शहरं
Join us  
Trending Stories
1
"भारतावर टीका करणारे देशच रशियासोबत व्यापार करताहेत"; ट्रम्प यांना भारताने दाखवला आरसा, आकडेवारीसह सुनावले
2
"...त्यामुळे मी भारतावरील टॅरिफ भरपूर वाढवणार आहे"; अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचा पुन्हा इशारा
3
DSP सिराजचा ऑन ड्युटी फॉर्म्युला! सर्वाधिक विकेट्स अन् १००० पेक्षा अधिक चेंडू टाकण्याचा मोठा पराक्रम
4
धक्कादायक! नागपुरात भर रस्त्यावर महिला पोलिसाला मारहाण करत विनयभंग
5
मोबाईलसाठी रेल्वेतील प्रवाशाच्या हातावर फटका, तरुणाने गमावला पाय; २० हजार रुपयेही पळवले
6
Pahalgam Attack: ते दहशतवादी पाकिस्तानी असल्याचे लष्कराने म्हटले नाही; संरक्षण मंत्रालयाचा खुलासा
7
१२,००० सॅमसंग स्मार्टफोनने भरलेला ट्रक चोरीला गेला; चोरट्यांनी ९१ कोटींच्या वस्तू लंपास केल्या
8
IND vs ENG : एक मालिका अन् दोन मालिकावीर! गंभीरमुळं गिलसोबत हॅरी ब्रूकला मिळाला हा पुरस्कार
9
अमित शाह मोडणार देशाच्या गृहमंत्र्यांचा रेकॉर्ड! जम्मू काश्मीरबद्दल सरकार घेणार आणखी एक मोठा निर्णय?
10
मारहाण, शिवीगाळ असं काहीच घडलं नाही; पुणे पोलिसांनी मुलींचे सगळेच आरोप फेटाळले
11
'भारत आगीशी खेळत आहे'; डोनाल्ड ट्रम्प, एस. जयशंकर यांच्याबद्दल खोटी विधाने केली पोस्ट, 'एक्स'ने खातीच केली बंद
12
iPhone 16: पहिल्यांदाच आयफोन १६ च्या खरेदीवर एवढी मोठी सूट!
13
भारत रशियाला युक्रेनविरुद्ध युद्धासाठी अप्रत्यक्षपणे निधी पुरवतोय, अमेरिकेचा आरोप!
14
येमेनमध्ये निमिषा प्रियाच्या अडचणी वाढल्या! मृताच्या भावाने पत्र लिहून केली मोठी मागणी
15
Siraj, IND vs ENG: 'तो' एक शब्द अन् सिराजने फिरवला अख्खा सामना... टीम इंडियाच्या विजयानंतर उघड केलं गुपित
16
आपच्या सत्येंद्र जैन यांना दिलासा, CBIच्या क्लोजर रिपोर्टवर कोर्टाचं शिक्कामोर्तब
17
माझा 'तो' व्हिडीओ रोहित पवारांना कुणी पाठवला? मंत्री मेघना बोर्डीकर म्हणाल्या...
18
राज ठाकरेंच्या 'मराठी'नंतर नितीश कुमारांची 'बिहारी' घोषणा; शिक्षक भरतीत नोकरी बिहारींनाच मिळणार
19
Siraj, IND vs ENG: ‘पूरा खोल दिए पाशा...’; सिराजच्या 'मॅचविनिंग' गोलंदाजीवर ओवेसींची हैदराबादी शैलीत स्तुती
20
कमाल झाली राव! रशियन महिलेने सांगितली भारतीय पुरुषाशी लग्न करण्याची खास कारणं, जिंकलं मन

दरवर्षी पर्जन्यमान घटत चालल्याने गेवराई तालुक्यात पांढऱ्या सोन्याचे उत्पादन घटले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 11, 2019 00:40 IST

गेवराई तालुका हा पांढ-या सोन्यासाठी म्हणजे कापसाच्या उत्पन्नात जिल्ह्यात नंबर एकवर होता. तालुक्यात जवळपास २९ कापूस जिनिंगमार्फत कापूस खरेदीतून करोडो रुपयांची उलाढाल होऊन हजारो स्थानिक व परराज्यातील नागरिकांना रोजगार मिळत होता.

ठळक मुद्देपाच-सहा वर्षांपासून उत्पादन कमी । २९ जिनिंगपैकी मोजक्याच सुरू राहणार

गेवराई : गेवराई तालुका हा पांढ-या सोन्यासाठी म्हणजे कापसाच्या उत्पन्नात जिल्ह्यात नंबर एकवर होता. तालुक्यात जवळपास २९ कापूस जिनिंगमार्फत कापूस खरेदीतून करोडो रुपयांची उलाढाल होऊन हजारो स्थानिक व परराज्यातील नागरिकांना रोजगार मिळत होता. मात्र गेल्या काही वर्षांपासून तालुक्यात कमी पाऊस पडत असल्याने व पिकेच चांगली येत नसल्याने या दुष्काळामुळे येथील कापूस जिनिंग व्यवसाय डबघाईला आल्याने हजारो बेरोजगाराला कामे नाहीत तर अनेक जिनिंग बंद पडण्याच्या मार्गावर आहेत.बीड जिल्ह्यात पांढरे सोने म्हणून ओळखल्या जाणा-या कापूस उत्पन्नात गेवराई तालुका हा नेहमी बीड जिल्ह्यात आघाडीवर होता. तालुक्यात जवळपास २९ जिनिंग असून, या जिनिंगमार्फत तालुक्यातील व बाहेरील तालुक्यातील शेतकऱ्यांचा कापूस मोठ्या प्रमाणात खरेदी केला जात होता. त्यामुळे शेतकºयाला शासनाने ठरवून दिलेल्या हमी भावाप्रमाणे पैसे मिळत होते. यात गेल्या वर्षी तालुक्यातील जवळपास १५ जिनिंगमार्फत कापूस खरेदी झाली. याची किमंत कोटीच्या घरात होत होती. मात्र हे उत्पन्न गेल्या पाच ते सहा वर्षांत घटत चालले असल्याने यात निम्म्यापेक्षा जिनिंग अनेक वर्षांपासून पावसाचे प्रमाण कमी होत असल्याने व कापूस पिके निघत नसल्याने बंद आहेत. या सर्व जिनिंगवर तालुक्यातील व बाहेरील तालुक्यातील तसेच राजस्थान, मध्यप्रदेश राज्यातील हजारो नागरिकांच्या कुटंबाला येथे सात ते आठ महिने रोजगार मिळत होता. आता दरवर्षी पावसाचे प्रमाण कमी होत चालले आहे. या दुष्काळी परिस्थितीमुळे कापूस देखील निघणे कठीण होवून बसले आहे. त्यामुळे यावर्षी सुध्दा काही ठराविक जिनिंग चालु होतील. तसेच अजून काही भागात चांगला पाऊस पडला नसल्याने कापसाची पिके इतभर देखील वाढली नाहीत, त्यामुळे या वर्षी देखील कापूस उत्पन्नात मोठी घट तर होईलच मात्र मोजक्याच कापूस जिनिंग चालू राहिल्यास स्थानिक व बाहेरील राज्यातील नागरिकांचा रोजगाराचा प्रश्न आ करून उभा राहणार आहे. तो कसा सोडवता येईल, असा प्रश्न कामगारांपुढे पडला असल्याचे खळेगाव येथील शेतकरी मनोज शेंबडे यांनी सांगितले आहे. परराज्यातील तसेच स्थानिक व्यापाºयांनी येथे गेल्या अनेक वर्षांपासून करोडो रूपये खर्च करून कापूस जिनिंग उद्योग सुरू केला. मात्र दुष्काळी परिस्थितीमुळे जिनिंग तसेच कापूस उत्पादनावर आधारित व्यवसाय डबघाईला आल्या असल्याचे चित्र आहे. यात गेल्या अनेक वर्षांपासून १० ते १२ जिनिंग चालुच झाल्या नाही, त्या आजही बंद आहेत.यात करोडो रूपये गुंतले असल्याचे येथील व्यापारी यांनी सांगितले.

टॅग्स :BeedबीडFarmerशेतकरीcottonकापूस