शहरं
Join us  
Trending Stories
1
तीन विधेयकांवरून तुफान गोंधळ; विराेधकांनी प्रती फाडल्या, विधेयके संयुक्त समितीकडे पाठविली
2
मोनो ‘ओव्हरलोड’ झाल्यास थांबणार! अधिक प्रवासी झाल्यास गाडी पुढे न सोडण्याचा निर्णय
3
आता जीवन विम्यासह आरोग्य विमा होणार स्वस्त; सरकार मोठा दिलासा देण्याच्या तयारीत
4
पावसाची डबल सेंच्युरी; २४ तासांत २०९ मिमी नाेंद; आता ‘ऑल टाइम रेकॉर्ड’ मोडण्याच्या मार्गावर
5
'मोनोरेल'कडे आपत्कालीन बचाव यंत्रणाच नाही; क्षमता फक्त गाडी ओढून स्थानकात नेण्याची!
6
भाड्याच्या जागेतील सरकारी कार्यालये पुढील वर्षी वडाळ्यात; GST भवनात करणार सगळ्यांची व्यवस्था
7
मका वाचवण्यासाठी कुंपणातून सोडलेला करंट ठरला काळ; एकाच कुटुंबातील ५ जणांचा मृत्यू
8
वादळात सहा बोटी बुडाल्या; मुंबई, गुजरातमधील सात खलाशी बेपत्ता, ११ जणांना वाचविले
9
मोनोच्या सात गाड्या दिरंगाईच्या फेऱ्यात; चाचण्या सुरू असल्याचा ‘एमएमएमओसीएल’चा दावा
10
तुमच्या आकांसमोर झुकू नका, सॅलरी कापणार नाहीत; सुप्रीम कोर्टाने केली IPS अधिकाऱ्याची कानउघडणी
11
चुकीचा निवडणूक डेटा पोस्ट करणं संजय कुमारांना भोवलं; महाराष्ट्र निवडणूक आयोगाची मोठी कारवाई
12
वासनांध भोंदूबाबाचा प्रताप, महिलेसोबत अश्लील कृत्य; तंत्रमंत्राने कुटुंबियांना भस्म करण्याची धमकी
13
पाकिस्तानची झोप उडणार! ५ हजार किमी रेंज असणाऱ्या 'अग्नी ५' मिसाइलची भारतानं केली यशस्वी चाचणी
14
राजधानी दिल्ली तिहेरी हत्याकांडानं हादरली; एकाच घरात ३ मृतदेह सापडले, कारण समजताच पोलीस हैराण
15
ODI Rankings मध्ये गडबड घोटाळा! ICC चा रिव्ह्यू अन् टॉप ५ मध्ये पुन्हा झळकलं रोहित-विराटचं नाव
16
अमेरिकेत ५ तास थांबणे व्लादिमीर पुतिन यांना महागात पडले! डोनाल्ड ट्रम्प यांनी २.२ कोटी आकारले; नेमके प्रकरण काय?
17
खराब अन् खड्डेमय रस्त्यांसाठी टोल घेणे योग्य नाही; सुप्रीम कोर्टाचा ऐतिहासिक निर्णय
18
रुग्णालयाने भरती करण्यास दिला नकार, 12 वर्षाच्या मुलाने बापाच्या खांद्यावरच सोडला जीव
19
जिओ वापरकर्त्यांसाठी वाईट बातमी! दररोज १.५ जीबी डेटासह ८४ दिवसांचा प्लॅन बंद
20
'मी अटक होण्यापूर्वीच राजीनामा दिला होता', अमित शाहांनी सोडलं मौन; वादाचा मुद्दा काय?

परळी थर्मलमध्ये क्षमतेएवढ्या वीजनिर्मितीचा विक्रम; भर उन्हाळ्यात तीनही संच सुरळीत चालू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 27, 2023 14:09 IST

तीनही संच सुरळीत चालू झाले आहेत. या संचातून ७५० मेगावॅट एवढी वीजनिर्मिती चालू आहे.

परळी (जि. बीड) : मराठवाड्यातील एकमेव औष्णिक विद्युत केंद्र असलेल्या नवीन परळी औष्णिक विद्युत केंद्रातील भर उन्हाळ्यात तीनही संच सुरळीत चालू असून या तीन संचांतून स्थापित क्षमतेएवढी वीजनिर्मिती बुधवारी दुपारी पाचच्या सुमारास झाली. एकूण ७५० मेगावॅट क्षमतेच्या तिन्ही संचांतून ७५० मेगावॅट एवढ्या विजेचे उत्पादन बुधवारी चालू होते तर मंगळवारी तीन संचांतून ७५५ मेगावॅट म्हणजे क्षमतेपेक्षा जास्त वीजनिर्मिती झाली.

परळी औष्णिक विद्युत केंद्राचे मुख्य अभियंता प्रफुल भदाने यांनी पाच महिन्यांपूर्वी येथील सूत्रे स्वीकारली. स्वतः विद्युत केंद्रात आठ तासांपेक्षा जास्त वेळ देऊन विद्युत केंद्राचा चेहरा मोहरा बदलून टाकला. सर्व विभागप्रमुख ,अभियंता ,केमिस्ट तंत्रज्ञ व कंत्राटी कामगारांना सोबत घेऊन वीजनिर्मिती वाढविण्यावर भर दिला आणि या सर्वांच्या प्रयत्नांना यश आले. तीनही संच सुरळीत चालू झाले आहेत. या संचातून ७५० मेगावॅट एवढी वीजनिर्मिती चालू आहे.

नवीन परळी औष्णिक विद्युत केंद्रात २५० मेगावॅट क्षमतेचे अनुक्रमे संच क्रमांक ६,७ व ८ हे तीन संच आहेत. या तीन संचांतून एकूण ७५० मेगावॅट एवढी वीजनिर्मिती होत आहे. मार्चमध्ये ६३० मेगावॅट वीजनिर्मिती होत होती. संच क्रमांक ८ मध्ये कंडेशनर व्हॅक्युमचा अडथळा होता तो मुख्य अभियंता भदाने यांच्या मार्गदर्शनाखाली दूर झाला आहे. जलप्रक्रिया विभागाचा पदभार दिनेश कदम यांच्याकडे सोपविला. सर्व टीमने तेथील समस्या दूर करून संच क्रमांक ८ मधील वीजनिर्मिती वाढविण्यावर भर दिला. या संचातून १५० मेगावॅटच्या पुढे वीज निर्मिती होत नव्हती, तसेच हा संच अधनूमधून बंद पडत होता. आता हा संच सुरळीत चालू असून २५० मेगावॅट वीजनिर्मिती होत आहे.

सर्वांच्या प्रयत्नांतून वीजनिर्मिती वाढलीजास्तीत जास्त कोल मिल उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. ऑपरेशन व मेंटेनन्स विभागात बदल घडून आणला, परळी औष्णिक विद्युत केंद्राचे मुख्य अभियंता प्रफुल्ल भदाने, विद्युत केंद्राचे सर्व विभागप्रमुख, केमिस्ट, अभियंता, कंत्राटी कामगार हे झपाटून काम करत असल्याने परळी विद्युत केंद्राने क्षमतेएवढी वीज निर्मिती करून एक विक्रम केला आहे.- अंकुश जाधव, केंद्रीय उपाध्यक्ष, इंटक फेडरेशन, परळी.

टॅग्स :Beedबीडelectricityवीज