शहरं
Join us  
Trending Stories
1
Vaibhav Suryavanshi : १४ वर्षांच्या पोराचा धुमाकूळ! सिक्सर मारत ठोकली IPL मधील विक्रमी सेंच्युरी
2
विद्यार्थ्यांच्या मनामनात रुजणार भारतीय संविधानाची मूल्ये; नागपूर विद्यापीठाने तयार केला अभ्यासक्रम
3
वेटिंगवाल्या प्रवाशांचा चक्क लिनन बॉक्समधून प्रवास! रेल्वे पोलिसांनी सहा जणांना केली अटक
4
IPL 2025 : वैभव सूर्यंवशीच्या ऐतिहासिक खेळीच्या जोरावर २०० पारच्या लढाईत राजस्थानचा 'रॉयल' विजय
5
विविध रेल्वे गाड्यांमधून दारूच्या एकूण १० हजार बाटल्या जप्त! मद्य तस्करीविरोधात मोठी कारवाई
6
लातूर जिल्ह्यातील हाडोळती येथे युवकाच्या खून प्रकरणी न्यायालयाकडून दाेघांना पोलीस काेठडी
7
नागरिकत्व पाकिस्तानी, मात्र 'दिल हिंदुस्थानी'! उल्हासनगरात २५० जण 'भारतीय' होण्याच्या प्रतीक्षेत
8
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
9
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
10
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
11
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
12
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
13
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
14
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
15
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय
16
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय
17
मुलगी आयएएस अधिकारी झाली, आनंदोत्सवात वडिलांना ह्रदयविकाराचा झटका
18
युरोपात ब्लॅकआउट! फ्रान्स, स्पेनसह अनेक देशांमध्ये वीजपुरवठा खंडित; विमान, मेट्रोसेवा ठप्प
19
पहलगाम हल्यानंतर जम्मू-काश्मीरमध्ये ट्रेकिंगवर बंदी; पर्यटकांसाठी सूचना जारी...
20
Vaibhav Suryavanshi Fastest Fifty :..अन् वैभव सूर्यंवशीनं रचला नवा इतिहास

फाइव्ह ट्रिलियन डॉलर अर्थव्यवस्थेसाठी तयार आहात का?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 19, 2019 00:55 IST

फाईव्ह ट्रिलियन डॉलर अर्थव्यवस्थेसाठी बॅँका तयार आहेत काय? सार्वजनिक क्षेत्रातील बॅँकाच्या कामकाजाचे विश्लेषण तसेच सुधारणेसाठी उपाय याबाबत भारत सरकारने तयार केलेल्या प्रणाली अंतर्गत बीडमध्ये भारतीय स्टेट बॅँकेच्या क्षेत्रीय कार्यालयात शनिवार आणि रविवार या सुटीच्या दिवशी चर्चा सत्राचे आयोजन केले होते.

लोकमत न्यूज नेटवर्कबीड : फाईव्ह ट्रिलियन डॉलर अर्थव्यवस्थेसाठी बॅँका तयार आहेत काय? सार्वजनिक क्षेत्रातील बॅँकाच्या कामकाजाचे विश्लेषण तसेच सुधारणेसाठी उपाय याबाबत भारत सरकारने तयार केलेल्या प्रणाली अंतर्गत बीडमध्ये भारतीय स्टेट बॅँकेच्या क्षेत्रीय कार्यालयात शनिवार आणि रविवार या सुटीच्या दिवशी चर्चा सत्राचे आयोजन केले होते.या दोन दिवसीय कार्यक्रमात विविध क्षेत्रातून प्राप्त माहितीच्या आधारावर अर्थव्यवस्थेमध्ये एमएसई, निर्यात, रिटेल, किरकोळ, कृषी आदी क्षेत्रात कर्ज स्तर वाढविण्यासाठी चर्चा करण्यात आली. फाईव्ह ट्रिलियन डॉलरची अर्थव्यवस्था करण्यासाठी सक्षम संसाधने तयार करणे, डिजिटल पेमेंट पद्धती, प्रोद्योगिकी साधनांचा उपयोग वाढविणे या विषयांवर बॅँक अधिकाऱ्यांनी चर्चा केली.या चर्चासत्रात बॅँक व्यवस्थेला जनकेंद्रीत बनविणे, ज्येष्ठ नागरिक, शेतकरी, लघु उद्योजक, उद्योजक, व्यावसायिक, युवा वर्ग, विद्यार्थी, महिला तसेच सर्व हितधारकांच्या अपेक्षा आणि गरेजनुसार त्याला अनुकूल करण्याविषयी चर्चा करण्यात आली. मुलभूत सुविधा, व कर्ज सहायता, शेती, हरित अर्थव्यवस्था, स्वच्छ भारत, वित्तीय समावेशन, महिला सशक्तीकरण, प्रत्यक्ष लाभ अंतरण, डिजिटल अर्थव्यवस्था, रोख रकमेचा कमी वापर, राहणीमानात सहजपणा व कार्पोरेट सामाजिक दायित्व यावर बॅँकांनी केलेल्या कार्याचे विश्लेषण करण्यात आले. तसेच राष्टÑीय उद्देशांच्या प्राधान्यानुसार व गरजांबद्दल साधक-बाधक सविस्तर चर्चा करण्यात आली. दोन दिवसीय चर्चासत्रामध्ये जिल्हाभरातील एसबीआयच्या ४८ शाखांचे व्यवस्थापक सहभागी झाले ोते.बॉटम टू टॉप अभ्यासानंतर ठरणार पुढील दिशाया चर्चेतून सार्वजनिक क्षेत्रातील बॅँका विशेषत: भारतीय स्टेट बॅँकेला अधिक उत्कृष्ट बनविण्यासाठी व भविष्यातील दिशा ठरविण्यासाठी आवश्यक नवीन सूचना, सुधारणांबाबतही चर्चेत सहभागी अधिकाऱ्यांनी मत मांडले.चर्चासत्रातून आलेला गोषवारा एकत्रित करुन राज्य स्तरावरील बॅँकर्स समितीच्या परिमंडळ कार्यालयास पाठविण्यात आला. यात शाखानिहाय तुलनात्मक कामकाजाची व रचनेची माहिती देण्यात आली.राज्य स्तरावरील बॅँकर्स समितीमध्ये चर्चा झाल्यानंतर याची अंतीम स्वरुपातील चर्चा राष्टÑीय स्तरावर होऊन बॅँकांकडून प्राप्त शिफारशी, सूचनांच्या आधारावर पुढील दिशा ठरविली जाणार आहे.

टॅग्स :Economyअर्थव्यवस्थाBanking Sectorबँकिंग क्षेत्र