शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

कुंटणखान्यावर छापा; दोन पीडितांची सुटका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 23, 2019 00:08 IST

पैशाचे आमिष दाखवून महिलांकडून वेश्या व्यवसाय करून घेणाऱ्या आंटीला शिवाजीनगर पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. तिच्या ताब्यातून दोन पीडित महिलांची सुटका करण्यात आली आहे.

ठळक मुद्देआंटी जाळ्यात : शिवाजीनगर पोलिसांची कारवाई

बीड : पैशाचे आमिष दाखवून महिलांकडून वेश्या व्यवसाय करून घेणाऱ्या आंटीला शिवाजीनगर पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. तिच्या ताब्यातून दोन पीडित महिलांची सुटका करण्यात आली आहे. ही कारवाई मंगळवारी दुपारी बीड शहरातील संत कबीर नगर भागात करण्यात आली. याप्रकरणी शिवाजीनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.सुजाता गवळी (३५ रा.बीड) असे पकडलेल्या आंटीचे नाव आहे. बीड शहरातील संत कबीरनगर भागातील भागातील एका खासगी शाळेसमोर निवृत्त शिक्षकाचे घर आहे. या शिक्षकाच्या घरी किरायाने आंटीने एक खोली घेतली होती. सुजाता महिलांना घरी बोलावून त्यांच्याकडून वेश्याव्यवसाय करवून घेत असल्याची माहिती शिवाजीनगर ठाण्याचे पोलीस निरीक्षक शिवलाल पुरभे यांना मिळाली होती. त्यावरुन मंगळवारी दुपारी एका पंटरला सोबत घेऊन पोलसांनी छापा टाकला. पंटरने आंटीच्या हातात तीन हजार टेकवून इशारा करताच पोलीस धडकले. त्यानंतर दोन पीडित महिलांसह आंटीला ताब्यात घेतले. पीडित महिला अंदाजे २१ ते २३ वर्षे वयाच्या असून त्या बीडमधीलच आहेत. त्यांना न्यायालयासमोर हजर केले जाणार आहे. आंटी सुजाता गवळी हिला जेरबंद करण्यात आले असून पिटा अ‍ॅक्टनुसार गुन्हा नोंद करण्यात आला. ही कारवाई पोलीस अधीक्षक जी.श्रीधर, अपर अधीक्षक वैभव कलुबर्मे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक शिवलाल पुरभे, पोलीस उपनिरीक्षक बालाजी ढगारे, शेख शंहेशाह, आर. बी. प्रधान, सतीश तरटे, पी. बी. वायभट, एस.एस.सय्यद आदींनी केली.

टॅग्स :BeedबीडSex Racketसेक्स रॅकेटBeed policeबीड पोलीस