गेवराई : शेतीच्या बांधावर सर्वानुमते रोवलेले लोखंडी व सिमेंट पोल ट्रॅक्टरच्या सहाय्याने उखडून टाकले. याबाबत विचारणा करणाऱ्या एकास दोघांनी बेदम मारहाण करत जिवे मारण्याची धमकी दिली. याप्रकरणी गेवराई पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मन्यारवाडी येथील लक्ष्मण रामप्रसाद यादव यांच्या गेवराई शिवारातील गट नं. ३४९ मधील बांधावर गावातील ज्येष्ठ नागरिकांच्या उपस्थितीत सर्वांच्या संमतीने ५० हजार रुपये खर्च करून हद्द दर्शवणारे लोखंडी पोल रोवले आहेत. या शेताशेजारील आरोपी रामा पांडुरंग डिंगरे व पांडुरंग दगडू डिंगरे यांनी तिसऱ्यांदा १ जून रोजी ट्रॅक्टरच्या सहाय्याने लोखंडी व सिमेंट पोल उखडून टाकले. त्यामुळे रामप्रसाद यादव यांनी माझ्या हद्दीतील पोल का उखडले अशी विचारणा केली असता त्यांना लाथाबुक्क्याने मारहाण करत जिवे मारण्याची धमकी देण्यात आली. याप्रकरणी गेवराई पोलीस ठाण्यात रामप्रसाद यादव यांच्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल करण्यात आला असून तपास पो. ह. खरात करत आहेत.
यापूर्वी दोन वेळा पोल पाडलेली आहे. हे पोल हे माझ्या स्व हद्दीत असून देखील त्यांनी दोनदा हे चुकीचे काम केले आहे. यापूर्वी गावातील लोकांसमक्ष दोरी लावून माझ्या हद्दीत पोल लावले आहेत व त्याचा खर्च मी एकट्याने ५० हजार रुपये खर्च केला आहे. यासंबंधी डिंगरे यांना खूप वेळा समजावून सांगून देखील ते मनुष्यबळाचा वापर करत जाणीवपूर्वक व मुद्दाम त्रास देण्याचे काम करत आहेत. त्रास देऊन मारहाण करत जिवे मारण्याची धमकी देणाऱ्यांवर पोलीस प्रशासनाने योग्य कार्यवाही करुन न्याय द्यावा अशी मागणी शेतकरी रामप्रसाद यादव यांनी केली.
===Photopath===
020621\sakharam shinde_img-20210602-wa0006_14.jpg