शहरं
Join us  
Trending Stories
1
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
2
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
3
Stock Markets Today: Sensex मध्ये ७५० अंकांची मोठी घसरण, निफ्टी २०० अंकांनी घसरला; ऑटो-रियल्टी इंडेक्स १-१ टक्क्यांनी घसरले
4
‘भळाभळा रक्त वाहत होते, पण तो…’ ट्रम्प यांनी सांगितली इराणमध्ये अडकलेल्या ‘त्या’ सैनिकाच्या शौर्याची कहाणी  
5
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपटेड? पटापट चेक करा
6
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
7
'आमच्या बाई आम्हाला परत द्या', विद्यार्थ्यांचा टाहो; जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनासमोर चिमुरड्यांचा ठिय्या
8
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
9
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
10
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
11
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
12
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
13
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
14
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
15
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
16
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
17
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
18
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
19
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
20
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
Daily Top 2Weekly Top 5

राशनवरील धान्य तीन किलोने कमी; गोडाऊनमध्येच मापात पाप असल्याचे दुकानदारांचे म्हणणे...

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 23, 2025 17:53 IST

एका कट्ट्यात तीन किलो धान्य कमी येत असल्याच्या ग्रामस्थांच्या तक्रारी

माजलगाव ( बीड) : स्वस्त धान्य दुकानातील बॅगमध्ये निर्धारित पेक्षा धान्याचे वजन कमी असल्याचे तालुक्यातील देपेगाव येथे ग्रामस्थांना निदर्शनास आले आहे. दोन ते तीन किलो धान्य कमी मिळत असल्याचे वजन केल्यानंतर स्पष्ट झाल्याने ग्रामस्थांनी संताप व्यक्त करत धान्य घोटाळा करणाऱ्यांवर गुन्हे दाखल करण्याची मागणी केली आली. याबाबत शेतकरी कामगार पक्षाचे नेते भाई ॲड. नारायण गोले पाटील यांच्या नेतृत्वात ग्रामस्थांनी प्रशासनाला जाब विचारात दोषींवर गुन्हे दाखल करण्याची मागणी केली.

तालुक्यातील देपेगाव ग्रामस्थांनी राशन कमी मिळत असल्याबाबत तक्रारी करूनही पुरवठा विभागाचे याकडे दुर्लक्ष करण्यात आले. त्यामुळे गावकऱ्यांनी शेतकरी कामगार पक्षाचे नेते भाई ॲड. नारायण गोले पाटील यांच्या नेतृत्वात राशन दुकानावरील धान्यांच्या बॅगच्या वजनाबाबत जाब विचारला. यावेळी दुकानदार गंगाधर गिरी यांनी सांगितले की, आम्हाला गोडाऊन मधूनच अडीच ते तीन किलो धान्य कमी येते, आम्ही काही बोलायला गेलो तर आम्हाला धान्य दिले जात नाही. यामुळे माहित असूनही आम्हाला गप्प बसण्याची वेळ येते असल्याचे स्पष्टीकरण गिरी यांनी दिले. 

दोन ते तीन किलो धान्य कमीयावेळी इलेक्ट्रिक वजन काट्यावर राशनच्या गहू आणि तांदळाच्या बॅगचे वजन ग्रामस्थांनी केले. अनेक बॅगमध्ये दोन ते तीन किलो पेक्षा कमी माल असल्याचे निदर्शनास आले. याबाबत तहसील प्रशासनातील  अधिकारी विकास बळवंत यांच्याशी ॲड.  गोले  यांनी भ्रमणध्वनीवर संपर्क साधला. कमी असलेले राशन पुढच्या खेपेला देऊ असे बळवंत यांनी सांगितले. यावर जर तुम्ही कमी पडलेले धान्य देत असाल तर तुम्ही काढून घेतले आहे.. तुम्ही देणार नसाल तर ते नेमके कुठे गेले आहे..? असा सवाल यावेळी उपस्थित करण्यात आला.

फौजदारी गुन्हे दाखल करावेत माजलगाव तहसील अंतर्गत मोठ्या प्रमाणात राशन घोटाळा सुरु असल्याचे दिसून येत आहे. तहसीलदार यांनी ही बाब हसण्यावर नेली. घोटाळा करणाऱ्यांवर गुन्हे दाखल करून तात्काळ कारवाई करावी. अन्यथा आंदोलन करण्यात येईल.- ॲड. नारायण गोले पाटील ,नेते शेकाप

अहवाल देण्यास सांगितलेमाझ्याकडे काही लोकांच्या तक्रारी आल्या होत्या. पुरवठा विभागाच्या तहसीलदार प्राची ठाकूर यांना अहवाल देण्यास सांगितले आहे. - संतोष रुईकर , तहसीलदार, माजलगाव

टॅग्स :Beedबीड