शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
2
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
3
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
4
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
5
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
6
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
7
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
8
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
9
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
10
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
11
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
12
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
13
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
14
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
15
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
16
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
17
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
18
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
19
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
20
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
Daily Top 2Weekly Top 5

रस्त्यांची कामे अपूर्ण; बीडकरांना त्रास

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 29, 2020 00:11 IST

बीड : शहरात विविध ठिकाणी नवीन रस्ते बनविण्याचे काम हाती घेण्यात आले. यासाठी रस्ते उखडून ठेवले आहेत. सध्या हे ...

ठळक मुद्देअपघात वाढले : चालणेही झाले मुश्किल; बीड पालिका मूग गिळून गप्प

बीड : शहरात विविध ठिकाणी नवीन रस्ते बनविण्याचे काम हाती घेण्यात आले. यासाठी रस्ते उखडून ठेवले आहेत. सध्या हे काम संथ गतीने सुरू असल्याने नागरिक, वाहनधारकांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे. चालणे मुश्किल झाले असून वाहन अपघातांचे प्रमाणही वाढले आहे. एवढी गंभीर परिस्थिती असतानाही पालिका मुग गिळून गप्प असल्याने संताप व्यक्त होत आहे.बीड शहरात विविध १६ रस्ते नगरोत्थान योजनेतून करण्यात येत आहेत. यासाठी ८५ कोटी ८६ लाख रूपयांचा निधी आहे. १६ पैकी ८ रस्ता कामाला सुरूवात झाली आहे. ही सर्व रस्ते जवळपास १८ किलो मिटर अंतराचे आहेत. चालू आठ पैकी खंडेश्वरी मार्ग, खासबाग मार्ग, कालिका नगर व अन्य एक असे चार रस्ता कामे पूर्ण झाल्याचा दावा पालिकेने केला आहे. परंतु सुरू असलेल्या इतर चार कामांमुळे नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे.यशवंतराव चव्हाण नाट्यगृहाकडे जाणारा रस्ता एका बाजूनेच बनविला आहे. एक बाजू अद्यापही अपुर्ण आहे. नवीन रस्त्यावरून खाली उतरण्यास जागा नाही. तसेच लोखंडी गजही बाहेर आल्याने वाहनधारक व पादचाऱ्यांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे. या रस्ता कामांमुळे नागरीक, वाहनधारक वाट मोडत असल्याचे दिसून येत आहे. हा सर्व प्रकार एवढा गंभीर असतानाही पालिकेकडून ही कामे गतीने करण्यास दुर्लक्ष केले जात आहे. वेगवेगळ्या तांत्रीक अडचणी सांगून रस्ता कामांकडे कानाडोळा केला जात असल्याने बीडकरांमधून तीव्र संताप व्यक्त होत आहे. रखडलेली कामे तात्काळ पूर्ण करण्याची मागणीही जोर धरू लागली आहे.कामांना १८ महिन्यांचा कालावधीपािलकेच्या माहितीनुसार ३१ डिसेंबर २०१८ ला या रस्ता कामांस प्रशासकीय मान्यता मिळालेली आहे. एप्रिल २०१९ च्या सुमारास या कामांना सुरूवात झाल्याचा दावा पालिकेने केला आहे. परंतु अद्याप ८ कामांना सुरूवातच नाही. तर सुरू असलेल्या ८ पैकी चार कामे अद्यापही अपूर्णच आहेत. त्यामुळे १८ महिन्यांच्या कालावधीत सर्व कामे पूर्ण होतील का? याबाबत प्रश्नचिन्ह आहे. आणि अती घाईत कामे केली तर ती दर्जेदार होतील का? याबाबतही साशंकता व्यक्त होत आहे.मुख्याधिकाऱ्यांकडून प्रतिसाद नाहीयाबाबत पालिका मुख्याधिकारी रोहिदास दोरकुळकर यांना बाजू समजून घेण्यासाठी भ्रमणध्वणीवरून संपर्क केला. मात्र, त्यांनी कॉल न घेतल्याने बाजू समजली नाही. सूत्रांच्या माहितीनुसार ते औरंगाबादला न्यायालयात असल्याचे समजले. उशिरापर्यंत त्यांचा परत कॉल आला नाही. त्यामुळे त्यांची बाजू समजली नाही.

टॅग्स :Beedबीडroad safetyरस्ते सुरक्षा