शहरं
Join us  
Trending Stories
1
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
2
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
3
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
4
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
5
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
6
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
7
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
8
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
9
महाकुंभातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने केले लग्न; पत्नी काय करते? जाणून घ्या...
10
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
11
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
12
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
13
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
14
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
15
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
16
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
17
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
18
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
19
IIT बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
20
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
Daily Top 2Weekly Top 5

बीडमध्ये रस्त्यात अडवून वाहनधारकांना लुटणारी टोळी जेरबंद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 20, 2018 18:50 IST

एका रात्रीत किमान सात ते आठ जणांना लुटतात असे पोलीस सूत्रांनी सांगितले.

ठळक मुद्देअट्टल गुन्हेगारांचा टोळीत समावेशएलसीबीची कारवाई 

बीड : रात्रीच्या वेळी रस्त्यात अडवून वाहनधारकांना लुटणाऱ्या टोळीचा पर्दाफाश करण्यात बीडच्या स्थानिक गुन्हे शाखेला यश आले आहे. अट्टल गुन्हेगारांचा समावेश असलेल्या पाच जणांना बुधवारी मध्यरात्री गेवराई तालुक्यातील मादळमोही रस्त्यावर ताब्यात घेतले. त्यांच्याकडून विविध साहित्य जप्त केले आहे.

अविनाश कल्याण धुरंधरे (वय २९, रा. तेलगाव नाका, बीड), लहू सुभान हातागळे (वय ३५), शेख शफीक शेख नईमोद्दीन (वय ३७, दोघेही रा. काळा हनुमान ठाणा, बीड), संजय हरिभाऊ कारके (रा. वारोळा, ता. माजलगाव), पप्पू बाबूराव अडागळे (वय २५, रा. एरंडगाव, ता. गेवराई) अशी पकडलेल्या आरोपींची नावे आहेत.

बुधवारी मादळमोही - पाडळसिंगी रस्त्यावर ही टोळी दबा धरुन बसल्याची माहिती सपोनि दिलीप तेजनकर यांना मिळाली. त्यांनी तात्काळ सापळा लावला. रस्त्याच्या कडेला जीप उभी करुन हे पाचही जण रस्त्यावर दोरी आडवी टाकून वाहनधारकांना पाडण्याच्या तयारी होते. याचवेळी एलसीबीच्या पथकाने दबा धरुन बसलेल्या पाचही जणांना ताब्यात घेतले. त्यांच्याकडून कटावणी, लोखंडी रॉड, लोखंडी गज, स्क्रू ड्रायव्हर, दोर, पक्कड यासह जीप (एमएच ०६ जे ४३२४) जप्त करण्यात आली आहे. या सर्वांना गेवराई पोलिसांच्या स्वाधीन केले आहे. या सर्वांविरोधात गेवराई पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.

ही कारवाई पोलीस अधीक्षक जी. श्रीधर, अपर अधीक्षक वैभव कलुबर्मे, अजित बोºहाडे, गुन्हे शाखेचे पो. नि. घनशाम पाळवदे यांच्या मार्गदर्शनाखाली सपोनि दिलीप तेजनकर, साजीद पठाण, नसीर शेख, विष्णू चव्हाण, गणेश नवले, सुग्रीव रुपनर, भागवत बिक्कड आदींनी केली.

अविनाश टोळीचा म्होरक्याअविनाश धुरंधरे हा टोळीचा म्होरक्या आहे. लहू हा देखील रेकॉर्डवरील गुन्हेगार आहे. अविनाशच्या सांगण्यावरुनच ते वाहनधारकांची लुटमार करीत असत. बीडसह शेजारील जिल्ह्यात त्यांच्याविरुद्ध गुन्हे दाखल आहेत.

कारागृहात झाली ओळखअविनाश व लहू यांची कारागृहात ओळख झाली. त्यानंतर त्यांनी पप्पू, संजय व शफीकला सोबत घेत टोळी तयार केली. त्यानंतर लुटमारीचे धडे दिले. त्यानंतर त्यांनी अनेक गुन्हे केल्याचे सूत्रांकडून सांगण्यात आले.

दोरीने हातपाय बांधून करतात मारहाणदुचाकीस्वार दोरीला अडकून पडल्यानंतर त्याला तात्काळ बाजूच्या शेतात नेले जाते. दुसरा एकजण दुचाकी रस्त्याच्या बाजूला घेतो. तिघे मिळून दुचाकीस्वाराचे हातपाय बांधतात आणि मारहाण करुन त्यांच्याजवळील किंमती मुद्देमाल काढून घेतात. एका रात्रीत किमान सात ते आठ जणांना लुटतात असे पोलीस सूत्रांनी सांगितले.

टॅग्स :RobberyदरोडाtheftचोरीArrestअटकBeedबीड