शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताच्या कारवाईमुळे बांगलादेश खवळला, भारतीयांसाठी व्हिसा सर्व्हिस केली बंद 
2
‘बांगलादेशी आहेस का?’, केरळमध्ये परप्रांतीय तरुणाला बेदम मारहाण, रुग्णालयात मृत्यू 
3
वैभव सूर्यवंशी आणि आयुष म्हात्रेनं जशास तसे उत्तर दिलं; पण सरफराज अहमदला ते नाही दिसलं! म्हणे...
4
रशियाला युद्धादरम्यान मोठा धक्का ! सैन्याचे लेफ्टनंट जनरल सर्वारोव्हचा कार स्फोटात मृत्यू
5
सौदी अरेबियातील वाळवंटात पसरली बर्फाची चादर, अनेक वर्षांनंतर दिसलं असं चित्र, आपली पृथ्वी देतेय असे संकेत
6
बाथरूममध्ये तरुणाने प्रस्थापित केले संबंध, अतिरक्तस्त्रावाने गर्लफ्रेंडचा मृत्यू, वडिलांचे गंभीर आरोप
7
युजवेंद्र चहलने विकत घेतली आलिशान BMW Z4 कार; भारतात त्याची किंमत ऐकून धक्काच बसेल!
8
नवीन वर्षाच्या सुरूवातीला कमी हाेणार थंडीचा जोर; हवामान तज्ज्ञांनी व्यक्त केला अंदाज
9
Vijay Hazare Trophy स्पर्धेत दिसणार रोहित-विराटचा जलवा! ही जोडी कधी अन् कोणत्या मैदानात खेळणार सामना?
10
बांगलादेशातील हिंदू तरुणाच्या हत्येप्रकरणी मोठा खुलासा; ईशनिंदेचा आरोप खोटा, 'हे' होते कारण
11
महाराष्ट्रापाठोपाठ गोव्यातील निवडणुकीतही भाजपाची मुसंडी, काँग्रेसची पीछेहाट, आपचा धुव्वा
12
AI शक्तिशाली सहाय्यक, मात्र मानवी मेंदूला पर्याय नाही; सर्व तज्ज्ञांचे एकमताने शिक्कामोर्तब
13
भारतीय ऑलराउंडरची क्रिकेटच्या सर्व प्रकारातून निवृत्ती! IPL लिलावात CSK नं लावली होती विक्रमी बोली
14
"पालिका निवडणुकांमध्येही देवेंद्र फडणवीसच ‘धुरंधर’; उद्धव ठाकरे 'रेहमान डकैत"; भाजपाची टीका
15
IPL 2026: Axar Patel ला धक्का! कर्णधारपदावरून हटवलं, आता 'हा' Delhi Capitals चा 'कॅप्टन'
16
Video: उकळत्या तेलात हात घालून काढते गरमागरम पकोडे... 'समोसा गर्ल' ची रंगलीये तुफान चर्चा
17
झाडू मारण्यासाठी सॉफ्टवेअर इंजिनिअरने सोडली हाय-फाय नोकरी; आता महिन्याला १.१ लाख पगार
18
हाण की बडीव! रुग्णालयात डॉक्टर-रुग्ण भिडले, एकमेकांच्या जीवावर उठले; लाथाबुक्क्यांनी मारहाण
19
VIDEO: तुर्की संसदेत जोरदार राडा ! आधी खासदारांमध्ये बाचाबाची अन् लाथाबुक्क्यांनी हाणामारी
20
नगरपरिषद निवडणुकीतील यश भाजपाचंच की 'इनकमिंग'चं?; सुप्रिया सुळेंनी मांडला 'हिशेब'
Daily Top 2Weekly Top 5

४५ वर्षांच्या राजकीय जीवनात पहिल्यांदाच नगराध्यक्ष पदाची निवडणूक लढली अन् जिंकली

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 22, 2025 17:06 IST

मुंदडा विरुद्ध मोदी या अटीतटीच्या झालेल्या निवडणुकीत दोन्ही बाजूंनी प्रचार यंत्रणा तुल्यबळ होती.

- अविनाश मुडेगावकर

अंबाजोगाई : आपल्या ४५ वर्षांच्या राजकीय जीवनात नंदकिशोर मुंदडा हे पहिल्यांदाच नगराध्यक्ष पदासाठी निवडणूक रिंगणात उतरले व त्यांनी राजकिशोर मोदी यांचा २४९७ मतांनी पराभव केला.

मुंदडा विरुद्ध मोदी या अटीतटीच्या झालेल्या निवडणुकीत दोन्ही बाजूंनी प्रचार यंत्रणा तुल्यबळ होती. मात्र, या निवडणुकीत नंदकिशोर मुंदडा यांच्यासाठी आ. नमिता मुंदडा व अक्षय मुंदडा यांनी डोअर टू डोअर प्रचार केला. विधानसभेच्या निवडणुकीत मुंदडा यांना अंबाजोगाई शहराने कमी लीड दिल्याचे करणे शोधून मुंदडा परिवाराने या निवडणुकीत ही कसर भरून काढली. मात्र, गेल्या २५ वर्षांपासून नगरपरिषदेवर वर्चस्व असणाऱ्या राजकिशोर मोदी यांचे ३१ पैकी २० नगरसेवक निवडून येऊनही मोदी यांना पराभव पत्करावा लागला. आजपर्यंत झालेल्या निवडणुकांमध्ये प्रथमच मुंदडा विरुद्ध मोदी एकमेकांसमोर आले. यात नगराध्यक्ष पदासाठी मुंदडा यांची बाजू तुल्यबळ ठरली. मात्र, या निवडणुकीत राजकिशोर मोदी यांच्यासह त्यांचे पुत्र संकेत मोदी यांनाही नगरसेवक पदासाठी पराभवाचा सामना करावा लागला.

मुंदडा यांच्या विजयाची कारणेनंदकिशोर मुंदडा हे पहिल्यांदाच नगराध्यक्ष पदासाठी निवडणुकीस उभे राहिले.माझी ही पहिली व शेवटची निवडणूक या त्यांच्या भावनिक आवाहनाला मतदारांनी साद घातली.अंबाजोगाई शहरात आ. नमिता मुंदडा यांनी केलेली विकासकामे याचा मोठा फायदा मुंदडा यांना झाला.

पराभवाची कारणे :अक्षय मुंदडा यांनी पत्रकार परिषद घेऊन मोदींवर अनेक आरोप केले. मात्र, या आरोपांचे खंडण करण्यात मोदी कमी पडले.

गेल्या ४ वर्षांपासून नगरपरिषदेवर प्रशासक राहिल्याने मोदी नगरपरिषदेच्या राजकारणापासून दूर राहिले.सुसंगत प्रचार यंत्रणेचा अभाव राहिल्याने प्रभागात जास्त जागा मिळाल्या. मात्र, नगराध्यक्ष पदासाठी कमी मते मिळाली.

English
हिंदी सारांश
Web Title : First Mayoral Election Victory After 45 Years in Politics

Web Summary : Nandkishor Mundada won his first mayoral election after 45 years, defeating Rajkishor Modi. Strong campaigning and development works aided Mundada's victory. Modi's loss was attributed to weak rebuttals and administrative distance.
टॅग्स :Local Body Electionमहाराष्ट्र स्थानिक स्वराज्य संस्था निवडणूक निकाल २०२५Maharashtra Election Resultsमहाराष्ट्र निवडणूक निकाल २०२५Municipal Electionमहानगरपालिका - नगरपालिका निवडणूक २०२६