शहरं
Join us  
Trending Stories
1
Leh Protest: लेहमध्ये आंदोलनाला हिंसक वळण, भाजप कार्यालय पेटवले, सोनम वांगचुक १५ दिवसांपासून उपोषणावर
2
"योगी स्वतःला पीएम मोदींचा उत्तराधिकारी समजतात...!"; CWC च्या बैठकीत खर्गेंचा मोठा हल्ला, नीतीश कुमारांसाठी असा शब्द वापरला
3
पुण्यातील रविवार पेठेत शुकशुकाट; ऐन नवरात्रीत घागरा, ड्रेस घ्यायला महिलावर्ग येईना..., व्यापाऱ्यांत कुजबुज...
4
Maharashtra Rain Update: पुढील चार दिवस विदर्भात वारे, विजांसह मुसळधार पावसाचा इशारा; बंगालच्या उपसागरात कमी दाबाचा पट्टा
5
GST कपातीचा फायदा मिळत नाहीये? टोल-फ्री नंबर किंवा व्हॉट्सअॅपवर करू शकता थेट तक्रार
6
Mumbai Crime: हाताच्या नसा कापल्या गेल्या अन्... पोलिसाच्या मृत्युचे कोडे उलगडले; पत्नी, मुलाला अटक
7
३.७ कोटी देऊन बॉयफ्रेंडच्या पत्नीसोबत केली तडजोड, पण नंतर घडलं असं काही, पैसेही गेले आणि... 
8
Gold Silver Price 24 September: नवरात्रीत सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण, आता खरेदी करावं की आणखी स्वस्त होण्याची वाट पाहावी?
9
जगातील सर्वात मोठ्या मुस्लीम देशाच्या राष्ट्रपतीनं UN महासभेत म्हटलं, "ॐ  शांति ओम..." 
10
कोणतेही अधिकचे निकष न लावता दिवाळीपूर्वी शेतकऱ्यांना मदत करणार, मुख्यमंत्री फडणवीस यांची मोठी घोषणा
11
भलीमोठी स्क्रीन, अल्ट्रा एचडी डिस्प्ले; सोनी कंपनीच्या टीव्हीवर थेट ५० हजारांची सूट!
12
नवरात्र विनायक चतुर्थी २०२५: ५ मिनिटांत होणारे गणेश स्तोत्र म्हणा, शाश्वत कृपा-लाभ मिळवा!
13
IND vs BAN: अर्शदीप सिंगला आज संधी मिळणार? कोणाचा पत्ता कट होणार? अशी असू शकते Playing XI
14
Video: बँकाँकमध्ये भूमिगत रेल्वे स्टेशनचे काम सुरु होते; अचानक रस्त्यावर भगदाड पडले, सगळे...
15
नवरात्र विनायक चतुर्थी २०२५: व्रत पूजन कसे कराल? पाहा, सोपी पद्धत, शुभ मुहूर्त अन् मान्यता
16
Asia Cup 2025: तिलक वर्मा नवा विक्रम रचण्याच्या उंबरठ्यावर; शिखर धवनला मागे टाकण्याची संधी
17
३ दिवस धन-महालक्ष्मी योग: ९ राशींना नवरात्र लकी, अपूर्व लाभ; पद-पैसा-प्रतिष्ठा, वैभव-भरभराट!
18
GPS लोकेशनमुळे तुमच्या फोनची बॅटरी लवकर संपते का? नेमकं कारण तरी काय? जाणून घ्या
19
मुख्यमंत्र्यांचं उद्योगपती अजीम प्रेमजी यांना पत्र; उधारीत का मागितला एक रस्ता?

दिवसा रेकी, रात्री दरोडा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 14, 2018 00:23 IST

सर्वसामान्य नागरिक बनून दिवसभर गावात फिरले. बंद घरांची माहिती घेतली अन् रात्रीच्या सुमारास आठ जणांनी गेवराई तालुक्यातील भडंगवाडीत तीन घरी दरोडा टाकला.

ठळक मुद्देभडंगवाडी दरोड्याचा पर्दाफाश : अहमदनगरमधून येऊन बीड जिल्ह्यात दरोडा

लोकमत न्यूज नेटवर्कबीड : सर्वसामान्य नागरिक बनून दिवसभर गावात फिरले. बंद घरांची माहिती घेतली अन् रात्रीच्या सुमारास आठ जणांनी गेवराई तालुक्यातील भडंगवाडीत तीन घरी दरोडा टाकला. आठपैकी चौघांच्या मुसक्या आवळण्यात बीड पोलिसांना यश आले आहे. नगर जिल्ह्यातील नेवासा व माजलगाव तालुक्यातील तालखेड येथील दरोडेखोरांचा यामध्ये समावेश आहे. हे सर्व दरोडेखोर एकमेकांचे नातेवाईक असल्याचे तपासात समोर आले आहे.सावन रतन चव्हाण [१९, रा. पारधी वस्ती, तालखेड, ता. माजलगाव], संदीप अशोक सुसे [२०], सुंदरसिंग शिवाजी भोसले [२०] व अन्य एक अल्पवयीन [सर्व रा. गौंडगाव, ता. नेवासा, जि. अहमदनगर] अशी पकडलेल्या दरोडेखोरांची नावे आहेत.९ आॅक्टोबर रोजी हे सर्व दरोडेखोर तालखेड येथील पारधी वस्तीवरील सावन चव्हाण याच्या घरी गेले. येथे पाहुणचार झाला. यातील काही जण मादळमोहीला आले. त्यांनी मादळमोहीत बंद घरे शोधली. परंतु कोठेच ठावठिकाणा लागला नाही. त्यानंतर ते भडंगवाडीकडे वळले. गावापासून दूर असलेल्या घरांचा शोध घेतला. यात त्यांना दोन बंद घरे दिसली. ही माहिती त्यांनी इतर सहकाऱ्यांना दिली. त्यानंतर रात्रीच्या सुमारास हे सर्व जण मादळमोहीला आले. ठरल्याप्रमाणे रात्रीच्या सुमारास त्यांनी भडंगवाडी सरपंचाच्या घरी दरोडा टाकला. त्यानंतर शेजारीच असलेल्या घरात प्रवेश करुन महिलेच्या अंगावरील दागिने ओरबाडले. महिला ओरडल्याने तिची सासू जागी झाली. याचवेळी दरोडेखोर बाहेर पडत असताना त्यांच्या अंगावर ती गेली. यातील एका दरोडेखोराने तिला काठीने मारहाण करुन पळ काढला. या घटनेने जिल्ह्यात खळबळ उडाली होती.वरिष्ठ पोलीस अधिकाºयांनी तत्काळ धाव घेतली. कुठलाही पुरावा दरोडेखोरांनी सोडला नव्हता. तरीही आपल्या कौशल्याने स्थानिक गुन्हे शाखेचे सहाय्यक पोलीस निरीक्षक दिलीप तेजनकर यांनी दरोडेखोरांची माहिती काढली. सायबर क्राईम अधिपत्याखाली असलेले जमादार शेख सलीम, विकी सुरवसे, मेहत्रे आणि आसीफ यांचे आरोपी पकडण्यात मोलाचे सहकार्य मिळाले. गढी, माजलगाव महामार्गावर काही जण लूटमार करण्याच्या तयारीत असल्याचे समजले. तलवाड्याचे पो. नि. हर्षवर्धन गवळी, दरोडा प्रतिबंधकचे गजानन जाधव यांना सोबत घेत सापळा लावला. ८ पैकी चौघांना बेड्या ठोकण्यात यश आले. त्यांच्याकडून गावठी कट्ट्यासह इतर शस्त्रात्रे जप्त करण्यात आली. पोलिसी खाक्या दाखवताच त्यांनी भंडगवाडीत दरोडा टाकल्याचे कबूल केले.लग्नाऐवजी पोलिसांची बेडीसुंदरसिंग भोसले याच्या बहिणीचे सावन शिंदेसोबत लग्न ठरले होते. नव्यानेच त्यांचे हे नाते तयार झाले होते. लग्न लागण्यापूर्वीच त्यांनी डाव आखत दरोडा टाकला. या सर्वांना पोलिसांनी बेड्या ठोकल्या. सावनच्या गळ्यात लग्नाची माळ पडण्याआधीच पोलिसांकडून हातात बेड्या पडल्या. या दरोडेखोरांमध्ये बाप - लेक, चुलते - पुतणे, मेहुणे अशी नाती असल्याचे सूत्रांनी सांगितले.बीडसह ४ जिल्ह्यात धुमाकूळदरोडेखोरांनी बीडसह जालना, परभणी व अहमदनगर जिल्ह्यात धुमाकूळ घातला आहे. सुंदर हा अट्टल गुन्हेगार असून, त्याच्यावर नगर जिल्ह्यात घरफोडीचे गुन्हे दाखल असल्याचे सूत्रांकडून सांगण्यात आले.पोलिसांवर दगडफेकपोलीस पोहोचताच या आठही जणांनी दगडफेक करण्यास सुरुवात केली. त्यांच्याकडे हत्यारेही होती. तरीही पोलिसांनी जीव धोक्यात घालून या चौघांच्या मुसक्या आवळल्या. सुदैवाने दगडफेकीत कोणीही जखमी नाही.तर हायवेवर झाली असती लुटमार...!जवळपास ८ दरोडेखोर हे गढी - माजलगाव महामार्गावर लुटमार करण्यासाठी भेंडखूर्द फाट्यावर दबा धरुन बसले होते. हीच माहिती पोलिसांना मिळाली. त्यांनी सापळा लावत बेड्या ठोकल्या. पोलिसांच्या वाहनाचा आवाज ऐकताच यातील चौघांनी दुचाकीवरुन पळ काढला. पोलिसांनी कारवाई केल्यामुळे लुटमारीचा मोठा गुन्हा टळला.कुलूप तोडण्यातसुंदरसिंग ‘तरबेज’बंद घराचे कुलूप तोडण्यात सुंदरसिंग हा तरबेज आहे. हा कुलूप तोडताना इतर सर्वजण रेकी करतात. दरवाजा उघडताच अर्धे आतमध्ये जातात, तर उरलेले बाहेर पहारा देतात. सर्वांकडे धारदार शस्त्रे असतात, असेही सूत्रांनी सांगितले.

टॅग्स :BeedबीडRobberyदरोडाArrestअटक