शहरं
Join us  
Trending Stories
1
इस्रायलचे पहिले टार्गेट ठरले! इराणच्या रेल्वे उडविणार, नागरिकांना रेल्वेमार्गांपासून दूर राहण्याचा इशारा...
2
सर्व नागरिकांनी ऊर्जा प्रकल्पांना घेराव घाला...! ट्रम्प यांच्या धमकीवर इराणची नवी चाल, वाटाघाटी नाजूक वळणावर...
3
दिल्ली विधानसभेत का घुसवली कार? पोलिसांच्या चौकशीत सरबजीतने केला धक्कादायक खुलासा! म्हणाला..
4
भारतातील राजदूताला व्हाईट हाऊसमध्ये स्पेशल आमंत्रण; इराणची डेडलाइन तेव्हाच संपणार, योगायोग की...
5
Bonus Share News: पहिल्यांदाच मिळणार बोनस शेअर्सचं गिफ्ट; मिळणार ५ शेअर्स, २८५९% वाढलाय शेअर
6
शालेय सहलींनी भरली एसटीची तिजोरी, मिळाले तब्बल १२७ कोटी रुपयांचे उत्पन्न
7
धक्कादायक! भावाच्या पत्नीवर अत्याचार; आईनेच दिली मुलाविरोधात साक्ष, न्यायालयाचा कठोर निर्णय
8
IPLमध्ये सर्व संघ कुणाविरोधात २ तर कुणाविरुद्ध एकच सामना का खोळतात? असं आहे यामागचं गुपित
9
तुफान राडा! भाजपातील वाद चव्हाट्यावर, नेते आपापसात भिडले; शिवीगाळ करत दिली धमकी
10
Crime: नाशिक, वसई पाठोपाठ नागपुरातही भोंदूबाबाचा मोठा कांड; तंत्र-मंत्राच्या नावाखाली महिलेवर बलात्कार
11
ट्रम्प यांची इराणला 'डेडलाईन'! रात्री ८ वाजेपर्यंत होर्मुज खुला करा, अन्यथा युद्ध अटळ; भारतासह आशियाई देश चिंतेत
12
अस्तनीतला साप...! UAE ने ३ अब्ज डॉलर्सचे कर्ज परत मागताच पाकिस्तानी खासदार भडकले; चक्क 'अखंड भारता'ची भीती दाखवली
13
इराणचा अमेरिकेला '१० कलमी' प्रतिप्रस्ताव! होर्मुजमधून जाणाऱ्या जहाजावर २० लाख डॉलर टॅक्स आकारणार? आता ट्रम्प काय करणार?
14
Mumbai Metro: मुंबईच्या बाहेर जाणारी पहिली मेट्रो! आता अंधेरी ते मिरा भाईंदर थेट प्रवास, तिकीट किती? स्थानकं किती? A टू Z माहिती...
15
युद्ध इराणमध्ये, फटका पाकिस्तानात! रात्री ८ नंतर बाजारपेठा बंद; डिझेल ५२० तर महागाईने मोडले कंबरडे
16
वेळ संपत चालली! इराणच्या भीतीने सौदीने बहारिनला जोडणारा पूल बंद केला; रात्री काय घडणार... 
17
VIRAL : लेकाच्या कष्टाचे फळ! मुलगा घरी घेऊन आला पहिला फ्रीज; आईच्या चेहऱ्यावरचा आनंद पाहून व्हाल भावुक 
18
Video - संतापजनक! फक्त एक पेरू तोडला म्हणून ४ वर्षांच्या मुलीला दोरीने बांधून बेदम मारहाण
19
भिवंडीत तरुणाचा मृत्यू झाल्यानंतर विशेष सुरक्षा; भाड्यात दरवर्षी १० टक्के वाढ
20
Middle East War: "होर्मुझ सामुद्रधुनी उघडा नाही तर, गंभीर परिणाम भोगा" अमेरिकेचा इराणला शेवटचा अल्टिमेटम!
Daily Top 2Weekly Top 5

भडंगवाडीत दरोडेखोरांचा धुमाकूळ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 11, 2018 00:42 IST

गेवराई तालुक्यातील भडंगवाडी येथे मंगळवारी मध्यरात्री पाच ते सात दरोडेखोरांनी धुमाकूळ घातला. एका वृद्ध महिलेस मारहाण करून सोन्या-चांदीच्या दागिन्यांसह रोख ऐवज लंपास केला. एकाच रात्री तीन ठिकाणी घरफोड्या झाल्याने गावात दहशतीचे वातावरण आहे.

ठळक मुद्देदहशत : वृद्धेला मारहाण करून तीन ठिकाणी घरफोड्या

लोकमत न्यूज नेटवर्कमादळमोही : गेवराई तालुक्यातील भडंगवाडी येथे मंगळवारी मध्यरात्री पाच ते सात दरोडेखोरांनी धुमाकूळ घातला. एका वृद्ध महिलेस मारहाण करून सोन्या-चांदीच्या दागिन्यांसह रोख ऐवज लंपास केला. एकाच रात्री तीन ठिकाणी घरफोड्या झाल्याने गावात दहशतीचे वातावरण आहे.भडंगवाडीचे सरंपच ज्ञानेश्वर राधाकिशन नवले हे कुटूंबासह घराच्या छतावर झोपले होते. हीच संधी साधून चोरटे घरात शिरले. घरात चार्जिंगला लावलेला मोबाईल घेत इतर ठिकाणी उचकापाचक केली. मात्र, हाती काहीच लागले नाही. नंतर शेजारीच असलेल्या सिताबाई मुरलीधर भोजगुडे यांच्या घरात प्रवेश केला. सिताबाई या एकट्याच राहतात. मंगळवारी रात्री त्या घर बंद करून आपल्या भाचीकडे झोपण्यासाठी गेल्या होत्या. त्यांच्या घरातील रोख दहा हजार रूपये दरोडेखोरांनी लंपास केले. त्यानंतर चोरट्यांनी आपला मोर्चा राणी रोहिदास कोकरे यांच्या घराकडे वळविला. राणी या आपल्या मुलासह घरात झोपल्या होत्या. दरवाजा उघडाच असल्याने चोरटे थेट राणीच्या खोलीत पोहचले. तिच्या अंगावरील दागिने घेत असताना तिला जाग आली. ती जोरात ओरडली. ओरडण्याने सासू जानकाबाई जाग्या झाल्या. याचवेळी एका दरोडेखोराने त्यांना काठीने मारहाण केली. जास्त आरडाओरडा झाल्याने दरोडेखोरांनी घटनास्थळावरून पळ काढला. जखमी जानकाबाई यांना तात्काळ जिल्हा रूग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. गेवराई पोलीस ठाण्यात याची नोंद झाली आहे.दरम्यान, माहिती मिळताच पोलीस अधीक्षक जी.श्रीधर, अपर अधीक्षक वैभव कलुबर्मे, गेवराई ठाण्याचे पो.नि. दिनेश आहेर, एलसीबीचे सपोनि दिलीप तेजनकर, अमोल धस, दरोडाचे सपोनि गजानन जाधव, पोउपनि ए.बी.गटकूळ, शरद बहिरवाळ, गणेश गुरखुदे, अशेक सोनवणे यांनी घटनास्थळी भेट दिली.फिंगर प्रिंट अन् श्वान पथक दाखलघटनेची माहिती मिळताच श्वान पथक व फिंगर प्रिंट एक्सपर्टला पाचारण करण्यात आले होते.मात्र, दरोडेखोरांचा माग काढण्यात श्वानांना अपयश आले.तपासासाठी पथके रवाना केल्याचेही पोलीस सूत्रांकडून सांगण्यात आले. रात्री उशिरापर्यंत पोलिसांच्या हाती काहीच लागले नव्हते.

टॅग्स :BeedबीडCrime Newsगुन्हेगारी