बीड : एका व्हायरल व्हिडीओने चर्चेत आलेल्या माजलगावच्या पोलीस उपअधीक्षक भाग्यश्री नवटके यांची सोमवारी औरंगाबाद मुख्यालयी बदली करण्यात आली.नवटके यांनी माजलगाव उपविभागात अवैध धंदेवाल्यांवर वचक बसविला होता. मात्र, नवटके बोलत असलेला एक व्हिडीओ चार दिवसांपूर्वी व्हायरल झाल्याने खळबळ उडाली. यात त्यांनी जातीवाचक विधान केल्याची तक्रार बाबूराव पोटभरे यांनी पोलीस अधीक्षकांकडे केली होती.
‘त्या’ पोलीस उपअधीक्षकाची औरंगाबादला बदली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 4, 2018 05:21 IST