बीड : कृषी विभागाच्या सर्व योजना शेतकऱ्यांना महाडीबीटी या एकाच पोर्टलवर ऑनलाईन नोंदणीद्वारे मिळणार आहेत. सर्व योजनांचा लाभ घेण्यासाठी शेतकऱ्यांना ३१ डिसेंबर पर्यंत नोंद करता येणार आहे. आजपर्यंत विविध योजनेच्या लाभासाठी जिल्ह्यातील ५७ हजार २४३ शेतकऱ्यांनी नोंद केली आहे.
महाराष्ट्र शासन कृषी यांत्रिकीकरण उपअभियानाअंतर्गंत वर्ष २०२०-२१ या आर्थिक वर्षातील योजनेचा लाभ घेण्यासाठी महाडीबीटी पोर्टवरून अर्ज मागवले जात आहेत. यामध्ये शेतकऱ्यांना उपयुक्त असलेल्या सर्व योजनांचा लाभ एकाच संकेतस्थळावरून दिला जाणार आहे. पुर्वी शेतकऱ्यांना प्रत्येक योजनेच्या लाभासाठी वेगवेगळा अर्ज ऑफलाईन किंवा ऑनलाईन पद्धतिने करावा लागत होता. त्यामुळे शेतकऱ्यांचा खर्च व वेळ दोन्ही जास्तीचा लागत होता. वेळ व पैसे वाचवण्यासाठी राज्य शासनाने एकाच अर्जावर सर्व लाभ देण्याचा निर्णय घेतला आहे. याला शेतकऱ्यांमधून देखील चांगला प्रतिसाद मिळत आहे. महाडीबीडीच्या संकेतस्थळावर अर्ज करण्याची अंतीम तारीख जवळ आली असून, जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी लाभ घेण्यासाठी संकेतस्थळावर जाऊन अर्ज भरावा असे आवाहन कृषी विभागाच्या वतीने करण्यात आले आहे.
शेतकऱ्यांना काही अडचणी आल्यास कृषी सहाय्यक, कृषीपर्यवेक्षक, मंडळ कृषी अधिकारी यांच्याशी संपर्क शेतकऱ्यांनी संपर्क करावा जेणेकरून अर्ज भरताना अजचणी येणार नाहीत असे देखील कृषी विभागाने कळवले आहे.
कशी कराल नोंदणी
विविध योजनांचा लाभ घेण्यासाठी शेतकऱ्यांनी महाडीबीटी www.mahadbtmahait.gov.in या संकेतस्थळावर जाऊन नोंदणी करावी. यासाठी सातबारा उतारा, ८ अ उतारा, आधार कार्ड, बॅंक पासबूक, अ.जाती-जमाती च्या लाभार्थी यांनी जातीचा दाखला व आधारशी संलग्न असलेला मोबाईल क्रमांक सोबत ठेवावा. आपल्या जवळच्या सेतू सुविधा केंद्रावरून हे अर्ज करता येणार आहेत.
कृषी अधिकाऱ्याचा कोट
शेतकऱ्यांनी महाडीबीटी पोर्टलवर योजनांचा लाभ घेण्यासाठी जास्तीत जास्त नोंदणी करावी. काही अडचणी आल्यास कृषी सहाय्यक, मंडळ कृषी अधिकारी व तालुका कृषी अधिकाऱ्यांशी संपर्क करावा अर्ज करण्याची अंतीम तारीख ३१ डिसेंबर असणार आहे.
सुभाष साळवे, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी (प्रभारी)
शेतकऱ्याचा कोट
शासनाने महाडीबीटी या एकाच पोर्टलवरून सर्व योजनांचा लाभ देण्याचा निर्णय घेतला आहे. यामुळे शेतकऱ्यांचा वारंवार होणारा त्रास कमी होणार आहे. परंतु, नोंदणी करण्याची तारीख वाढवणे गरजेचे आहे. तसेच गावातील कृषी सहाय्यक, पर्यवेक्षक व मंडळ कृषी अधिकारी म्हणावे तेवढे सहकार्य करत नसल्याच्या शेतकऱ्यांच्या तक्रारी आहेत. त्यांनी देखील शेतकऱ्यांशी संवाद साधून जास्तीत जास्त अर्ज दाखल कसे होतील याकडे लक्ष द्यावे
कुलदीप करपे, स्वाभिमानी शेतकरी संघटना पक्ष जिल्हाध्यक्ष
या योजनांसाठी एकच अर्ज
शेतकऱ्यांसाठी उपयुक्त असलेल्या योजनांचा लाभ या नोंदणीद्वारे मिळणार आहे. यामध्ये ट्रॅक्टर व ट्रॅक्टरचलीत यंत्र तसेच अवजारे, पॉवर टिलर आणि कांदाचाळ, शेततळे, अस्तरीकरण, ठिबक, तुषार संच, भाऊसाहेबर फुंडकर फळबाग लागवड, सेडनेट, पॉलीहाऊस, मल्चिंग यासह इतर योजनांचा लाभ नोंदणीनंतर मिळणार आहे.