शहरं
Join us  
Trending Stories
1
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
4
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
5
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
6
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
7
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
8
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
9
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
10
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
11
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
12
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
13
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
14
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
15
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
16
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
17
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
18
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
19
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
20
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
Daily Top 2Weekly Top 5

प्रधानमंत्री योजनेतील घरांना जप्त वाळू देणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 27, 2019 00:44 IST

गेवराई तालुक्यातील राजापूर येथील सातभाई देवस्थानाच्या जमिनीवरील गट नंबर ७१ व ३९ मधील वाळू साठ्यावर बुधवारी कारवाई करत २५०० पेक्षाअधिक ब्रास वाळू जप्त केला होता. जिल्हाधिकारी आस्तिकुमार पाण्डेय यांनी ही सर्व वाळू बीड जिल्हाधिकारी कार्यालय परिसरात व गेवराई येथील शासकीय विश्रामगृहात ठेवण्यात आली आहे.

ठळक मुद्देआस्तिककुमार पाण्डेय : जिल्हाधिकारी कार्यालय परिसर वाळूमय

बीड : गेवराई तालुक्यातील राजापूर येथील सातभाई देवस्थानाच्या जमिनीवरील गट नंबर ७१ व ३९ मधील वाळू साठ्यावर बुधवारी कारवाई करत २५०० पेक्षाअधिक ब्रास वाळू जप्त केला होता. जिल्हाधिकारी आस्तिकुमार पाण्डेय यांनी ही सर्व वाळू बीडजिल्हाधिकारी कार्यालय परिसरात व गेवराई येथील शासकीय विश्रामगृहात ठेवण्यात आली आहे. या कारवाईनंतर जिल्ह्यातील माफियांच्या पायाखालची वाळू सरकली आहे. जप्त केलेली सर्व वाळू प्रधानमंत्री आवास योजनेसाठी देण्याचा निर्णय जिल्हाधिकारी आस्तिककुमार पाण्डेय यांनी घेतला.गेवराई तालुक्यातील राजापूरप्रमाणेच जिल्ह्यातील इतर ठिकाणी देखील अशा साठ्यांवर कारवाई करण्यात येणार आहे. गोदावरी नदीपात्राला लागून असलेल्या ज्या परिसरात वाळूचे साठे केलेले आहेत. त्यांची माहिती प्रशासनाकडून घेतली जात आहे. तसेच जिल्ह्यातील सर्व वाळू माफियांवर एमपीडीए अंतर्गंत कारवाई करण्यात येणार आहे. अवैध वाहतूक कारणारे हायवा, टिप्पर, ट्रॅक्टरची माहिती गोपनीयरित्या जमा करुन ३ महिन्यानंतर सर्व वाहनांवर कारवाई करुन गुन्हा दाखल करण्यात येणार आहे. जप्त केलेली ही सर्व वाळू ज्या कुटुंबाला प्रधानमंत्री आवास योजनेतील घरकुल लागू झाले आहे, त्यांना दिली जाणार आहे.ग्रामीण भागातील घरकुलांना मिळेल चालना४जिल्हापरिषद व इतर शासकीय योजनेच्या माध्यमातून ज्या कुटुंबाला घरकुल योजनेचा लाभ देण्यात आला आहे. त्यांना ही जप्त केलेली वाळू देण्यात येणार आहे, यामुळे जिल्ह्यातील सर्व घरकुल योजनेला चालना मिळणार असून सामान्य नागरिकांना जिल्हाधिकाऱ्यांच्या या निर्णयामुळे दिलासा मिळेल.अधिकाऱ्यांवर होणार कारवाई४पोलीस व महसूल विभागातील ज्या अधिकारी कर्मचाºयाचे वाळू माफियांसोबत संबंध आहेत, त्यांच्यावर कारवाई करण्यात येणार असून त्यांना त्यांच्या मुळ पदावरुन हटवून इतर ठिकाणी पदभार दिला जाणार आहे. अधिकाºयांचे संबंध जर उघडकीस आले तर निलंबित केले जाणार आहेत.

टॅग्स :Beedबीडcollectorजिल्हाधिकारीsandवाळूPradhan Mantri Awas Yojanaप्रधानमंत्री आवास योजना