शहरं
Join us  
Trending Stories
1
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
2
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
3
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
4
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
5
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
6
Latest Marathi News LIVE: मुंबई विमानतळावर लागली आग, टर्मिनल १ मधून धुराचे लोट; सर्व गेट केले बंद
7
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
8
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
9
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
10
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
11
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
12
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
13
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
14
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
15
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
16
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
17
Fashion On Bike: बाईकवर लॉन्ग राईडचा प्लॅन आहे? फॉलो करा 'या' फॅशन टिप्स; दिसाल कूल आणि डॅशिंग!
18
“मला माफ कर, चूक झाली”; प्रेमासाठी तरुणाचा हायव्होल्टेज ड्रामा; कॉलेजच्या भिंतींवर लावले पोस्टर्स
19
सुरक्षित होर्मुझ पार केले...१५,४०० मेट्रिक टन LPG गॅस भरलेले 'ग्रीन आशा' जहाज भारतात दाखल
20
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
Daily Top 2Weekly Top 5

कामासाठी रायगडहून गेवराईला; वय फक्त १९, पोटात जुळे बाळ अन् रस्त्यातच संपले आयुष्य

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 9, 2025 20:06 IST

परतीचा मार्ग ठरला मृत्यूचा; पोटात जुळे बाळ अन् कामासाठी रायगडहून गेवराईला; १९ वर्षीय गर्भवतीचे रस्त्यातच संपले आयुष्य

बीड : वय अवघे १९ आणि पोटात दोन बाळ. अचानक पोटात दुखायला लागल्याने गेवराई उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले. तेथून बीडला रेफर केले. परंतु, जिल्हा रुग्णालयात येण्यापूर्वीच गर्भवतीचा रस्त्यातच मृत्यू झाला. ही घटना सोमवारी दुपारी घडली. आरोग्य विभागाने याची नोंद घेतली असून, याचे अन्वेषण केले जाणार असल्याचे सांगण्यात आले. दरम्यान, गर्भवती ही कामासाठी रायगड जिल्ह्यातून गेवराई तालुक्यात दीड महिन्यापूर्वी आल्याची प्राथमिक माहिती आहे.

गौरी हिरामन भोवी (वय १९, रा. खोपोली, जि. रायगड) असे मयत गर्भवतीचे नाव आहे. ती पती व इतर काही लोकांसह कामाच्या शोधात गेवराई तालुक्यातील सुरळेगाव, गुळज येथे आली होती. साधारण दीड महिन्यापासून ती गेवराईत आली होती. ती पहिल्यांदाच गर्भवती होती. तिची प्राथमिक तोंडी माहिती घेतली असता जुळे मुले असल्याचे सांगण्यात आले होते. ३६ आठवड्यांचा गर्भ झाल्यानंतर ५ मे रोजी सकाळी तिच्या पोटात अचानक दुखायला सुरूवात झाली. त्यानंतर नातेवाईकांनी तातडीने तिला गेवराई उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले. तेथून प्रथमोपचार करून तिला जिल्हा रुग्णालयात रेफर केले. परंतु, रस्त्यातच तिचा मृत्यू झाला. बीडमध्ये आल्यावर डॉक्टरांनी तपासून गौरी यांना मयत घोषित केले. त्यानंतर तिचे शवविच्छेदन करण्यात आले.

बीपी वाढला, झटकेही आलेगौरीने बीड जिल्ह्यात आल्यानंतर कोठेही सोनोग्राफी अथवा इतर आरोग्य तपासणी केली नसल्याचा अहवाल आरोग्य विभागाला आला आहे. परंतु, सोमवारी तिला रुग्णालयात दाखल केल्यावर तिचा बीपी वाढला होता, शिवाय पायावर सुज आणि झटकेही येत होते. यातच तिचा मृत्यू झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे. आता मातामृत्यू अन्वेषण समितीकडून याची चौकशी होणार आहे.

रस्त्यातच गर्भवतीचा मृत्यूगेवराईहून बीड जिल्हा रुग्णालयात रेफर केल्यानंतर रस्त्यातच एका गर्भवतीचा मृत्यू झाला, हे खरे आहे. या मृत्यूचे अन्वेषण केले जाणार आहे.- डॉ.सचिन शेकडे, जिल्हा माता व बालसंगोपन अधिकारी बीड.

टॅग्स :pregnant womanगर्भवती महिलाBeedबीड