शहरं
Join us  
Trending Stories
1
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
2
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
3
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
4
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
5
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
6
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
7
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
8
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
9
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
10
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
11
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
12
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
13
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
14
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
15
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
16
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
17
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
18
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
19
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
20
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
Daily Top 2Weekly Top 5

‘राजकारणाचे जोडे गडाबाहेर असावेत’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 28, 2019 00:45 IST

राजकारणाचे जोडे गडाच्या बाहेर असले पाहिजेत अशी शिकवण आमच्या संस्काराची आहे. असे प्रतिपादन राज्याच्या ग्रामविकास आणि महिला बालविकास मंत्री पंकजा मुंडे यांनी केले.

लोकमत न्यूज नेटवर्कबीड : राजकारणाचे जोडे गडाच्या बाहेर असले पाहिजेत अशी शिकवण आमच्या संस्काराची आहे. कोणत्याही गडावरून आम्ही कधी राजकारण केलं नाही. अहिंसा व प्रेमाची शिकवण संतांनी समाजाला दिली त्याचा आदर्श सर्वांनी घ्यावा असे प्रतिपादन राज्याच्या ग्रामविकास आणि महिला बालविकास मंत्री पंकजा मुंडे यांनी केले. शनिवारी श्रीक्षेत्र नारायणगड तीर्थक्षेत्र येथे आयोजित कार्यक्रमात त्या बोलत होत्या.त्या म्हणाल्या की, महंत शिवाजी महाराज यांच्या साक्षीने गडावर चांगल्या कामाची सुरुवात झाली आहे. मी या गडाची नात आहे, या नात्याने त्यांच्या निमंत्रणावरून मी येथे आले. गडाच्या विकास कामासाठी २५ कोटीचा निधी दिला, यापैकी ३ कोटी निधी नुकताच वर्ग करण्यात आला. रस्त्यासाठी निधी दिला असे असले तरी श्रेयासाठी मी कधीच काम करत नाही. लोकनेते मुंडे साहेबांनी गडासाठी जो शब्द दिला होता तो आपण पाळल्याचे त्या म्हणाल्या.कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी गडाचे महंत शिवाजी महाराज उपस्थित होते. प्रमुख पाहुणे म्हणून खा. डॉ. प्रीतम मुंडे, आ. जयदत्त क्षीरसागर, आ. सुरेश धस, बदामराव पंडित, जि. प. अध्यक्षा सविता गोल्हार, लक्ष्मण महाराज मेंगडे, भाजपचे जिल्हाध्यक्ष रमेश पोकळे, राजेंद्र मस्के, गडाचे विश्वस्त दिलीप गोरे, जिल्हा बॅँकेचे अध्यक्ष आदित्य सारडा आदी यावेळी उपस्थित होते.गट- तट बाजूला ठेवून विकास व्हावाधाकटी पंढरी म्हणून संपूर्ण महाराष्ट्राला ओळख असलेल्या श्री क्षेत्र नारायणगडाच्या विकासासाठी सर्वोतोपरी प्रयत्न चालू आहेत. गट-तट बाजूला ठेवून विकास झाला पाहिजे. कोणी निधी दिला हे महत्वाचे नसून विकास होणे महत्वाचे आहे. अध्यात्मिक वैभव म्हणून नारायणगड जिल्ह्याचे श्रध्दास्थान असल्याचे आ.जयदत्त क्षीरसागर यावेळी म्हणाले.आमच्या जिल्ह्यात येऊन गलिच्छ राजकारणव्यासपीठावरील नेते विविध राजकीय पक्षांशी संबंधित आहेत. पण जिल्हयाच्या विकासासाठी आम्ही सर्वांनी एकत्रित येवून काम केले. पण काहींना हे जमत नाही त्याला काय करणार? आमच्या जिल्हयात येवून गलिच्छ राजकारण करणारांना हा संदेश असल्याचे त्या म्हणाल्या. चांगल्या माणसांना एकत्र आणून जिल्हयाची प्रगती करायची आहे, आपल्या आशीर्वादाची थाप पाठीवर असावी अशी अपेक्षा पालकमंत्री पंकजा मुंडे यांनी या कार्यक्रमात व्यक्त केली.

टॅग्स :Pankaja Mundeपंकजा मुंडेReligious Placesधार्मिक स्थळे