शहरं
Join us  
Trending Stories
1
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
2
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
3
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
4
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
5
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
6
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
7
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
8
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
9
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
10
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
11
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
12
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
13
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
14
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
15
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
16
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
17
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
18
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
19
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
20
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
Daily Top 2Weekly Top 5

बीड जिल्ह्यात शिक्षकांच्या तीन संवर्गातील ११ जणांना दिल्या पदोन्नत्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 21, 2018 00:55 IST

बीड येथील जिल्हा परिषद अंतर्गत शिक्षण विभागात कार्यरत शिक्षकांच्या तीन संवर्गातील ११ पदोन्नत्या सोमवारी समुपदेशनाने पार पडल्या.

बीड : येथील जिल्हा परिषद अंतर्गत शिक्षण विभागात कार्यरत शिक्षकांच्या तीन संवर्गातील ११ पदोन्नत्या सोमवारी समुपदेशनाने पार पडल्या. सेवा ज्येष्ठता सूचीनुसार मुख्याध्यापक (अराजपत्रित) पदासाठी १० , शिक्षण विस्तार अधिकारी श्रेणी-२ साठी १५ तर शिक्षण विस्तार अधिकारी श्रेणी- ३ साठी ३५ जणांना बोलावले होते. या तीन संवर्गातून रिक्त ११ पदांवर अंतिम निवड करावयाची होती.

सोमवारी मुख्य कार्यकारी अधिकारी अमोल येडगे, शिक्षण सभापती राजेसाहेब देशमुख, उपमुख्य कार्यकारी अधिकारी धन्वंतकुमार माळी, मुख्य वित्त व लेखाधिकारी सुरेश केंद्रे, शिक्षणाधिकारी भगवानराव सोनवणे आदी यावेळी उपस्थित होते.

मुख्याध्यापक पदासाठी शाळा कोणती उपलब्ध आहे, याची माहिती देऊन समुपदेशन करण्यात आले. तर शिक्षण विस्तार अधिकाऱ्यांसाठी कोणता तालुका उपलब्ध याबाबत समुपदेशन करण्यात आले.त्यानंतर सेवा ज्येष्ठतेनुसार खुल्या संवर्गातील ७ कनिष्ठ शिक्षण विस्तार अधिकारी, ३ ज्येष्ठ शिक्षण विस्तार अधिकारी आणि १ अराजपत्रित मुख्याध्यापकांना पदोन्नती देण्यात आली.उपलब्ध जागांची माहिती देऊन समुदेशन करण्यात आले. सुरळीत व सुलभपणे ही प्रक्रिया पार पडल्याचे शिक्षणाधिकारी भगवानराव सोनवणे यांनी सांगितले.

आधीच्या गैरप्रकारामुळे ज्येष्ठांवर अन्यायशिक्षकांच्या पदोन्नतीची प्रक्रिया जरी पार पडली असलीतरी जवळपास १२ जण तोतया कारभारी असल्याची माहिती पुढे आली आहे. त्यामुळे श्रेणी ३ मधील पाच शिक्षकांना पदोन्नतीपासून वंचित रहावे लागले आहे.तत्कालीन मुख्य कार्यकारी अधिकारी राजीव जावळेकर यांच्या कार्यकाळात पदोन्नतीचे आदेश देण्यात आले होते. विशेष म्हणजे हे शिक्षक सर्व शिक्षा अभियानासाठी घेण्यात आले होते. सेवा ज्येष्ठता सूची तसेच पदोन्नती समिती नसताना पदोन्नत्या देण्यात आल्या होत्या. दरम्यान ही बाब नियमबाह्य असल्याचे लक्षात येताच हे आदेश आपण दिलेले नाहीत व तसे असेल तर परत घेतो असे तत्कालीन मुख्य कार्यकारी अधिकाºयांनी स्पष्ट केले. तर दुसरीकडे सर्व शिक्षासाठी नियुक्त संबंधित शिक्षकांना परत शाळेवर पाठविण्याबाबत शासन निर्णय असताना शिक्षण विभागाचे दुर्लक्ष झाले. याच कालावधीत इतर काही शिक्षकांना विस्तार अधिकारी तर काहींना ज्येष्ठता यादीत नसताना प्राथमिक पदवीधर म्हणून नियमबाह्य पदोन्नत्या देण्यात आल्या होत्या. शिक्षण विभागातून आदेश प्राप्त करत हे १२ शिक्षक नियमबाह्यपणे अद्यापही काम करत असल्याचे सूत्रांनी सांगितले. त्यांनी असे आदेश कसे व कोठून मिळाले, याचा शोध घेण्याची गरज आहे. नियमबाह्यपणे शासनाचे लाभ त्यांनी उचलल्याची माहिती पुढे येत असून चौकशीची गरज असल्याचा सूर ऐकायला मिळत आहे.

यांच्याकडील आदेशाबाबत संशय५ मुख्याध्यापक : धारूर तालुक्यातील गावंदरा येथील आश्रुबा तिडके, चाटगाव येथील अर्जुन मुंडे, धारूर कन्या शाळेतील गंगाधर शिंदे, चारदरी येथील दत्ता घोळवे आणि घागरवाडा येथील रामहरी गांधले४ केंद्रप्रमुख : आसरडोह येथील व्यंकट गडदे, राधाकृष्ण कांबळे, सय्यद हकीम, कोकणे३ प्राथमिक पदवीधर : गेवराई तालुक्यातील रामपुरी केंद्रातील चोपड्याची वाडी येथील रघुनाथ मचले, याच तालुक्यातील रेवकी केंद्रांतर्गत हिंगणगावचे एस. बी. बिरकले तसेच प्रा. शाळा महार टाकळी घटक शाळा उमापूर केंद्रातील विजय देठे.जिल्हा परिषद प्रशासन या १२ जणांच्या आदेश व कागदपत्रांची तपासणी करणार काय? याकडे सर्वसामान्यांचे लक्ष लागले आहे.

टॅग्स :BeedबीडTeachers Recruitmentशिक्षकभरतीMarathwadaमराठवाडा