शहरं
Join us  
Trending Stories
1
प्रत्येक भारतीयाच्या डोक्यावर १.३२ लाखांचे कर्ज; ...तर कराचा बोजा अधिक वाढेल
2
२७ टक्के ओबीसी आरक्षणासह नव्या प्रभाग रचनेनुसार निवडणुका; पालिका निवडणुकांबाबतच्या दोन याचिका सर्वोच्च न्यायालयाने फेटाळल्या
3
PPF नाही, पैसे छापण्याची मशीन! दरवर्षी मिळेल ₹२,८८,८४२ चं जबरदस्त व्याज, पाहा सिक्रेट ट्रिक
4
महिलेचा दोन महिन्यांपूर्वी मृत्यू, मुलगा वापरत होता आईचं युपीआय अन् अचानक खात्यात आले अरबो रुपये!
5
आजचे राशीभविष्य, ०५ ऑगस्ट २०२५: अनपेक्षित यश, अडकलेले पैसे मिळतील; चौफेर लाभ
6
गजलक्ष्मी समसप्तक योगात रक्षाबंधन: १० राशींना लॉटरी, सुख-सुबत्ता; भरभराट-भाग्योदय, वरदान काळ!
7
नोकरीत बिहारींचा पहिला हक्क; नवे ‘डोमिसाइल’ धोरण जाहीर
8
आरोप करणाऱ्या देशांनी आधी स्वतःकडे बघावे! ट्रम्पच्या टॅरिफ धमकीला सरकारचे थेट उत्तर
9
टॉयलेटमध्येही फोन वापरता? मग त्याला किती वेळा स्वच्छ ठेवता? धोका आधीच जाणून घ्या!
10
गरिबांसाठी भिडणाऱ्या, लढणाऱ्या नेत्याची एक्झिट, आदिवासींच्या हक्कांसाठी शिबू सोरेन यांनी दिला लढा
11
भारत अमेरिकेला फसवतोय, युक्रेन युद्धाला मदत करतोय
12
आम्ही दोघे भाऊ २० वर्षांनी एकत्र आलो, तुम्ही का भांडता? राज ठाकरेंनी पहिल्यांदा केले एकत्र येण्यावर भाष्य
13
‘चीन’वरून जुंपली : ‘गलवान’नंतर चीनबाबत सरकारने दिशाभूल केली, काँग्रेसचा हल्लाबोल
14
सच्चे भारतीय असाल, तर असे बोलणार नाहीत; राहुल गांधींना सुप्रीम कोर्टाने सुनावले; दिलासाही दिला
15
टीम इंडियाने दिला नवा मंत्र : BELIEVE...; भारताने ६ धावांनी मिळवलेल्या थरारक विजयाची कारणे, ६ प्रश्नांच्या उत्तरांमध्ये
16
"भारतावर टीका करणारे देशच रशियासोबत व्यापार करताहेत"; ट्रम्प यांना भारताने दाखवला आरसा, आकडेवारीसह सुनावले
17
"...त्यामुळे मी भारतावरील टॅरिफ भरपूर वाढवणार आहे"; अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचा पुन्हा इशारा
18
DSP सिराजचा ऑन ड्युटी फॉर्म्युला! सर्वाधिक विकेट्स अन् १००० पेक्षा अधिक चेंडू टाकण्याचा मोठा पराक्रम
19
धक्कादायक! नागपुरात भर रस्त्यावर महिला पोलिसाला मारहाण करत विनयभंग

२०१९ च्या लढाईसाठी सरसेनापतीची पुन्हा जुळवाजुळव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 2, 2018 00:43 IST

आगामी २०१९ च्या विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिवसंग्रामचे संस्थापक, ‘सरसेनापती’ आ. विनायक मेटे यांनी दोन पावले मागे येत पुन्हा एकदा विस्कटलेली घडी सुधारण्यासाठी मावळ्यांची जमवाजमव करण्यास सुरुवात केली आहे.

सतीश जोशी । लोकमत न्यूज नेटवर्कआगामी २०१९ च्या विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिवसंग्रामचे संस्थापक, ‘सरसेनापती’ आ. विनायक मेटे यांनी दोन पावले मागे येत पुन्हा एकदा विस्कटलेली घडी सुधारण्यासाठी मावळ्यांची जमवाजमव करण्यास सुरुवात केली आहे. बीड जिल्ह्याच्या पालकमंत्री पंकजा मुंडे यांच्याशी झालेल्या ताणाताणीनंतर मध्यंतरी विनायक मेटे एकाकी पडले होते, त्यांना बीड जिल्ह्यातच एकाकी पाडण्याचा प्रयत्न मित्रपक्ष असलेल्या भाजपाने केला होता. बेलगावच्या रस्ता विकासकामांच्या भूमीपूजन कार्यक्रमात मेटेंचे खंदे समर्थक तथा शिवसंग्रामच्या युवा आघाडीचे प्रदेशाध्यक्ष राजेंद्र मस्के यांना सरसेनापतीविरुद्धच बंडखोरी करण्यास प्रवृत्त केले होते. मस्के यांच्या जि.प. सर्कलमधील कामांसाठी पालकमंत्री पंकजा यांनी जवळपास १४ कोटी रुपयांचा भरीव निधी दिला होता. पालकमंत्र्याच्या मर्जीशिवाय जिल्ह्यातील विकासकामांसाठी दमडीही मिळत नाही, हे मस्के यांनीही ओळखून ही बंडखोरीची उडी मारली. शिवाय विधानसभा २०१९ साठी भाजपाकडून बीड उमेदवारीचे ‘आश्वासन’ मिळाले होते. यानंतर पंकजा मुंडे आणि विनायक मेटे यांच्यातील राजकीय वाद आणखी भडकला. दुष्काळ आढावा बैठकीसाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस १२ नोव्हेंबर रोजी बीड जिल्हा दौऱ्यावर आल्यानंतर एक-दीड महिना अलिप्त राहिलेले मेटे हे पुन्हा सक्रिय झाले. आढावा बैठकीसाठी मेटे हे मुख्यमंत्र्यांच्या गाडीतून गेले. विशेष म्हणजे या गाडीत त्यांच्यासोबत पालकमंत्री पंकजा मुंडे, खा. डॉ. प्रीतम मुंडे आणि आ.विनायक मेटे हे तिघेही मागच्या सिटवर बसले होते. भाजपा आणि शिवसंग्राममध्ये वाद नसून सर्वकाही आलबेल आहे, असा संदेश यानिमित्ताने मुख्यमंत्र्यांनी जिल्ह्याला दिला असावा.मुख्यमंत्र्यांच्या या बीड बैठकीनंतर विनायक मेटे अधिक सक्रिय झाले. ग्रामीण भागातील संपर्क दौरे, बैठका वाढविल्या. शिवसंग्रामच्या विचारांच्या तरुणांना एकत्र आणून २०१९ च्या विधानसभा निवडणुकीसाठी जुळवाजुळव सुरू केली. गणेश बजगुडे यांच्या शिवक्रांती संघटनेचे थाटामाटात शिवसंग्राममध्ये विलिनीकरण केले. शिवक्रांतीच्या मावळ्यामुळे शिवसंग्रामची युवाशक्ती वाढली. जिल्ह्यातील शिवसेनेचे सरदार राम मंदिरासाठी अयोध्यात असताना शिवसेनेला सुरुंग लावताना नाराज शिवसैनिक सुदर्शन धांडे, नारायण काशीद, नवनाथ प्रभाळे, कल्याण जाणवळे यांच्यासह अनेकांना शिवसंग्राममध्ये प्रवेश देऊन ताकद वाढविली. काकू-नाना आघाडीचे मधुकर डोईफोडे, कृष्णा डोईफोडे, भीमा खाडे, लक्ष्मण डोईफोडे यांनाही शिवसंग्राममध्ये प्रवेश दिला. कार्यकर्ता छोटा की मोठा हे न बघता मेटेंची ही जमवाजमव त्यांच्या सक्रियतेची पावती आहे. झालेल्या चुका सुधारण्याचा त्यांचा हा प्रयत्न भविष्यात त्यांना निश्चितच लाभदायक ठरणारा आहे. पंकजा मुंडे आणि विनायक मेटे या दोघांनाही एकमेकातील वाद परवडणारे नाहीत. आगामी लोकसभेच्या तोंडावर शिवसंग्रामची नाराजी भाजपाला महागाची पडू शकते तसेच विधानसभेच्या बीड मतदार संघात विनायक मेटेंना भाजपाची, मुंडे भगिनीची गरज पडणार आहे. त्यासाठी मेटेंना लोकसभा निवडणुकीत मुंडे भगिनीच्या मागे शिवसंग्रामची ताकद लावावी लागेल.

टॅग्स :BeedबीडPankaja Mundeपंकजा मुंडेVinayakrao Patilविनायकराव पाटील