अंबाजोगाई तालुका व शहर शिवसेनेच्या वतीने
मोफत आरोग्य तपासणी,नेत्र तपासणी व अल्प दरात चष्मा वाटप शिबिराच्या उद्घाटन प्रसंगी ते बोलत होते.
शिवसेनाप्रमुख स्व. बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त
अंबाजोगाई तालुका व शहर शिवसेनेच्या वतीने याही वर्षी दि.२२फेब्रुवारी ते १ मार्च दरम्यान मोफत आरोग्य तपासणी,नेत्र तपासणी व अल्प दरात चष्मा वाटप शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. या वेळी व्यासपीठावर कार्यक्रमांचे अध्यक्ष संजय लोणीकर, डॉ .नितीन धर्मराव, अभिजित जोंधळे, तालुका प्रमुख अर्जुन वाघमारे, शिवाजी कुलकर्णी, शहर प्रमुख गजानन मुडेगावकर आदींची उपस्थिती होती.
यावेळी बोलताना अभिजीत जोंधळे यांनी या उपक्रमाचे कौतुक करताना शहरातील उपेक्षीत पर्यटन क्षेत्राला चालना देण्यासाठी पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांच्यासोबत चर्चा झाली आहे. शिवसेनेने हिंदुत्वा बरोबर आरोग्य क्षेत्रातही मोठ काम केले असल्याचे आवर्जून सांगितले.
छ्त्रपती शिवाजी महाराज व शिवसेना प्रमुख स्व.बाळासाहेब ठाकरे यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.
कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी वर्धमान ढोले, विशाल कुलकर्णी यांनी परिश्रम घेतले. या वेळी १५०ज णांच्या तपासण्या झाल्या.