शहरं
Join us  
Trending Stories
1
झिपलाईन ऑपरेटर अल्लाहू अकबर का म्हणत होता? पीडीपी, नॅशनल कॉन्फरन्सच्या नेत्यांचा वेगळाच दावा...
2
पहलगाम हल्ल्यानंतर घेतलेल्या भूमिकेवरून काँग्रेसनं मोदींना घेरलं, हे चार प्रश्न उपस्थित करून केली कोंडी
3
तणावपूर्ण परिस्थितीदरम्यान पाकिस्तानकडून सायबर ‘वार’, भारतीय लष्कराची वेबसाईट हॅक करण्याचा प्रयत्न 
4
जिद्दीला सलाम! आई नोट्स बनवून वाचून दाखवायची; अंध मुलाने क्रॅक केली UPSC...
5
गुगलचे सीईओ सुंदर पिचाई यांचा पगार किती? कंपनीने फक्त सुरक्षेवरच खर्च केले ७१ कोटी रुपये
6
आता ते दया-माया दाखवणार नाहीत! शास्त्रींनी युवा शतकवीर वैभव सूर्यंवशीला केलं सावध
7
बाबूरावला कंटाळले परेश रावल, म्हणाले- "हेरा फेरी म्हणजे गळ्याला लागलेला फास..."
8
१ लाखांपेक्षा अधिक गुंतवणूकदार कंगाल झाले; ९२% आपटला हा शेअर, आता विकणंही झालं कठीण
9
१८ वर्षांची तरुणी पडली ५५ वर्षीय व्यक्तीच्या प्रेमात, पुढं घडलं भयंकर, ऐकून पायाखालची जमीन सरकेल
10
बंगळुरूत 'पाकिस्तान जिंदाबाद' म्हणणाऱ्या व्यक्तीला बेदम मारहाण, जागीच मृत्यू; गृहमंत्री म्हणाले...
11
मोठी बातमी: दहशतवादी हल्ल्यातील मृतांच्या कुटुंबीयांना ५० लाखांची मदत; राज्य सरकारचा निर्णय
12
बाजार सपाट पातळीवर बंद; रिलायन्सचा शेअर पुन्हा आला धावून, 'या' सेक्टरवर दबाव
13
ATM मधून वारंवार पैसे काढायची सवय असेल तर ती बदला, नाहीतर १ मे पासून होईल नुकसान
14
अण्वस्त्रांची धमकी देणाऱ्या पाकिस्तानच्या संरक्षण मंत्र्यांचे तोंड भारताने केले बंद; एक्स अकाउंटवर घातली बंदी
15
Viral Video: बिबट्या थेट पोलीस ठाण्यातच आला! पोलिसाने पाहिलं, पण नंतर काय घडलं?
16
इलेक्ट्रिक व्हेईकल घेणाऱ्यांसाठी CM फडणवीसांची मोठी घोषणा; टोलमाफी देण्याचा मंत्रिमंडळ बैठकीत निर्णय
17
...म्हणून मुलाचं नाव बॉबी ठेवलं! किशोरी शहाणेंनी सांगितलं कारण, म्हणाल्या- "मी मराठी, नवरा पंजाबी आणि सासू..."
18
Mumbai Accident: ओव्हरटेक करण्याचा प्रयत्न अंगलट; दुचाकीवर पाठी बसलेल्या तरुणीचा ट्रकखाली चिरडून मृत्यू
19
पाकिस्तानने कुठे लपवलाय अण्वस्त्रांचा साठा? 'या' अहवालाने केली पाकची पोलखोल...
20
Pune: पुण्याच्या विमानतळ परिसरात बिबट्या, सगळ्यांना फुटला घाम; तुम्ही व्हिडीओ बघितला का?

फ्लड झोनमध्येही प्लाॅटिंग; माजलगाव शहराला भूमाफियांचा विळखा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 12, 2020 13:46 IST

या गोरखधंद्यात  भूमाफियांनी शहरालगत असणाऱ्या नदीपात्राशेजारी फ्लल्ड झोनमध्ये प्लॉटिंग पाडणे सुरू केले आहे.

ठळक मुद्देएनए, लेआऊटविना प्लॉटिंग खरेदी विक्रीचे व्यवहार सुरूपाच जणांना तहसीलदारांनी बजावली नोटीस

माजलगाव : माजलगाव शहराचा वाढता विस्तार पाहता शहरालगतच्या जमिनीला भूमाफियांनी विळखा घातला आहे. करोडो रुपयांची उलाढाल होत असलेल्या या व्यवहारात कृषी जमिनींवर अनधिकृत प्लॉटिंग काढून विना एनए लेआउट ग्राहकांना फसवण्याचा गोरखधंदा याठिकाणी जोरात सुरू आहे.

या गोरखधंद्यात  भूमाफियांनी शहरालगत असणाऱ्या नदीपात्राशेजारी फ्लल्ड झोनमध्ये प्लॉटिंग पाडणे सुरू केले आहे.   अशा स्थितीत आकर्षक बॅनरबाजी करून ग्राहकांना भुरळ पाडणाऱ्या भूमाफियांकडून फ्लॉट खरेदी करणाऱ्या ग्राहकांनी आवश्यक ती कागदपत्रे पाहण्याची गरज आहे.विकसित होणाऱ्या माजलगाव शहरातून दोन राष्ट्रीय महामार्ग जात असल्याने याठिकाणी रस्त्यालगत येणाऱ्या जमिनींना करोडोचा भाव आला आहे. त्यामुळे भूमाफियांचा विळखा शहराला घट्ट पकडत चालला आहे. शहरालगत केसापूर येथील  गट क्रमांक १२ मध्ये (पंढरी पार्कनगर) माजलगाव सिंधफणा नदी फ्लड झोन परिसरात, गट क्रमांक २०१ मध्ये (गोविंद यशवंतनगर) कृषीयोग्य जमिनीवर अनधिकृतपणे प्लॉटिंग पाडली जात आहे.

विनालेआउट पाडल्या जात असलेल्या या प्लॉटिंगमध्ये ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी ५०, २० फुटांचे रस्ते, पाणी सुविधा, शाळा-कॉलेजसाठी जागा, एलईडी लाईट इत्यादी आमिषे दाखवली जात आहेत. वास्तविक पाहता सदरील ठिकाणी निवासी व वाणिज्य प्रयोजनासाठी शासनाची कुठलीही परवानगी घेण्यात आली नाही. असाच प्रकार शहरालगत इतर ठिकाणी जोरात सुरू आहे. भूमाफियांनी जमिनी बळकावण्याचा सपाटा सुरू केला आहे. टुली जागा, फ्लड झोन या जागाही शिल्लक ठेवल्या जात नाहीत. विना एनए/लेआऊट  प्लॉट खरेदी करणाऱ्या ग्राहकांना भविष्यात किचकट परिस्थितीचा सामना करावा लागून आर्थिक भुर्दंडही सहन करावा लागणार आहे. त्यामुळे अशा स्थितीत प्लॉट खरेदी करणाऱ्या ग्राहकांनी आवश्यक ती सर्व कागदपत्रे पडताळण्याची गरज आहे. 

पाच जणांना तहसीलदारांनी बजावली नोटीसमाजलगावमध्ये अवैधरीत्या प्लॉटिंग करणाऱ्या पाच जणांना तहसीलदार वैशाली पाटील यांनी नोटीस बजावली आहे. अकृषक परवाना नसताना अनधिकृतपणे त्याचा वापर होत असल्याच्या तक्रारीवरून त्यांना २४ तासांच्या आत खुलासा सादर करण्याचे आदेश आहेत. भागवत हजारे, झहीर खान, विक्रम गिरी, वामन मुंडे आणि सूर्यकांत दराडे या पाच जणांना नोटीस बजावल्याने खळबळ उडाली आहे.

गावांसाठी ग्रामसेवकात स्पर्धामाजलगाव शहरालगत विना एनए, लेआऊट प्लाॅटिंग व्यवसाय मोठ्या प्रमाणावर सुरू असताना येथील महसूल प्रशासन मूग गिळून गप्प आहे. वास्तविक पाहता अनेक ग्रामपंचायतींअंतर्गत येत असलेल्या या प्लाॅटिंगसाठी अनेक सरपंच व ग्रामसेवकांना मोठ्या प्रमाणावर मलिदा मिळू लागला आहे. ही आजूबाजूची गावे घेण्यासाठी ग्रामसेवकांत स्पर्धा सुरू झाली असल्याचे चित्र दिसून येत आहे.

टॅग्स :BeedबीडriverनदीRevenue Departmentमहसूल विभाग