शहरं
Join us  
Trending Stories
1
'पाकिस्तानचे दोन तुकडे करा, पाकव्याप्त काश्मीर भारतात घ्या', काँग्रेसच्या मुख्यमंत्र्याची PM मोदींकडे मागणी
2
पहलगाम हल्ल्यात हिंदूच टार्गेट! आधी पॅन्ट काढल्या अन् 'खतना' न केलेल्यांचीच हत्या; तपास पथकाकडून मोठा खुलासा
3
अनंत अंबानींकडे रिलायन्स इंडस्ट्रिजच्या एक्झिक्युटिव्ह डायरेक्टरपदाची जबाबदारी, कधीपासून सांभाळणार पदभार?
4
मालेगावमध्ये ईडीचे छापे; जप्त केली बांगलादेशी रोहिंग्यांची बनावट कागदपत्रे आणि दाखले
5
Pahalgam Terror Attack: लष्कराची मोठी कारवाई! आणखी दोन दहशतवाद्यांची घरे स्फोटके लावून पाडली
6
पाकिस्तानच्या नापाक कारवाया थांबत नाहीत, २४ तासांत दुसऱ्यांदा नियंत्रण रेषेवर गोळीबार, भारतीय सैन्याने दिले चोख प्रत्युत्तर
7
"विकी कौशलमुळे 'छावा' चालला असं नाही, तर...", महेश मांजरेकर स्पष्टच बोलले
8
"हे काही टीव्ही शोज नाहीयेत...", अभिनेत्री शिवानी सुर्वेनं प्रसारमाध्यमांना फटकारलं
9
EPFO नं केला मोठा बदल, जॉब बदल्यावर PF ट्रान्सफर करणं होणार सोपं; १.२५ कोटी लोकांना फायदा
10
अक्षय शिंदे प्रकरणी आदेश देऊनही पोलिसांविरोधात गुन्हा दाखल न केल्याने हायकोर्टाचा संताप
11
PPF ची 'ही' ट्रिक अनेकांना माहीत नाही, बनेल १ कोटींचा फंड, वर्षाला मिळू शकतं ७ लाखांपेक्षा अधिक व्याज
12
मोठी बातमी: एल्फिन्स्टन ब्रिज सोमवारपर्यंत बंद होणार नाही; नागरिकांच्या आंदोलनाची थेट मुख्यमंत्र्यांनी घेतली दखल!
13
भारत-पाकमध्ये पाण्यावरून युद्ध होईल? तणाव वाढला; पाकिस्तानात हाहाकार, कारण...
14
भारताकडून पाकिस्तानला पाण्याचा थेंबही मिळणार नाही; केंद्र सरकारनं आखली रणनीती
15
अजित पवार यांचा अधिकाऱ्यांना सज्जड दम; सांगितलेली कामे केली नाहीत, तर पुढच्या बैठकीला..
16
आजचे राशीभविष्य, २६ एप्रिल २०२५: शक्यतो आज आर्थिक देवाण-घेवाण करू नका
17
अखेर पाक म्हणाला, होय, आम्ही दहशतवाद्यांना पोसले; संरक्षणमंत्री ख्वाजा आसिफ यांची कबुली
18
एकही पाकिस्तानी भारतात राहणार नाही याची खात्री करा; शाहांचा सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना फोन
19
पाकिस्तानी नागरिकांवर महाराष्ट्रात वॉच; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे पोलिसांना आदेश
20
राहुल गांधी यांना सर्वोच्च न्यायालयाने फटकारले; "स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल..."

दरोडा टाकून पसार होणाऱ्या टोळीच्या आवळल्या मुसक्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 7, 2019 00:27 IST

दरोडा टाकून जीपमधून पसार होणा-या चार दरोडेखोरांच्या केज पोलिसांनी पाठलाग करून साळेगावजवळ मुसक्या आवळल्या

लोकमत न्यूज नेटवर्ककेज : दरोडा टाकून जीपमधून पसार होणा-या चार दरोडेखोरांच्या केज पोलिसांनी पाठलाग करून साळेगावजवळ मुसक्या आवळल्या. त्यांच्या ताब्यातील जीपसह मोटारसायकल, १६ मोबाईल, नगदी २७ हजार ८९० रुपयांसह दरोडा टाकण्यासाठी वापरलेली कटावणी, तांबी चाकू, स्लॅगर हे साहित्य जप्त केले आहे.अक्षय भानुदास जाधव (औरंगाबाद), संतोष ओंकार गायकवाड (रा. तलवाडा), दीपक बबन गायकवाड (माजलगाव), बबन मोतीराम गायकवाड (रा. लवूळ, माजलगाव) अशी पकडलेल्या दरोडेखोरांची नावे आहेत. माजलगाव येथून गढीमार्गे अंबड येथून चोरलेल्या जीपमधून निघालेल्या चार दरोडेखोरांनी ठिकठिकाणी दरोडे टाकले. मांजरसुंबामार्गे नेकनूर येथे ही पहाटेच्या सुमारास मॉर्निंग वॉकसाठी चाललेल्या काही महिलांच्या गळ्यातील सोन्याचे दागिने ओरबाडून केजकडे जीपमधून पलायन केले. या बाबत माहिती मिळताच केज पोलिसांनी नाकाबंदी केली. मात्र, दरोडेखोरांनी पोलिसांना हुलकावणी देत जीप केज येथील छत्रपती शिवाजी महाराज चौकातून कळंबकडे वळवली. केजपासून पाच किलोमीटर अंतर गेल्यावर त्यांनी जीप तेथेच सोडून व्यायामासाठी आलेल्या एकाची मोटारसायकल घेऊन माजलगावकडे मोर्चा वळविला. याचवेळी केजकडे येताना चारही दरोडेखोरांना बेड्या ठोकल्या. ही कारवाई केज ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक शामकुमार डोंगरे, पोलीस नाईक अशोक नामदास, श्रीराम चेवले, अशोक गवळी, जिवन करवंदे, गायकवाड, शिंदे यांनी केली.सदरील दरोडेखोरांनी गेवराई व नेकनूर पोलीस ठाणेहद्दीत गुन्हे केल्याने केज पोलिसांनी त्यांना नेकनूर पोलिसांच्या स्वाधीन केले आहे.

टॅग्स :DacoityदरोडाArrestअटकCrime Newsगुन्हेगारी