शहरं
Join us  
Trending Stories
1
आमच्या मागणीपुढे PM मोदींना झुकावे लागले...जनगणनेच्या अधिसूचनेवरुन काँग्रेसचा निशाणा
2
बाप म्हणाला चिंता आहे, मुलगी म्हणाली मी आहे! ३ एकरांत सोयाबीन लावून मुलीची बापाला साथ
3
आता पाकिस्तान अणुबॉम्बची धमकी देण्यापूर्वी शंभर वेळा विचार करेल...! SIPRI च्या अहवालात भारताच्या अण्वस्त्रांसंदर्भात मोठा दावा
4
वृद्ध व्यक्तीला डिजिटल अरेस्ट करून नकली कोर्टात हजर केलं; घातला 'इतक्या' कोटींचा गंडा!
5
इराणचा अमेरिकेच्या दुतावासावर हल्ला अन् अमेरिकेची २८ टँकर विमाने एकाचवेळी झेपावली...
6
NPT मधून बाहेर पडण्याच्या तयारीत इराण, इस्रायलसोबत सुरू असलेल्या युद्धादरम्यान खामेनेई यांचं मोठं प्लॅनिंग?
7
कच्चे तेल ३०० डॉलरवर जाण्याची शक्यता; इराकच्या मंत्र्यांनी जर्मनीच्या कानावर घातला मोठा धोका...
8
"...तर पाकिस्तानकडे युद्धाशिवाय दुसरा पर्याय उरणार नाही!"; पाणी बंद झाल्याने बिलावल बिथरले, दिली अशी धमकी
9
माजी आमदार बच्चू कडू यांना मोठा राजकीय धक्का; जिल्हा बँकेचे अध्यक्ष म्हणून अपात्र
10
प्रेमानेच केला घात! राजावर पाठीमागून केला वार, हत्येसाठी वापरलेला चाकू पोलिसांना सापडला...
11
रितेशच्या आधी जिनिलियाचं जॉनसोबत झालं होतं लग्न? इतक्या वर्षांनी पुजाऱ्याच्या दाव्यावर अभिनेत्रीनं केला खुलासा
12
अविश्वसनीय! अहमदाबाद प्लेन क्रॅशमधून चमत्कारिकरित्या वाचलेल्या रमेश विश्वास यांचा नवा व्हिडिओ; बघा- आगीच्या ज्वाळांतून कसे आले बाहेर?
13
Mumbai Rains Live Updates: मुंबईत मुसळधार! पुढील ३ तासांसाठी रेड अलर्ट जारी, कुठे-काय परिस्थिती?
14
इस्रायलमध्ये पहिल्यांदाच इतका विनाश, इराणच्या हल्ल्यानंतर काय झालं बघाच...
15
Israel Iran War : मोठं काहीतरी घडणार! अमेरिकेचे विमानवाहू जहाज मध्य पूर्वेकडे रवाना; इस्रायल-इराण युद्ध भडकणार?
16
भारतावर पुन्हा युक्रेनसारखी परिस्थिती! १५०० विद्यार्थी इराणमध्ये अडकले; एअर इंडियालाच काहीतरी करावे लागणार...
17
सिट्रोएनने खास स्पोर्ट कार आणली; Citroen C3 चे अंतर-बाह्य रुपडे पालटले... 
18
Navi Mumbai Rains Video: नशीब बलवत्तर! एक व्यक्ती पायऱ्या उतरत होता, तितक्यात मागून नाल्याची भिंत खचली; ९ दुचाकी, टेम्पोचे नुकसान
19
'फॅण्ड्री' फेम शालूला मराठी इंडस्ट्रीतल्या ग्रुपिझमचा बसला मोठा फटका, हातातून निसटल्या मराठी मालिका
20
Shardul Thakur wife: शार्दुल ठाकूरची पत्नी मिताली आहे यशस्वी उद्योजिका; हा आहे तिचा मुख्य व्यवसाय, जाणून घ्या

आंबाजोगाईत योगेश्वरी देवीच्या दारातून मंगळसूत्र चोरणाऱ्या पुष्पाला बेड्या

By सोमनाथ खताळ | Updated: February 8, 2024 20:28 IST

एलसीबीची कारवाई : दोन तोळ्याचे गंठन केले जप्त

बीड : योगेश्वरी देवीच्या दर्शनासाठी गेलेल्या महिलेच्या गळ्यातील मंगळसूत्र लंपास करणाऱ्या महिलेला बेड्या ठोकण्यात आल्या आहेत. स्थानिक गुन्हे शाखेने बुधवारी सायंकाळी बीड शहरातील तेलगाव नाका परिसरात केली. या महिलेकडून दोन तोळ्याचे गंठनही जप्त करण्यात आले आहे.पुष्पा शिवराज बाबर (रा.नाळवंडी नाका, बीड) असे पकडलेल्या महिला आरोपीचे नाव आहे. २६ डिसेंबर २०२३ रोजी सकाळी साडे अकरा वाजेच्या सुमारास बाळासाहेब भिमराव कराड (रा.आनंदनगर, अंबाजोगाई) हे पत्नीसह योगेश्वरी देवीच्या दर्शनासाठी गेले होते.

या ठिकाणी भाविकांची मोठी गर्दी होती. याचाच फायदा घेत बाळासाहेब यांच्या पत्नीच्या गळ्यातील गंठन अज्ञात चोरट्याने लंपास केले. याबाबत अंबाजोगाई शहर पाेलिस ठाण्यात गुन्हाही दाखल झाला होता. याचा तपास स्थानिक गुन्हे शाखेने तपास सुरू केला. हे गंठन चोरणारी महिला पुष्पा असून ती सध्या बीड शहरातील तेलगाव नाका परिसरात असल्याची माहिती एलसीबीला मिळाली. त्यांनी लगेच सापळा लावून तिला ताब्यात घेतले. विचारपूस केल्यावर तिने गुन्हा केल्याची कबूली दिली.

शिवाय तिच्याकडून ४८ हजार रूपये किंमतीचे दोन तोळ्याचे गंठनही हस्तगत केले आहे. या महिला आरोपीला आता अंबाजोगाई शहर पोलिसांच्या ताब्यात दिले आहे. ही कारवाई पोलिस अधीक्षक नंदकुमार ठाकूर, अपर अधीक्षक सचिन पांडकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक संतोष साबळे व त्यांच्या पथकाने केली.