शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
3
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
4
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
5
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
6
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
7
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
8
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
9
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
10
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
11
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
12
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
13
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
14
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
15
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
16
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
17
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
18
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
19
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
20
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
Daily Top 2Weekly Top 5

आरक्षण कायम; बीड जिल्ह्यात जल्लोष

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 28, 2019 00:07 IST

मराठा आरक्षणाबाबत उच्च न्यायालयाने दिलेल्या निर्णयाचे स्वागत करत जिल्हाभरात आनंदोत्सव साजरा करण्यात आला.

ठळक मुद्देउच्च न्यायालयाच्या निर्णयाचे सर्वत्र स्वागत : आरक्षणासाठी बलिदान देणाऱ्यांचे स्मरण; फटाके फोडून पेढे वाटून आनंदोत्सव

बीड : मराठा आरक्षणाबाबत उच्च न्यायालयाने दिलेल्या निर्णयाचे स्वागत करत जिल्हाभरात आनंदोत्सव साजरा करण्यात आला. बीड येथे छपिती शिवाजी महाराज पुतळ्याजवळ गुरुवारी दुपारी मोठ्यासंख्येने मराठा तसेच आरक्षणप्रेमी बांधव मोठ्या संख्येने एकत्र आले. आरक्षणाच्या निर्णयाचे स्वागत करत ‘एक मराठा, लाख मराठा’, ‘जय जिजाऊ, जय शिवराय’ अशा घोषणा देण्यात आल्या. फटाके वाजवून पेढे भरवून जल्लोष करण्यात आला.यावेळी अ‍ॅड. मंगेश पोकळे, स्वप्निल गलधर, अशोक हिंगे, प्रा. राजेश भूसारी, विनोद इंगोले, अ‍ॅड. महेश धांडे, अशोक सुखवसे, चंद्रकांत नवले, जयसिंह सोळंके, शैलेश जाधव, संदीप उबाळे, मळीराम यादव, देवीसिंह शिंदे, प्रा. गोपाळ धांडे, प्रकाश काळे, कमलताई निंबाळकर, सैरंद्रा डोईफोडे यांच्यासह बहुसंख्येने युवक मोठ्या संख्येने उपस्थित होते. दरम्यान नगर रोड परिसरात शिवसंग्राम कार्यालयासमोर पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी जल्लोष केला.आंदोलकांवरील गुन्हे मागे घेण्याची मागणीउच्च न्यायालयाने मराठा आरक्षणासंदर्भात शिक्कामोर्तब केले. खºया अर्थाने आरक्षणाच्या मागणीसाठी ४२ हुतात्म्यांनी केलेले बलिदान, मराठा क्रांती मोर्चामध्ये सहभागी झालेल्या करोडोंच्या संख्येतील समाजबांधवांचे हे यश आहे. न्यायालयाच्या निर्णयाचे मनापासून स्वागत करत असून शासनाने मराठा क्रांती मोर्चातील आंदोलकांवर दाखल झालेले गुन्हे तात्काळ मागे घ्यावेत अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे प्रदेश सरचिटणीस माजी आ.अमरसिंह पंडित यांनी केली. मराठा आरक्षणामुळे नक्कीच समाजाची शैक्षणिक प्रगती होईल असा विश्वास व्यक्त करताना हक्काचे संपुर्ण १६ टक्के आरक्षण मिळाले नसल्याची खंतही त्यांनी व्यक्त केली.छत्रपती शाहू महाराज यांनी १९०२ साली इतर समाजासोबत मराठा समाजाला आरक्षण दिले होते. त्यानंतर गुरुवारी मुंबई उच्च न्यायालयाने आरक्षण कायम केले. यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सर्व काळजी घेऊन मराठा समाजाला न्याय देण्याचा प्रयत्न केला. तो छत्रपती शाहू महाराजानंतर दिलेला खरा न्याय आहे. यामुळे समाजातील तरुण-तरुणींना शिक्षण व नोकरीत संधी मिळणार आहे. हा निर्णय ऐतिहासिक आहे. - विनायक मेटे, आमदार

टॅग्स :BeedबीडMaratha Reservationमराठा आरक्षण