शहरं
Join us  
Trending Stories
1
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
2
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपटेड? पटापट चेक करा
3
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
4
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
5
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
6
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
7
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
8
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
9
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
10
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
11
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
12
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
13
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
14
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
15
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
16
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
17
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
18
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
19
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
20
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
Daily Top 2Weekly Top 5

सुनील केंद्रेकरांनी घेतला विविध कामांचा आढावा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 13, 2019 00:02 IST

विभागीय आयुक्त सुनिल केंद्रेकर यांनी शनिवारी अचानक भेट देत जिल्ह्यातील विविध कामांची पाहणी दिली. यावेळी जिल्हाधिकारी आस्तिककुमार पाण्डेय यांनी वाळू चोरी रोखण्यासाठी केलेल्या उपाययोजना व टँकरला बसवलेली जीपीआरएस सिस्टिम याविषयी माहिती दिली.

ठळक मुद्देआस्तिककुमार पाण्डेय : अवैध वाळू वाहतूक रोखण्यासाठी केलेल्या उपाययोजनांची दिली माहिती

बीड : विभागीय आयुक्त सुनिल केंद्रेकर यांनी शनिवारी अचानक भेट देत जिल्ह्यातील विविध कामांची पाहणी दिली. यावेळी जिल्हाधिकारी आस्तिककुमार पाण्डेय यांनी वाळू चोरी रोखण्यासाठी केलेल्या उपाययोजना व टँकरला बसवलेली जीपीआरएस सिस्टिम याविषयी माहिती दिली. या तंत्रज्ञानामुळे टँकर व वाळूमध्ये होणारा गैरप्रकार थांबण्यास मदत झाल्याचे देखील यावेळी पाण्डेय म्हणाले.यावेळी रोजगार हमी योजना मंत्री जयदत्त क्षीरसागर, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अमोल येडगे, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी राजेंद्र निकम, विभागीय वन अधिकारी अमोल सातपुते, निवासी उपजिल्हाधिकारी रवींद्र परळीकर, शिक्षण अधिकारी भगवानराव सोनवणे, जिल्हा गौणखनिज अधिकारी आनंद पाटील, तालुका कृषी अधिकारी दिलीप जाधव, अमोल मुंडे यांच्यासह इतर संबंधीत विभागाचे अधिकारी कर्मचारी उपस्थित होते.विभागीय आयुक्त सुनिल केंद्रेकर यांचा दौरा नियोजित नव्हता, त्यांनी अचानक शनिवारी दुपारी बीड जिल्हाधिकारी कार्यालयात भेट दिली. त्यानंतर शहराच्या जवळील तळेगाव याठिकाणी जाऊन पाणी फाऊंडेशनच्या कामाची पाहणी केली. त्याठिकाणी काही शेतकऱ्यांशी संवाद देखील साधला, नवगण राजूरी येथील जि.प.च्या शाळेला भेट देऊन पाहणी केली. व शाळेची स्थिती पाहून शिक्षकांचे कौतुक केले. तसेच शाळेत ग्रंथालय व प्रयोगशाळा असणे गरजेचे त्याची पुर्तता करण्याचे आदेश संबंधीत विभागाच्या अधिकाऱ्यांना दिले. त्यानंतर केंद्रेकरांनी पालवन परिसरात भेट देऊन कमी पावसावर झालेल्या पेरण्यांची व कापूस लागड याची पाहणी केली यावेळी शेतकºयांशी संवाद साधून पिकपेरणीच्या संदर्भातील परिस्थिती जाणून घेतली.वाळू चोरी व अवैध वाहतूक रोखण्यासाठी तसेच टँकरच्या संदर्भातील तक्रार निवारण करण्यासाठी जिल्हाधिकारी आस्तिककुमार पाण्डेय यांनी सर्व टँकर व वाहनांवर जीपीएस बसवण्याच्या तसेच तक्रार निवार केंद्र सुरु केले आहे. या उपक्रमाचे आयुक्त केंद्रेकर यांनी स्वागत केले. वॉररुमची पाहणी करुन टँकर व वाळू वाहतूक करणाºया टिप्पची जीपीएस स्क्रिनवर पाहणी केली.पालवणच्या डोंगररांगावर वृक्षारोपणविभागीय आयुक्त सुनिल केंद्रेकर यांनी तळेगाव, नवगण राजुरी येथे वृक्ष लागवड केली. तसेच वन विभागाच्या तवीने मोठ्या प्रमाणात वृक्षोरोपण कार्यक्रम ज्या ठिकाणी राबवण्यात आला आहे. त्या ठिकाणी पालवणच्या डोंगररांगवर केलेले वृक्ष लगवड पाहून वन विभागाचा कामाचा आढावा घेतला, तसेच मोठ्या प्रमाणात वृक्ष लागवड करण्याच्या सूचना दिल्या, तसेच केंद्रेकर यांच्या हस्ते वृक्षारोपण झाले.

टॅग्स :BeedबीडDivisional Commissioner Office Aurangabadऔरंगाबाद विभागीय आयुक्तालयcollectorजिल्हाधिकारी