शहरं
Join us  
Trending Stories
1
अमरावती-अकोला महामार्गावर भीषण अपघात; चहा पिऊन परतणाऱ्या ४ तरुणांचा जागीच मृत्यू
2
Gold Silver Price Today: सोनं-चांदी झाली स्वस्त... लग्नसराईच्या कालावधीत खरेदीची वाट पाहत असाल तर पाहा काय आहेत नवे दर?
3
वडील आणि मुलांचं अपहरण, पण वाटेत गाडीचा भीषण अपघात, तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू, तर...
4
घाटकोपरमध्ये मराठी तरुणाला मारहाण; शौचालय वापरल्याचा राग, मनसे धडकताच गुजराती व्यावसायिक गायब
5
बारामतीत सुनेत्रा पवारांविरुद्ध ५५ अर्ज; काँग्रेसच्या आकाश मोरेंचाही अर्ज दाखल, हाकेंची माघार
6
ट्रम्प यांची एक धमकी अन् जागतिक बाजारात भूकंप! तेलाचा भडका, सोन्यानंही दीड लाखांचा टप्पा गाठला; भारताचं टेन्शन वाढलं
7
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
8
Home Cleaning Schedule: पाहुणे कधीही येऊ दे, तुमचं घर असेल नेहमी रेडी; फॉलो करा 'हे' साधे क्लीनिंग शेड्युल!
9
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
10
Stock Markets Today: Sensex मध्ये ७५० अंकांची मोठी घसरण, निफ्टी २०० अंकांनी घसरला; ऑटो-रियल्टी इंडेक्स १-१ टक्क्यांनी घसरले
11
‘भळाभळा रक्त वाहत होते, पण तो…’ ट्रम्प यांनी सांगितली इराणमध्ये अडकलेल्या ‘त्या’ सैनिकाच्या शौर्याची कहाणी  
12
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपडेट? पटापट चेक करा
13
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
14
'आमच्या बाई आम्हाला परत द्या', विद्यार्थ्यांचा टाहो; जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनासमोर चिमुरड्यांचा ठिय्या
15
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
16
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
17
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
18
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
19
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
20
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
Daily Top 2Weekly Top 5

पॉवरग्रीड मधील कर्मचाऱ्याचा विजेच्या धक्क्याने मृत्यू; संतप्त नातेवाईकांनी शवविच्छेदन रोखले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 11, 2020 14:44 IST

दुर्घटनेसाठी पॉवरग्रीडचा हलगर्जीपणा कारणीभूत असून काम सुरु असताना विद्युत पुरवठा कोणी सुरु केला याचा शोध घेण्यात येऊन दोषींवर गुन्हा दाखल करण्यात यावा अशी मागणी नातेवाईकांनी केली आहे.

ठळक मुद्दे परवानगी घेऊन बंद केलेला विद्युत प्रवाह अचानक सुरु झालाविजेचा जोरदार झटका बसला आणि कर्मचाऱ्याचा जागीच मृत्यू झाला.

अंबाजोगाई : येथून जवळच असलेल्या शेपवाडी पॉवरग्रीड मधील कर्मचाऱ्याचा विजेच्या तीव्र झटक्याने जागीच मृत्यू झाल्याची घटना गुरुवारी (दि.१०) दुपारी पावणेदोन वाजता घडली. परवानगी घेऊन बंद केलेला विद्युत प्रवाह अचानक सुरु केल्यानेच हा अपघात झाल्याचा आरोप मृत कर्मचाऱ्याच्या नातेवाईकांनी केला आहे. यासाठी जबाबदार व्यक्तीवर गुन्हा दाखल करण्यात यावा या मागणीसाठी संतप्त नातेवाईकांनी मृतदेहाचे शवविच्छेदन रोखले आहे.

राजपाल आनंदराव गरड (वय ३५, रा. रानमसले, ता. सोलापूर) असे त्या मृत कर्मचाऱ्याचे नाव आहे. राजपाल हे पावरग्रीडमध्ये तंत्रज्ञ म्हणून काम करत. गुरुवारी दुपारी एका तांत्रिक बिघाडानंतर त्यांनी परवानगी घेऊन विद्युत पुरवठा बंद केला आणि दुरुस्तीचे काम सुरु केले. या दरम्यान पुन्हा अचानक विद्युत प्रवाह सुरु झाल्याने त्यांना विजेचा जोरदार झटका बसला आणि त्यांचा जागीच मृत्यू झाला. घटनेची माहिती मिळताच गरड यांच्या नातेवाईकांनी अंबाजोगाईकडे धाव घेतली. राजपाल यांच्या अपघाती मृत्यूबद्दल त्यांनी संशय व्यक्त केला आहे. मयत तंत्रज्ञ राजपाल गरड यांच्या पश्चात आई, वडील, पत्नी, दोन मुले असा परिवार आहे. 

नातेवाईकांनी शवविच्छेदन रोखले :दरम्यान, या दुर्घटनेसाठी पॉवरग्रीडचा हलगर्जीपणा कारणीभूत असून काम सुरु असताना विद्युत पुरवठा कोणी सुरु केला याचा शोध घेण्यात येऊन दोषींवर गुन्हा दाखल करण्यात यावा अशी मागणी नातेवाईकांनी केली आहे. राजपाल यांच्यावर पाच जणांचे कुटुंब अवलंबून होते. त्यांच्या मृत्यूनंतर हे कुटुंब उघड्यावर आले आहे. त्यामुळे कुटुंबातील एका व्यक्तीला पॉवरग्रीडमध्ये नोकरी देण्याची लिखित शाश्वती द्यावी तोपर्यंत शवविच्छेदन करू देणार नसल्याची भूमिका नातेवाईकांनी घेतली आहे.

अधिकाऱ्यांचा बोलण्यास नकार :या दुर्घटनेबाबत माहिती घेण्यासाठी शेपवाडी पॉवरग्रीडचे डीजीएम निलेश ठाकरे यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी कुठलीही प्रतिक्रिया अथवा देण्यास नकार दिला. एकंदरीतच वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या चुप्पीमुळे या दुर्घटनेबाबतचा संशय वाढत आहे.

टॅग्स :Deathमृत्यूBeedबीडelectricityवीज