शहरं
Join us  
Trending Stories
1
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
2
आयआयटी बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
3
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
4
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
5
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
6
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
7
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
8
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
9
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
10
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
11
सोने-चांदीवरील आयात शुल्कात मोठी कपात! दागिन्यांचे दर उतरणार? तोळ्यामागे ११,७०० रुपयांचा दिलासा
12
शेतकरी ते उद्योजक! मुद्रा कर्जाच्या मदतीने उभा करा स्वतःचा व्यवसाय; जाणून घ्या अर्ज करण्याची प्रक्रिया
13
पाकिस्तानात ४ दिवस वर्किंग, बांगलादेशात सं. ७ नंतर मॉल बंद; तेल संकटात शेजारील देशांनी काय केले?
14
Divya Singh : अभूतपूर्व! कडाक्याची थंडी, खांद्यावर सायकल; माउंट एव्हरेस्ट बेस कॅम्प गाठून दिव्या सिंहने रचला इतिहास
15
लोकप्रिय मराठी अभिनेत्रीने दुसऱ्यांदा बांधली लग्नगाठ, इंडस्ट्रीतलाच आहे नवरा; ओळखलंत का?
16
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
17
अखेर ट्रायम्फने ३५० सीसीची मोटरसायकल लाँच केली! जीएसटीचा फायदा अन् किंमत पाहून म्हणाल...
18
"काळजी करू नका, एकाही कार्यकर्त्याला वाऱ्यावर सोडणार नाही, दादांचा जनता दरबार..."; सुनेत्रा पवार यांचा शब्द
19
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
20
तरुणीचा 'शोले' स्टाईल ड्रामा! असं काय घडलं की मोबाईल टॉवरवर चढून तरुणीने घरच्यांना दिली धमकी?
Daily Top 2Weekly Top 5

राज्यातील ३५२ आरोग्य संस्थांचा झाला ‘कायाकल्प’; राज्य सरकार देणार ५० लाखांपर्यंत बक्षिस

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 21, 2020 15:02 IST

५० हजार ते ५० लाख रुपयांपर्यंत हा बक्षीसरूपी निधी  २५ आॅक्टोबरला वाटप केला जाणार आहे.

ठळक मुद्देजिल्हा रुग्णालय गटात नाशिक  राज्यात अव्वल राहिलेग्रामीण रुग्णालय गटात श्रीरामपूर ग्रामीण रुग्णालय अव्वल

- सोमनाथ खताळ बीड : उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या राज्यातील ३५२ आरोग्य संस्थांना ‘कायाकल्प पुरस्कार’ देण्यात येणार आहे. ५० हजार ते ५० लाख रुपयांपर्यंत हा बक्षीसरूपी निधी  २५ आॅक्टोबरला वाटप केला जाणार आहे. राष्ट्रीय आरोग्य अभियानचे सहायक संचालक डॉ. विजय कंदेवाड यांनी हा निकाल जाहीर केला आहे.

राज्यात प्रत्येक वर्षी उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या जिल्हा रुग्णालय, उपजिल्हा रुग्णालय, महिला रुग्णालय, कुटीर रुग्णालय, प्राथमिक आरोग्य केंद्रांना कायाकल्प पुरस्कार आरोग्य विभागाच्या वतीने दिला जातो. वर्षाच्या सुरूवातीला याची तपासणी करण्यात आली होती. याचा निकाल सोमवारी घोषित झाला असून जिल्हा रुग्णालय गटात नाशिक  राज्यात अव्वल राहिले आहे. त्यांना ५० लाखांचे बक्षिस दिले जाणार असून द्वितीय मालेगाव रुग्णालयाला २० लाख रुपये दिले जाणार आहेत. उपजिल्हा व ग्रामीण रुग्णालय गटात श्रीरामपूर ग्रामीण रुग्णालय अव्वल राहिले असून त्यांना १५ लाख रुपये तर द्वितीय तिरोरा उपजिल्हा व कसबाबावडा यांनी बाजी मारली आहे. त्यांना प्रत्येकी ५ लाख रुपये बक्षिस दिले जाणार आहे. इतर उत्तेजनार्थ संस्थांना प्रत्येकी १ लाख रुपये दिले जाणार आहेत.  

आरोग्य केंद्र गटात यांची बाजी राज्यातील २६९ आरोग्य केंद्रांना कायाकल्प पुरस्कार मिळाला आहे. यात प्रथम असणाऱ्यांना २ लाख, तर इतरांना ५० हजार रुपये पारितोषिक दिले आहे. प्रथममध्ये कान्हूर पठार (जि. अहमदनगर), बाभूळगाव (अकोला), चापानेर (जि. औरंगाबाद), सालेभाटा (भंडारा), कडा (बीड), किन्होळा (बुलडाणा), दुर्गापूर (चंद्रपूर), कासारे (धुळे), माळेवाडा (गडचिरोली), छोपा (गोंदिया), पांगरा शिंदे (हिंगोली), शेंदुर्णी (जळगाव), अलाटे (कोल्हापूर), हालगारा (लातूर), बेला (नागपूर), तुपा (नांदेड), लहान शहादा (नंदुरबार), तळेगाव दिंडोरी (नाशिक), दहिफळ (उस्मानाबाद), तलवाडा (पालघर), महातपुरी (परभणी), पोयनाद (रायगड), कुंबळे (रत्नागिरी), चिंचाणी (सांगली), रेठारे बीके (सातारा), पडेल (सिंधुदुर्ग), कामटी (सोलापूर), शेनवा (ठाणे), अलीपूर (वर्धा), मनभा (वाशिम), आरली (यवतमाळ) यांचा समावेश आहे. इतर सर्वांना उत्तेजनार्थ बक्षिसे दिली जातील.

टॅग्स :hospitalहॉस्पिटलState Governmentराज्य सरकारfundsनिधी