शहरं
Join us  
Trending Stories
1
आभाळ फाटले, अतिवृष्टीचा विक्रम! ५३२० गावांतील पिकांचा चिखल; संपूर्ण आठवडा पावसाचा...
2
मराठवाड्यात पुन्हा पावसाचा कहर; पाच जणांचा मृत्यू, धाराशिव, बीड, छत्रपती संभाजीनगरमध्ये जलप्रलय
3
आजचे राशीभविष्य, २३ सप्टेंबर २०२५: विवाहेच्छुकांचे विवाह ठरतील, मित्रांकडून लाभ होईल
4
PAK vs SL Live Streaming : 'करो वा मरो' लढत; पाकचा रेकॉर्ड भारी! पण तरी त्यांना असेल लंकेची धास्ती; कारण...
5
एच-१बी व्हिसाला टक्कर, आता चीनचा के-व्हिसा; कुशल कर्मचाऱ्यांसाठी  चीनने उघडले आपले दार
6
आता तुम्हीच ओपनिंगला जा! IND vs PAK मॅचनंतर इम्रान खान यांचा PCB अध्यक्ष नक्वी यांना 'यॉर्कर'
7
आजपासून ओला, उबरचालक आकारणार सरकारमान्य भाडे; अधिक भाडे घेतल्यास कंपन्यांवर कारवाई होणार
8
कुजबुज! ठाकरे बंधूंसाठी शरद पवारांची माघार? मुख्यमंत्र्यांनाच पडला परिवहन मंत्र्यांचा विसर
9
मराठा आरक्षणावर अन्य खंडपीठासमोर सुनावणी; सरकारचा हा निर्णय गोंधळात टाकणारा, याचिकेत आरोप
10
आयुष्याची जमापुंजी गुंतवली, घराचा ताबा घ्यायला गेले अन् दारातच जीव गेला; मुलुंड शहरातील घटना
11
राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे बंधूंच्या युतीला दिवाळीचा मुहूर्त? अधिक जागा लढवण्याचा मनसेचा आग्रह
12
पावसामुळे शेतकरी हवालदिल! ओला दुष्काळ जाहीर करून सरकारने तत्काळ मदतीचा हात पुढे करावा
13
...आपण इतके बधिर का झालो आहोत?; फरहानची ‘स्टेनगन’- ही दहशतवादी मस्ती ठेचून काढा!
14
लोकशाहीचा गळा घोटण्याचा नवा ‘कायदेशीर’ मार्ग; याला हुकूमशाही म्हणायला हवी
15
India vs West Indies Test Series: गिलच्या संघातून रिषभ पंत 'आउट'; कोण घेणार त्याची जागा?
16
IND vs PAK: "तुम्ही जर पातळी सोडून वागायला लागलात तर बॅटने..."; इरफानने पाकिस्तानला सुनावलं
17
'पोलीस बाजूला ठेवा, दम असेल तर एकदा रणांगणात या'; निलेश लंकेंचा गोपीचंद पडळकरांना जाहीर इशारा
18
‘मला रिकामे ठेवू नका’, मुंडेंच्या विधानावर जरांगेची प्रतिक्रिया; म्हणाले, “रोजगार हमीवर जा”
19
'बेनिफिट ऑफ डाउट' मिळाला असता तर आम्ही जिंकलो असतो; 'त्या' निर्णयावर अख्तरची 'बोलंदाजी'
20
नेपाळमध्ये ‘Gen Z’चे आंदोलन, RSS नेत्यांचे विधान; म्हणाले, “जगात षड्‍यंत्र, हिंदू समाज...”

तरुणाईची भूमिका निर्णायक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 27, 2019 00:22 IST

बीड लोकसभा मतदार संघात होऊ घातलेल्या निवडणुकीत वयाची पन्नाशी ओलांडलेल्या मतदारांच्या तुलनेत नवमतदारांसह १८ ते ४० वयोगटातील मतदारांची संख्या जवळपास दुप्पट आहे.

ठळक मुद्देबीड लोकसभा मतदार संघ : २० लाख २८ हजार ३३९ मतदार बजावणार हक्क

अनिल भंडारी।लोकमत न्यूज नेटवर्कबीड : बीड लोकसभा मतदार संघात होऊ घातलेल्या निवडणुकीत वयाची पन्नाशी ओलांडलेल्या मतदारांच्या तुलनेत नवमतदारांसह १८ ते ४० वयोगटातील मतदारांची संख्या जवळपास दुप्पट आहे. सर्वच राजकीय पक्षांनी आपले लक्ष तरुणांवर केंद्रित केले असले तरी ५० ते ८० वयोगटातील मतदारांची भूमिकाही महत्वाची ठरणार आहे.३१ जानेवारीपर्यंत निवडणूक विभागाकडे नोंदणी केलेल्या आकड्यांनुसार बीड जिल्ह्यात एकूण २० लाख २८ हजार ३३९ मतदार आहेत. यात १० लाख ७३ हजार ५२५ पुरुष तर ९ लाख ५४ हजार ८०७ महिला मतदार आहेत. २०१४ च्या तुलनेत यंदा १ लाख ९६ हजार १८३ मतदार वाढले आहेत. (मतदार नोंदणी कार्यक्रमानुसार यात आणखी काही प्रमाणात भर पडणार आहे.)१८ ते ४९ वयोगटात एकूण १३ लाख ६९ हजार २७ मतदार आहेत. यात ७ लाख ४९ हजार ४४६ पुरुष आणि ६ लाख १९ हजार ५८१ महिला मतदार आहेत. या गटात पुरुष मतदारांची संख्या महिला मतदारांच्या तुलनेत जास्त प्रमाणात आहे. ५० ते ८० वयोगटातील मतदारांची संख्या ६ लाख ५९ हजार ३०५ इतकी आहे. यात पुरुष मतदारांच्या तुलनेत महिला मतदारांची संख्या जवळपास ११ हजाराने जास्त आहे. ८० पेक्षा जास्त वयोगटातील मतदारांची संख्या ७० हजार ३४० इतकी असून पुरुष मतदार ३० हजार ४७१ तर महिला मतदारांची संख्या ३९ हजार ८६९ इतकी आहे.बीड जिल्ह्यात एकूण सात तृतीयपंथी मतदारांची नोंद आहे. २० ते २९ वयोगटात ४ तर ६० ते ६९ वयोगटात २ आणि ३० ते ३९ वयोगटात एका मतदाराचा समावेश असल्याचे सांगण्यात आले.तरुण वर्ग जास्त सक्रियनिवडणुकांमध्ये तरुण वर्ग तुलनेने जास्त सक्रिय असतो. १८ ते ३९ वयोगटातील ९ लाख ४७ हजार ७९५ मतदार या निवडणुकीत आपला कस दाखवणार आहेत. तर ५० ते ८० वयोगटातील मतदारही तितकाच महत्वाचा म्हणजे निर्णायक ठरणार आहे.दिव्यांग मतदारजिल्ह्यात ४ हजार १०० दिव्यांग मतदार आहेत. ५६८ मतदार दृष्टीदोष असलेले आहेत, तर ५९१ मतदार हे मूकबधीर आहेत. शारीरिकदृष्ट्या दिव्यांग असलेले २२१८ मतदार असून, अन्य प्रकारचे अपंगत्व असलेले ६६० मतदार आहेत.

टॅग्स :BeedबीडLok Sabha Election 2019लोकसभा निवडणूकVotingमतदान