शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
2
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
3
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
4
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
5
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
6
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
7
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
8
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
9
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
10
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
11
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
12
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
13
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
14
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
15
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
16
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
17
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
18
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
19
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
20
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
Daily Top 2Weekly Top 5

आष्टी आणि तुळजापूर येथील ‘सैराट’ जोडपी बीड पोलिसांच्या ताब्यात 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 31, 2019 17:12 IST

उस्मानाबादच्या तुळजापूरमधून आणि बीडच्या आष्टी तालुक्यातून पलायन केलेल्या सैराट जोडप्याला ताब्यात घेण्यात आले आहे.

ठळक मुद्दे बीडच्या अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक विभागाची कारवाई

बीड : उस्मानाबादच्या तुळजापूरमधून आणि बीडच्या आष्टी तालुक्यातून पलायन केलेल्या सैराट जोडप्याला ताब्यात घेण्यात आले आहे. त्यांना आष्टी आणि तुळजापूर पोलिसांच्या स्वाधीन केले. ही कारवाई बीडच्या अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक कक्षाने तुळजापूर आणि कर्जतमध्ये केली.

आष्टी तालुक्यातील कडा येथील चैताली (नाव बदललेले) हिला तिच्याच बहिणीचा दिर गणेश लक्ष्मण लोंढे (२२ रा.डिकसळ ता.कर्जत) याने पळवून नेले. ही घटना सप्टेंबर २०१७ रोजी घडली होती. आष्टी पोलिसांना याचा तपास न लागल्याने हे प्रकरण २६ जानेवारी २०१९ रोजी बीडच्या अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक कक्षाकडे आले. कक्षाने अवघ्या चार तीन दिवसांत या प्रकरणाचा छडा लावला. दोघांनाही मिरजगाव येथून ताब्यात घेतले. त्यांना आष्टी पोलिसांच्या स्वाधीन करण्यात आले.

दरम्यान, चैताली व गणेश हे सुरूवातीला पुण्यात राहिले. गणेश हा प्लंबरचे काम करीत होता. मात्र त्यावर त्यांचा खर्च भागला नाही. म्हणून ते मिरजगावला आले होते. हीच माहिती पोलिसांना मिळाली. बातमीदारामार्फत त्यांनी त्याच्या मित्राला गाठले. त्यांच्या माध्यमातून ते या जोडप्यापर्यंत पोहचले. रात्रीच्या वेळी जेवण सुरू असतानाच त्यांनी या जोडप्याला ताब्यात घेतले.

ही कारवाई पोलीस अधीक्षक जी.श्रीधर, अपर पोलीस अधीक्षक वैभव कलुबर्मे यांच्या मार्गदर्शनाखाली पोउपनि भारत माने, सफौ. शिवाजी भारती, प्रताप वाळके, सुरेखा उगले, सिंधू उगले, निलावती खटाणे, मिना घोडके, शेख शमिम, सतीश बहिरवाळ, विकास नेवडे आदींनी केली.

तुळजापुरच्या पीडितेची सुटकाएप्रिल २०१८ रोजी तुळजापुरमध्ये शेजारीच राहणाऱ्या नंदिनीला (नाव बदललेले) महेश तुळशीराम लोंढे (२२) याने पळवून नेले होते. तुळजापूर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद झाला होता. हा गुन्हा बीडच्या एएचटीयू विभागाकडे येताच त्यांनी याचा तपास लावला. तुळजापुरमधूनच नंदिनीची सुटका केली. मात्र महेशने आगोदरच पलायन केले. पीडितेला पोलीस, नातेवाईकांच्या स्वाधीन केले. या गुन्ह्यात महेशच्या आई-वडिलांना अटक केली होती.

टॅग्स :PoliceपोलिसArrestअटकBeedबीड