकरे यांनी काम पाहिले. यावेळी कोविड -१९ च्या सर्व नियमांचे पालन करण्यात आले. या कार्यक्रमास रोटरी परिवारातील मोजके सदस्य उपस्थित होते.
040721\04_2_bed_14_04072021_14.jpeg
रोटरी बीड