शहरं
Join us  
Trending Stories
1
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
2
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
3
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
4
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
5
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
6
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
7
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
8
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
9
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
10
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
11
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
12
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
13
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
14
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
15
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
16
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
17
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
18
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
19
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
20
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
Daily Top 2Weekly Top 5

सरकारी डॉक्टरांना खाजगी सराव अंगलट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 3, 2019 23:45 IST

सरकारी रुग्णालयात रजा टाकून खाजगी सराव जोमात करणाऱ्या गेवराई उपजिल्हा रुग्णालयातील दोन वैद्यकीय अधिकाऱ्यांना जिल्हा शल्य चिकित्सकांनी नोटीस बजावली आहे.

ठळक मुद्देआजारी असल्याचे सांगून रजा : खाजगी रुग्णालयाची नोंदणीही होणार रद्द; सीएसने मागविला खुलासा

बीड : सरकारी रुग्णालयात रजा टाकून खाजगी सराव जोमात करणाऱ्या गेवराई उपजिल्हा रुग्णालयातील दोन वैद्यकीय अधिकाऱ्यांना जिल्हा शल्य चिकित्सकांनी नोटीस बजावली आहे. विशेष म्हणजे तीन दिवसात खुलासा न केल्यास खाजगी रुग्णालयाची नोंदणीही रद्द केली जाणार आहे. ‘लोकमत’ने ३० आॅगस्ट रोजी वृत्त प्रकाशित करुन निदर्शनास आणले.सरकारी रुग्णालयातील काही ठराविक डॉक्टर कामचुकारपणा करण्यासह सेवेत हलगर्जी करीत असल्याचे वारंवार समोर येत आहे. वेळेवर व तत्पर सेवा मिळत नसल्याने सर्वसामान्य रुग्ण खाजगी रुग्णालयाची पायरी चढतात. गलेलठ्ठ पगार असतानाही सरकारी डॉक्टर खाजगी सराव जोरात करुन लाखोंची कमाई करत असल्याचे समोर आले आहे. हाच धागा पकडून जिल्हा शल्य चिकित्सक डॉ.अशोक थोरात यांनी सर्व वैद्यकीय अधिकाºयांकडून खुलासा मागविला आहे. त्यातच गेवराई उपजिल्हा रुग्णालयातील आणखी प्रकरण समोर आले. वैद्यकीय अधीक्षक डॉ.राजेश शिंदे यांनी दोन डॉक्टर अनेक महिन्यांपासून रजेवर आहेत. परंतु ते खाजगी रुग्णालयात सराव करीत असल्याचे डॉ.थोरात यांना सांगितले. त्यांनी तात्काळ दखल घेत या दोन्ही डॉक्टरांना नोटीस बजावली आहे. वेळीच खुलासा सादर करुन कर्तव्यावर हजर राहण्याबाबत आदेशित केले आहे. तसेच खुलासा समाधानकारक न आल्यास त्या दोघांच्याही संबंधित खाजगी रुग्णालयांची नोंदणी रद्द करण्याबाबत कारवाई प्रस्तावित केली आहे.रुग्णांची पळवापळवी करणारेही डॉक्टरचसरकारी रुग्णालयात कार्यरत असताना आणि येथे मोफत उपचार करण्यास टाळाटाळ करुन काही डॉक्टर रुग्णांची पळवापळवी करतात. जिल्हा रुग्णालयात काही महिन्यांपूर्वी असे प्रकार मोठ्या प्रमाणात समोर आले होते. मात्र, सद्यस्थितीत याला काही प्रमाणात आळा बसला आहे.‘लोकमत’ने प्रकार आणला निदर्शनास‘सरकारी रुग्णालयात रजा टाकून खाजगी सराव’ या मथळ्याखाली ३० आॅगस्ट रोजी वृत्त प्रकाशित केले होते. तसेच इतर डॉक्टरही सरकारी रुग्णालयात कार्यरत असताना खाजगी सराव केला जात असल्याचे ‘लोकमत’ ने समोर वारंवार निदर्शनास आणून दिले आहे. गंभीर दखल घेत जिल्हा शल्य चिकित्सकांनी सर्वच डॉक्टरांना नोटीस बजावत खुलासा मागविला आहे.

टॅग्स :BeedबीडBeed civil hospitalजिल्हा रुग्णालय बीडdoctorडॉक्टर