शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War: युद्ध थांबलं? ट्रम्प यांची मोठी घोषणा, पण मोज्तबा खामेनेईंच्या एका वाक्याने पुन्हा खळबळ! म्हणाले..
2
नाशिकचा 'भोंदू' अशोक खरात कोठडीत ढसाढसा रडला; पोलिसांना शाप देणारा बाबा आता नरमला!
3
समरजित घाटगे यांची भाजपात घरवापसी, शरद पवार गटाला धक्का, कागलमधील समीकरणं बदलणार
4
शहबाज शरीफ यांना डच्चू! ट्रम्प यांनी या दोन जणांना केले कॉल? वाचा युद्धविरामापूर्वीच्या फोन कॉलची संपूर्ण 'इनसाईड स्टोरी'
5
"जी व्यक्ती मालिकेतच नव्हती...", 'लक्ष्य'मधून बाहेर काढण्याच्या दिगंबर नाईकांच्या आरोपांवर आदेश बांदेकरांचं उत्तर
6
RBI MPC Meeting Update: रेपो दर 'जैसे थे'; जागतिक अनिश्चिततेदरम्यान रिझर्व्ह बँकेचा सावध पवित्रा
7
SHOCKING! इराण-अमेरिका युद्धातून डोनाल्ड ट्रम्पची दोन्ही मुलंच उकळताहेत प्रचंड पैसा!
8
RR vs MI: मुंबईच्या रणनीतीचा पालापाचोळा! पराभवानंतर जयवर्धने यांनी सांगितलं नेमकं कुठं गणित बिघडलं?
9
शस्त्रसंधी केली तरी ट्रम्प यांची खुर्ची धोक्यात? ८५ खासदारांनी मागितला राजीनामा; विरोध कायम
10
वैभव-यशस्वीने मुंबईला धू धू धुतले, कॅप्टन हार्दिक पांड्याने ‘या’ खेळांडूंवर पराभवाचे खापर फोडले  
11
Mumbai Local: मध्य रेल्वेची कमाल, १६४ कोटी प्रवाशांचा प्रवास; ८.१६ लाख ट्रेन, १ वर्षांत किती सेवा वाढल्या?
12
अमेरिका-इराणमध्ये अखेर तह! ट्रम्प कडाडले, पाकिस्तानने मध्यस्थी केली की चीनने? वाचा काय घडलंय...
13
Palmistry: आत्ताच आपला तळहात तपासा! 'अशी' भाग्यरेषा असणारे लोक होतात प्रचंड श्रीमंत
14
युद्ध थांबलं, सोनं चांदी महागली; Silver मध्ये ११,५६० रुपयांची तर Gold ३,०२७ रुपयांची तेजी; पाहा १८ ते २४ कॅरेटचे दर
15
ट्रम्प झुकले, इराणसमोर सरेंडर केले, युद्धविरामावरून सिनेटर भडकले, अमेरिकेत संतापाची लाट
16
इथे युद्ध थांबलं, तिथे शेअर बाजार सुस्साट... Sensex २६०० अंकांनी वधारला, Nifty मध्ये ७०० अंकांची तेजी
17
अग्रलेख: भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी एकत्र आलेली 'महाविकास आघाडी' संपुष्टात?
18
“शस्त्रसंधी वगैरे काही नाही”; इस्रायलने केले स्पष्ट, अमेरिका-इराण युद्ध खरेच थांबणार का?
19
अमेरिकेने रोखली क्षेपणास्त्रे, इराणही भूमिकेवर ठाम, अखेर ‘या’ देशाची एंट्री, अन् झाला युद्धविराम
20
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
Daily Top 2Weekly Top 5

परिवर्तन मल्टीस्टेट घोटाळ्यातील ५ आरोपींचा अटकपूर्व जामीन फेटाळला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 8, 2018 13:34 IST

शेकडो ठेवीदारांना करोडो रुपयंचा गंडा घालून परिवर्तन मल्टीस्टेटच्या अध्यक्षासह संचालक फरार झाले आहेत. फरार झालेल्या पाच आरोपींचा अटकपूर्व जामीन माजलगाव सत्र न्यायालयाने सोमवारी फेटाळला आहे.

माजलगाव (बीड ) : शेकडो ठेवीदारांना करोडो रुपयंचा गंडा घालून परिवर्तन मल्टीस्टेटच्या अध्यक्षासह संचालक फरार झाले आहेत. फरार झालेल्या पाच आरोपींचा अटकपूर्व जामीन माजलगाव सत्र न्यायालयाने सोमवारी फेटाळला आहे. या निकालामुळे ठेवीदारांना दिलासा मिळाला असून, मुख्य आरोपी विजय अलझेंडेसह इतर फरार आरोपींचे धाबे दणाणले आहे.

परिवर्तन मल्टीस्टेट, सामाजिक परिवर्तन पतसंस्थेने ज्यादा व्याजदराचे आमिष दाखवून कोट्यवधींच्या ठेवी गोळा केल्या. ही मल्टीस्टेट १८ ते २० टक्के व्याज देत असल्याने सर्वसामान्यासह अनेकांनी या संस्थेत जवळपास ३० कोटी रुपयांच्या ठेवी ठेवल्या. स्वत:च्या फायद्यासाठी अध्यक्ष विजय अलझेंडेसह संचालक, अधिकाऱ्यांनी ठेवीदारांच्या पैशांची अफरातफर केली. मुदत संपूनही ठेवीदारांच्या ठेवी परत न देता अध्यक्ष विजय अलझेंडे अचानक फरार झाल्याने ठेवीदारांनी १२ एप्रिल रोजी पोलिसात धाव घेऊन तक्रार दाखल केली. यावरून अध्यक्ष, संचालक, अधिकारी, कर्मचारी अशा एकूण ३६ जणांवर शहर पोलीस ठाण्यात एम.पी.आय.डी. कायद्यासह फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला. यामुळे सर्वच आरोपी मागील वीस दिवसांपासून फरार झाले आहेत.  अटकपूर्व जमीन मिळावा यासाठी पंधरा ते वीस संचालक, कर्मचाऱ्यांनी माजलगाव न्यायालयात अर्ज दाखल केले आहेत. 

पाच संचालकांच्या जामीन अर्जावर शनिवारी सुनावणी होऊन निकाल राखून ठेवला होता. सोमवारी सत्र न्यायालयाने ठेवीदारांचे हित लक्षात घेत पाचही जणांचा जमीन अर्ज फेटाळला. या निकालाने ठेवीदारांना दिलासा मिळाला असला तरी फरार आरोपींचे धाबे दणाणले आहेत. फिर्यादीकडून अ‍ॅड. भानुदास डक यांनी काम पाहिले.

ठेवीदारांच्या हिताचे मुद्दे सक्षमपणे मांडले परिवर्तन मल्टीस्टेटमध्ये हातावर पोट भरणाऱ्या अनेक गोरगरिबांनी पै-पै बचत करून ठेवी ठेवल्या आहेत. अध्यक्ष, संचालकांच्या गैरकारभारामुळे अनेकांचे संसार रस्त्यावर आले आहेत. यांना जामीन मिळाल्यास सर्वसामान्य ठेवीदारांना त्यांचे पैसे मिळणार नाहीत. यासह ठेवीदारांच्या हिताचे अनेक मुद्दे सक्षमपणे न्यायालयासमोर मांडल्याचे अ‍ॅड. भानुदास डक यांनी सांगितले.

यांचे अटकपूर्व जामीन फेटाळले अटकपूर्व जामीन मिळावा यासाठी पूनम धाइजे, जयराम कांबळे, बालाजी कांबळे, बाबासाहेब ढगे यांनी अर्ज दाखल केला होता; परंतु न्यायालयांनी या सर्वांचा जामीन फेटाळला आहे.

टॅग्स :Courtन्यायालयfraudधोकेबाजीCrimeगुन्हा