शहरं
Join us  
Trending Stories
1
राहुल गांधींना नोबेल मिळण्यासाठी मोर्चेंबांधणी? काँग्रेसने केली मारिया मचाडो यांच्याशी तुलना
2
"बोलायचं स्वदेशीचं आणि घडी वापरायची विदेशी"; CM योगी आदित्यनाथांनी खासदार रवि किशन यांना भरसभेत सुनावले
3
E20 पेट्रोलबाबतचा संभ्रम संपला! बाजारात कोणत्या पेट्रोलमध्ये इथेनॉल आहे आणि कोणत्या नाही...
4
झाड नाही, 'काळजाचा तुकडा' तोडला! २० वर्षे जपलेल्या वृक्षासाठी आजींचा आक्रोश; व्हिडीओ पाहून तुमच्याही डोळ्यात पाणी येईल
5
राज ठाकरेंचा वरदहस्त दूर अन् वैभव खेडेकरांचे ग्रहच फिरले? भाजप प्रवेश रखडला, आता दुसरीकडे...
6
“हंबरडा मोर्चापूर्वी उद्धव ठाकरेंनी एकदा आरशात पाहावे”; CM देवेंद्र फडणवीस यांची बोचरी टीका
7
अनिल अंबानी ग्रुपच्या CFO ला अटक; बनावट बँक हमी प्रकरणात ED ची मोठी कारवाई
8
ग्रामीण भारताचा विकास करणारे राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांची पुण्यतिथि; त्यांच्या कार्याचा आढावा!
9
Premanand Maharaj: प्रेमानंद महाराजांची प्रकृती स्थिर, पण दुसऱ्यांची किडनी घेण्यासाठी नकार; कारण... 
10
मित्रासोबत बाहेर फिरायला मेडिकलची विद्यार्थीनी गेली, लैंगिक अत्याचाराचा आरोप; रुग्णालयात उपचार सुरू
11
तिसऱ्या भिडूमुळे आघाडीत धुसफुस? काँग्रेसचा ‘त्या’ मतांवर डोळा, तर उद्धवसेनेची मोठी पंचाईत!
12
तालिबानी परराष्ट्रमंत्री मुत्ताकीच्या पत्रकार परिषदेत महिला पत्रकारांना No Entry; विरोधक आक्रमक, प्रियांका गांधींचा PM मोदींवर निशाणा
13
मंत्री बाबासाहेब पाटलांनी केलेल्या विधानावर अजित पवारांची पहिली प्रतिक्रिया; थेट फटकारले, म्हणाले,..
14
अफगाणिस्तानच्या परराष्ट्रमंत्र्यांच्या पत्रकार परिषदेत महिला पत्रकारांना प्रवेश नाही; परराष्ट्र मंत्रालयाची पहिली प्रतिक्रिया
15
"एअर इंडियाच्या बोइंग 787 विमानांची उड्डाणं रोखावीत"; भारतीय पायलट संघाचं सरकारला पत्र; केल्या तीन मागण्या
16
चेन्नई विमानतळावर मोठी दुर्घटना टळली; इंडिगो विमानाच्या कॉकपीटच्या काचेला तडा, सर्व ७६ प्रवासी सुखरूप
17
नोबेल पुरस्कार हुकला, ट्रम्प यांनी चीनवर राग काढला? चिनी वस्तूंवर १०० टक्के अतिरिक्त टॅरिफ
18
“लोकशाही वाचवण्यासाठी तुम्हीही पुढाकार घ्या”; राऊतांचे CM फडणवीसांना आवाहन, प्रकरण काय?
19
IND vs WI : अंपायरनं विकेट किपरची चूक झाकली? RUN OUT झाल्यामुळं यशस्वी जैस्वालचं द्विशतक हुकलं (VIDEO)
20
नोबेल हुकले तरी ट्रम्प यांचा तोरा कायम; म्हणाले, “लाखो लोकांचे जीव वाचवल्याचा जास्त आनंद”

सत्तेच्या चाव्या आघाडीकडेच !

By admin | Updated: February 24, 2017 00:28 IST

बीड जिल्हा परिषदेत कुठल्याचा पक्षाला स्पष्ट बहुमत मिळाले नाही. राष्ट्रवादी काँग्रेस २५ जागांसह सत्तेच्या काठावर आहे.

प्रताप नलावडे बीडजिल्हा परिषदेत कुठल्याचा पक्षाला स्पष्ट बहुमत मिळाले नाही. राष्ट्रवादी काँग्रेस २५ जागांसह सत्तेच्या काठावर आहे. त्यामुळे काकू- नाना आघाडीच्या तीन उमेदवारांची भूमिका महत्त्वपूर्ण ठरणर आहे. काँग्रेसने ‘घड्याळ’ हातावर बांधलेच तर सत्तेचे ‘चहापान’ करण्यासाठी आघाडीच्या कपबशीचा आधार राकॉला घ्यावा लागणार आहे.पाच वर्षांपूर्वी राष्ट्रवादी काँग्रेसने जि. प. मध्ये वर्चस्व मिळवले होते. मध्यंतरी झालेल्या राजकीय उलथापालथीनंतर राकाँचे संख्याबळ घटले. अडीच वर्षांपूर्वी राकाँ व भाजपकडे समान संख्याबळ झाले. अखेर चिठ्ठीवर अध्यक्ष व उपाध्यक्षांची निवड झाली. यामध्ये नशीबाचा कौल राकाँ-काँग्रेसच्या बाजूने राहिला. राकाँच्या ताब्यातील जिल्हा परिषद खेचण्यासाठी पालकमंत्री पंकजा मुंडे यांनी प्रतिष्ठा पणाला लावली होती. स्व. गोपीनाथ मुंडे यांच्यानंतर पहिल्यांदाच होत असलेल्या या निवडणुकीला विशेष महत्त्व प्राप्त झाले होते. या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसने काँग्रेससोबत सोयीनुसार आघाडी केली. इतर ठिकाणी काँग्रेस स्वबळावर लढले. दुसरीकडे सेना-भाजपनेही स्वतंत्र लढणे पसंत केले. त्यामुळे सर्वत्र तिरंगी - चौरंगी लढती झाल्या. बीडमध्ये आ. जयदत्त क्षीरसागर यांना पुतणे संदीप क्षीरसागर यांनी काकू-नाना आघाडीच्या माध्यमातून कडवे आव्हान निर्माण केले, तर गेवराईमध्ये माजी मंत्री बदामराव पंडित यांनी ऐन निवडणुकीच्या तोंडावर राकाँतून बाहेर पडत ‘धनुष्यबाण’ हाती घेतला. या साऱ्या राजकीय घडामोडींचा परिणाम म्हणून कुठल्याच एका पक्षाला स्पष्ट बहुमत मिळालेले नाही. राष्ट्रवादी काँग्रेसने २५ जागा जिंकून सर्वाधिक संख्याबळ प्राप्त केले. मात्र, त्यांना सत्ता स्थापनेसाठी आवश्यक असलेला ३१ हा जादूई आकडा गाठता आला नाही. दुसरीकडे राज्यात व केंद्रामध्ये सत्तेत असलेल्या भाजपला १९ जागांवर समाधान मानावे लागले. सेनेने गतवर्षीच्या तुलनेत दुप्पट (४) जागा पटकावल्या आहेत. माजी मंत्री बदामराव पंडित यांनी गेवराईमध्ये आपला करिष्मा दाखवून शिवसेनेच्या खात्यात या चार जागा जमा केल्या. बीडमध्ये काकू-नाना विकास आघाडीने पालिकेतील घोडदौड कायम ठेवताना तालुक्यामध्ये तीन ठिकाणी विजयाचा गुलाल लावला. आघाडीचे दोन उमेदवार अल्पशा मतांनी पराभूत झाले. विधानसभा निवडणुकीतील पराभवापासून सुरू झालेली आ. विनायक मेटे यांची पराभवाची मालिका जि. प., पं. स. निवडणुकीत खंडित झाली. शिवसंग्राम प्रणित भारतीय संग्राम परिषदेने बीड तालुक्यात ३ व केज तालुक्यात १ अशा एकूण ४ जागा पटकावत ‘शिट्टी’चा आवाज केला. शिरूर कासार व आष्टी येथे २ अपक्षांनी बाजी मारून जिल्हा परिषद गाठली. सध्या राष्ट्रवादी काँग्रेस सत्ता स्थापनेच्या जवळ पोहचली आहे. मात्र, त्यांना इतरांच्या मदतीशिवाय सत्तेपर्यंत पोहचता येणार नाही. राकाँमध्ये बंडखोरी करून स्वतंत्र चूल मांडणाऱ्या संदीप क्षीरसागर यांच्या भूमिकेला महत्त्व प्राप्त झाले आहे.