शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
2
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
3
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
4
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
5
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
6
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
7
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
8
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
9
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
10
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
11
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
12
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
13
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
14
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
15
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
16
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
17
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
18
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
19
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
20
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
Daily Top 2Weekly Top 5

बीडमध्ये भंडाऱ्याची पुनरावृत्ती टळली, नर्सेसची सतर्कता; वाचले १२ बाळांचे प्राण

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 17, 2021 12:01 IST

वॉर्मरच्या सॉकेटमधून धूर

सोमनाथ खताळ बीड : येथील जिल्हा रुग्णालयातील एसएनसीयू विभागातील आगीची मोठी दुर्घटना दोन परिचारिकांच्या सतर्कतेने टळली. वॉर्मरमधून निघणाऱ्या धुराकडे लक्ष दिल्याने सर्व वीजपुरवठा खंडित करण्यात आला. त्यामुळे एसएनसीयूमधील सर्वच १२ बालके सुखरूप राहिली. बुधवारी सायंकाळी ६ वाजेच्या सुमारास हा प्रकार घडला.

एसएनसीयू विभागात अनिता मुंडे व पुष्पा माने या दोघी परिचारिका कर्तव्यावर होत्या. सायंकाळी ६ वाजेच्या सुमारास बालरोगतज्ज्ञ डॉ. इलियास खान यांनी सर्व बाळांची तपासणी केली. त्यानंतर परिचारिका बाळाला आईकडून आलेले दूध पाजत होत्या. एवढ्यात त्यांना काहीतरी जळाल्याचा वास आला. यातील अनिता मुंडे यांनी पाहिल्यावर त्यांना पहिल्या क्रमांकाच्या वाॅर्मरमधून धूर निघत असल्याचे दिसले. त्यांनी पुष्पा माने यांना आवाज दिला. यातील मुंडे यांनी बाळाला बाजूला केले तर माने यांनी सर्व वीजपुरवठा खंडित केला.

त्यामुळे वॉर्मरमधील धूर बंद झाला. तोपर्यंत ही माहिती अधिकाऱ्यांसह तंत्रज्ञांना देण्यात आली. यावर सर्वांनीच एसएनसीयूकडे धाव घेतली. रात्री आठ वाजेपर्यंत हा प्रकार सुरू होता. त्यानंतर तंत्रज्ञांनी कसब पणाला लावत सर्व वॉर्मर युद्धपातळीवर पुन्हा सुरळीत केले. सर्व बालके सुरक्षित आणि सुखरूप असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. अनिता मुंडे व पुष्पा माने यांच्या धाडसाबद्दल जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. सुरेश साबळे यांनी दोघींचा सत्कार केला.

बांधकाम विभाग गाफीलचजिल्ह्यातील सर्वच शासकीय आरोग्य संस्थांचे फायर व इलेक्ट्रिक ऑडिट झालेले आहे. त्यातील उपाययोजना करण्याबाबत आरोग्य विभागाने सार्वजनिक बांधकाम (विद्युत) विभागाला पत्रही दिलेले आहे. परंतु, येथील अभियंता केवळ कागदी घोडे नाचवून सामान्यांच्या जीवाशी खेळत आहेत. वारंवार पत्रव्यवहार करूनही अद्याप काहीच उपाययोजना न केल्याने संताप व्यक्त होत आहे. बांधकाम अभियंत्यांवरच आता कारवाईची मागणी होत आहे.

टॅग्स :hospitalहॉस्पिटलBeedबीड