दरवर्षीप्रमाणे यावर्षी देखील ० ते ५ वयोगटातील बालके पोलिओ डोसपासून वंचित राहू नयेत यासाठी आरोग्य विभाग सक्रिय झाला आहे. तालुक्यातील ५ प्राथमिक आरोग्य केंद्र व ४१ उपकेंद्रात व सार्वजनिक ठिकाणी ३१ जानेवारी रोजी बालकांना पोलिओ डोस दिला जाणार आहे. १८ हजार ३३२ बालकांची संख्या असून या पैकी ८५६ बालकांचे स्थलांतर झाले आहे. १७ हजार ४७६ बालकांना हा डोस २३१ बुथवर दिला जाणार असून ४९ सुपरवायझर तर ५६९ आरोग्य अधिकारी व कर्मचारी असे ६३० कर्मचारी कार्यरत असणार आहेत. पालकांनी आपल्या बालकांना पोलिओ डोस दिला असला तरी किंवा आजारी असले तरी बुथवर आणून डोस पाजावा, असे आवाहन तालुका आरोग्य अधिकारी डाॅ. मोरे यांनी केले.
१७ हजार ५०० बालकांना देणार पोलिओ डोस
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 08:24 IST