शहरं
Join us  
Trending Stories
1
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
2
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
3
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
4
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
5
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
6
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
7
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
8
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
9
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
10
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
11
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
12
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
13
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
14
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
15
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
16
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
17
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
18
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
19
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
20
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
Daily Top 2Weekly Top 5

पाऊस उघडला, दिवाळीचा बाजार फुलला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 27, 2019 00:26 IST

शनिवारी पावसाने उघडीप दिल्याने व सूर्यदर्शन झाल्याने बाजारात ग्राहकांची वर्दळ मोठ्या प्रमाणावर दिसून आली.

लोकमत न्यूज नेटवर्कबीड : विधानसभा निवडणुकीच्या निकालापर्यंत शुकाशुकाट असलेल्या बाजारपेठेलादिवाळीच्या तोंडावर ग्राहकी अपेक्षित होती. मात्र, नंतरच्या दोन दिवसात जिल्ह्यात झालेल्या पावसाने बाजाराच्या आशेवर पाणी फेरले. अखेर शनिवारी पावसाने उघडीप दिल्याने व सूर्यदर्शन झाल्याने बाजारात ग्राहकांची वर्दळ मोठ्या प्रमाणावर दिसून आली.यावर्षी पावसाळी मोसमात अपुरा पाऊस झाल्याने दुष्काळी सावट होते. त्यामुळे दसऱ्याच्या वेळी बाजारपेठेत फारशी उलाढाल झाली नाही. मात्र, मागील आठवड्यात झालेल्या जोरदार पावसामुळे रबीच्या आशा उंचावल्यामुळे तसेच पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सुटणार असल्याने दिवाळीचा सण साजरा करण्यासाठी बाजारात कपडे, शोभीवंत वस्तू, दागिने, नवीन खरेदीसाठी ग्राहकांची शनिवारी दुकानांमध्ये गर्दी दिसून आली. सुभाष रोड, भाजी मंडई, कारंजा, जालना रोड, धोंडीपुरा, सिध्दीविनायक कॉम्प्लेक्स परिसर गर्दीने फुलला होता. त्याचबरोबर वारंवार वाहतुकीची कोंडी होत होती.पावसामुळे खरेदी करणे शक्य झाले नाही अशा ग्राहकांनी आकाशदिवे खरेदी केले. त्या चांगल्या प्रमाणात विक्री झाल्यामुळे व्यापाऱ्यांनीही सुटकेचा नि:श्वास टाकला. रांगोळी, पणती, गृहसजावटीचे साहित्य, फुलांच्या माळा, विद्युत रोषणाईचे साहित्य खरेदी करण्यात ग्राहक मग्न होते. बांगड्या, इमिटेशन ज्वलेरीची महिला वर्गाकडून खरेदी होत होती.फटाका बाजारात ८० दुकाने थाटलेली आहेत. सुमारे तीन कोटी रुपयांपर्यंत फटाके व्यापारी गुंतवणूक करतात. आठवडाभर पावसामुळे बाजार परिसरात चिखल साचला, तर काही व्यापा-यांचा माल भिजल्याने नुकसान झाले. यंदा ग्राहक येतील की नाही, अशी चिंता असताना शनिवारी उघडीप झाल्याने सर्वच दुकानांवर ग्राहकांची गर्दी पाहायला मिळाली.दस-याच्यावेळी गुंतवणूक करुनही दुष्काळी स्थितीमुळे कापड बाजाराकडे ग्राहक फिरकलेला नव्हता. मात्र, पाऊस झाल्याने खरिपाचे नुकसान झाले तरी रबी हंगाम चांगला जाईल आणि टंचाई मिटल्याने कापड बाजारात रेडीमेड कपडे, साड्यांच्या खरेदीसाठी ग्राहकांची पावले वळाली. बँ्रडेड कपड्यांना त्यांनी प्राधान्य दिले.

टॅग्स :DiwaliदिवाळीMarketबाजार