शहरं
Join us  
Trending Stories
1
केवळ घर नव्हे, उद्योगही चालवणार! महिलांकडील कर्ज ७६ लाख कोटींवर, २०१७पेक्षा पाचपट वाढ
2
आजचे राशीभविष्य, १० एप्रिल २०२६: कोणताही महत्त्वाचा निर्णय घेणे टाळा; प्रवास संभवतो
3
भारतात मुलांच्या मृत्यूचे १० वे कारण ठरतोय ‘कॅन्सर’; वर्षभरात १७ हजार बालकांचा मृत्यू
4
पुढील ४ आठवडे उन्हाच्या झळा; पूर्वेकडील वाऱ्यांचा प्रभाव, पारा चाळिशी पार जाण्याचा अंदाज
5
सुरुंग पेरलेला होर्मुझचा नकाशा जारी; इराणने पुन्हा भरवली जगाला धडकी; अमेरिकेवर दबाव
6
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
7
पंथ, संप्रदायांच्या आधारे मंदिरांमध्ये प्रवेश दिल्यास हिंदू धर्मावर नकारात्मक परिणाम: सुप्रीम कोर्ट
8
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
9
केरळ, आसाम व पुद्दुचेरीत विक्रमी मतदान! कुठे बोटीचा प्रवास, तर कुठे पावसातही हजेरी
10
हॅकर्स म्हणतात, युद्धविरामाशी आमचा संबंध नाही; ‘हंदाला’कडून हल्ल्याची अमेरिका-इस्रायलला भीती
11
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
12
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
13
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
14
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
15
कोण आहे Mukul Choudhary? ‘आर्मी मॅन’च्या भूमीतला २१ वर्षीय ‘जवान’ बिग हिटरच्या रुपात कसा घडला?
16
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
17
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
18
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
19
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
20
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
Daily Top 2Weekly Top 5

नुकसान भरपाईसाठी शेतकऱ्यांच्या ‘कृषी’समोर रांगा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 30, 2019 23:55 IST

बीड : जिल्ह्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे सोयाबीन, कापूस, बाजरी, मका यासह इतर पिकांचे अनेक ठिकाणी नुकसान झाले आहे. या पिकांची ...

ठळक मुद्देनुकसान झाल्यापासून ७२ तासांत द्यावा अर्ज : ग्रामपंचायत सदस्यांनी शेतकऱ्यांना मदत करावी

बीड : जिल्ह्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे सोयाबीन, कापूस, बाजरी, मका यासह इतर पिकांचे अनेक ठिकाणी नुकसान झाले आहे. या पिकांची नुकसानभरपाई मिळावी यासाठी ७२ तासाच्या आत विहित नमुन्यासह अर्ज तालुका कृषी कार्यालय, संबंधित विमा कंपनी व तहसील कार्यालयात जमा करण्याचे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले होते. याला प्रतिसाद देत प्रधानमंत्री पिक विमा योजनेचा लाभ मिळण्यासाठी तालुका कृषी कार्यालयात शेतकºयांनी रांगा लावल्या आहेत. तसेच कृषी कार्यालयाकडून देखील शेतकºयांकडून अर्ज स्वीकारले जात आहेत.खरीप हंगामाच्या सुरुवातीला पावसाने दडी मारल्यामुळे पेरणी उशिरा झाली होती. दरम्यान त्यानंतर थोड्या-थोड्या पावसावर पिकांची चांगली वाढ झाली होती. मात्र, सोयबीन, बाजरी हे पिक काढणीला आलेले असताना व कापूस देखील फुटत होता. मात्र, त्याच वेळी जिल्ह्यात अनेक ठिकाणी जोराचा पाऊस झाला त्यामुळे काढणी झालेल्या बाजरी पिकाचे तसेच सोयबीन व उभ्या कापसाचे नुकसान झाले आहे. तसेच काढणीला आलेल्या उभ्या पिकात पाणी साठून राहिल्यामुळे देखील पिकांचे नुकसान झाले आहे. त्यामुळे पिकांचे पंचनामे करुन मदत करण्याची मागणी शेतक-यांमधून केली जात होती.त्यानुसार संबंधित शेतकºयांनी विमा संरक्षित क्षेत्र जलमय झाले असेल किंवा काढणी झालेल्या पिकांचे नुकसान झाले असेल, तर नुकसानग्रस्त शेतकºयांनी वैयक्तिक पंचनामे करण्याचे आदेश शासनाने काढले आहेत. त्यानुसार शेतकºयांनी तक्रार अर्ज विहित नमुन्यासह तालुका कृषी कार्यालयात किंवा विमा कंपनीच्या प्रतिनिधीकडे जमा करण्याचे आवाहन कृषी विभागाकडून तसेच जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी राजेंद्र निकम यांनी केले आहे. तसेच गावातील ग्रामपंचायत सदस्य व तरुणांनी शेतकºयांना हा अर्ज भरण्यासाठी व आवश्यक कागदपत्राची पुर्तता करण्यासाठी मदत करावी, असे आवाहन विविध संघटनांकडून करण्यात आले आहे.टोल फ्री क्रमांक नावालाचनुकसानग्रस्त शेतक-यांनी झालेल्या नुकसानीची माहिती देण्यासाठी एक टोल फ्री नंबर देण्यात आला आहे. यावर नुकसान झाल्यापासून ४८ तासाच्या आत माहिती विमा कंपनीला देण्याचे गरजेचे आहे.तक्रारीसाठी असलेल्या हेल्पलाईन नंबरवरती प्रतिसाद मिळत नसल्यामुळे शेतकºयांच्या चिंतेत भर पडली आहे. तसेच हा हेल्पलाईन क्रमाक हा सायंकाळी ६ वाजेपर्यंत कार्यरत असल्याचे देखील सांगितले जाते, त्यामुळे शेतक-यांच्या अडचणीत वाढ होत आहे.

टॅग्स :BeedबीडAgriculture Sectorशेती क्षेत्रFarmerशेतकरी