शहरं
Join us  
Trending Stories
1
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
2
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
3
Abhishek Banerjee : "बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून..."; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
4
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
5
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
6
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
7
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
8
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
9
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
10
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
11
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
12
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
13
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
14
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
15
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
16
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
17
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
18
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
19
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
Daily Top 2Weekly Top 5

अत्याचाराच्या जबर मानसिक धक्क्यातून विवाहितेने केली आत्महत्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 26, 2020 14:06 IST

ही घटना परळी तालुक्यातील एका गावात २४ फेब्रुवारी रोजी रात्री घडली. 

ठळक मुद्देआत्महत्येपूर्वी केला होता पतीला फोन 

बीड/परळी : एका विवाहित महिलेवर बळजबरीने अत्याचार करण्यात आला. या अपमानातून सदर विवाहितेने विष प्राशन करून आत्महत्या केली. ही घटना परळी तालुक्यातील एका गावात २४ फेब्रुवारी रोजी रात्री घडली. 

संबंधित महिलेचा पती बाहेरगावी राहतो. याचा गैरफायदा घेऊन गावातील राम ऊर्फ माउली लक्ष्मण नवघरे याने २४ फेब्रुवारी रोजी रात्री १० ते ११ वा. च्या सुमारास घरात घुसून तिच्यावर अत्याचार केला. यामुळे सदर विवाहितेने विष प्राशन करुन आत्महत्या केली. या फिर्यादीवरून आरोपीविरोधात मंगळवारी ग्रामीण पोलिसांत गुन्हा दाखल झाला आहे. आरोपीच्या शोधात पथके रवाना करण्यात आल्याची माहिती पोलीस अधीक्षक हर्ष पोद्दार यांनी दिली.

आत्महत्येपूर्वी केला होता पतीला फोन सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार पीडितेने अत्याचारानंतर रात्री पतीला फोन करून यासंदर्भात माहिती दिली होती. तसेच हा मनस्ताप सहन होत नसून आपण आत्महत्या करत असल्याचे देखील पतीला सांगितले होते. त्यानंतर फोन ठेवून विष प्राशन करत विवाहितेने आत्महत्या केली. 

टॅग्स :Rapeबलात्कारSuicideआत्महत्याBeedबीडWomenमहिला