सात तालुकाध्यक्षांत धारूरचे ॲड. बाळासाहेब चोले, परळीचे सतीश मुंडे, अंबाजोगाईचे अच्युतराव गणगे, वडवणीचे पोपटराव शेंडगे, माजलगावचे अरुण राऊत, पाटोद्याचे तालुकाध्यक्ष सुधीर घुमरे यांचा समावेश आहे. पदाधिकाऱ्यांत माजी जि. प. अध्यक्षा सविता गोल्हार, माजी उपाध्यक्षा जयश्री मस्के, जिल्हा परिषद सदस्य सविता रामदास बडे, संतोष हंगे, पं. स. सदस्या संगीता मिसाळ, लक्ष्मी लोखंडे, प्रकाश खेडकर, जिल्हा सरचिटणीस सर्जेराव तांदळे यांनीही आपापल्या पदाचे राजीनामे जिल्हा अध्यक्ष राजेंद्र मस्के यांच्याकडे पाठवले आहेत. राजीनाम्याचे लोण हे जिल्ह्यात पसरत आहे. समाज माध्यमांवरही मोठ्या प्रमाणात रोष व्यक्त केला जात आहे. खासदार डॉ. प्रीतम मुंडे यांना जाणीवपूर्वक डावलण्यात आले आहे, असे मुंडे भगिनींच्या समर्थकांचे म्हणणे आहे. जिल्ह्यातून अनेक कार्यकर्ते शनिवारी पंकजा मुंडे यांना भेटण्यासाठी मुंबईकडे रवाना झाले आहेत.
केंद्रीय मंत्रिमंडळात प्रीतम मुंडेंना स्थान न दिल्याने पदाधिकाऱ्यांचे राजीनामे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 11, 2021 04:23 IST