शहरं
Join us  
Trending Stories
1
रिझर्व्ह बँकेचा 100, 200 रुपयांच्या नोटांबद्दल महत्त्वाचा निर्णय, सर्वसामान्यांना मिळणार दिलासा
2
परप्रांतीय प्रियकराच्या मदतीनं पतीचा काढला काटा; हत्येनंतर अपघाताचा रचला बनाव, पण...
3
‘पीओके’मधील दहशतवादी नेटवर्कवर भारत करणार प्रहार; उच्चस्तरीय विचारविनिमय सुरू; ४२ सक्रिय दहशतवादी तळ केंद्राच्या रडारवर
4
आजचे राशीभविष्य, २९ एप्रिल २०२५: सार्वजनिक क्षेत्रात मानहानी होण्याची शक्यता
5
तीन देशांत एकाच वेळी वीज गायब; सर्व काही थांबले; देशभरातील वाहतूक सिग्नलवर परिणाम
6
१६ पाकिस्तानी यूट्युब चॅनेलवर सरकारची बंदी; केंद्रीय गृहमंत्रालयाच्या शिफारशींनुसार बंदी
7
त्यांची जबाबदारी माझ्यावर होती, मी माफी कशी मागू, शब्द नाहीत; मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांनी दिली कबुली
8
नौदलाच्या ताफ्यात येणार फ्रान्सची २६ राफेल विमाने; ६४ हजार कोटींच्या खरेदी करारावर देशांच्या स्वाक्षऱ्या
9
गूढ कायम.. खरं, खोट्याचा होईना उलगडा; डॉ. वळसंगकरांच्या आत्महत्येला दहा दिवस ओलांडले
10
‘म्हाडा’चे ५ हजार घरांचे दिवाळी गिफ्ट; जुन्या इमारतीचाही पुनर्विकास होणार
11
१९ चाळींचा पुनर्विकास एमएमआरडीए करणार; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत महत्त्वपूर्ण निर्णय
12
‘लिव्ह इन’, उत्तराखंड आणि समान नागरी संहिता
13
बुलेट ट्रेन २०२८ अखेरीस मुंबईतून धावणार सुसाट, नवी मुंबई विमानतळ गेम चेंजर ; मुख्यमंत्री फडणवीस
14
मुलांचा ताबा देताना धर्म विचारात घेतला जाऊ शकत नाही : हायकोर्ट
15
कान टोचले, बरे झाले ! केंद्राने विशेष पत्रक काढून माध्यमांना काही मार्गदर्शक सूचना दिल्या
16
पाण्यासाठी भारत-पाक युद्ध पेटण्याची वेळ येऊन ठेपली ?
17
मोठमोठे रस्ते बांधत आहात, इकडे लाेकांचा जीव जाताेय; जखमींवर कॅशलेस उपचारांवरून सर्वाेच्च न्यायालयाने केंद्राला फटकारले
18
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!

प्लास्टिक बंदीला ठेंगा; बीड वगळता इतर पालिका, नगर पंचायतकडून कारवाईस आखडता हात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 27, 2018 00:23 IST

राज्य शासनाने घेतलेल्या प्लास्टिक बंदीच्या निर्णयाला बीड वगळता जिल्ह्यात ठेंगा मिळाला आहे. केवळ बीड नगर पालिकेने कारवाईची मोहिम हाती घेतली आहे. इतर १० नगर पालिका व नगर पंचायतींचे अद्याप खातेच उघडले नसल्याचे समोर आले आहे. पालिका व पंचायतींच्या ‘अर्थ’पूर्ण दुर्लक्षामुळे प्लास्टिकचा सर्रास वापर होत असल्याचे दिसून येते.

बीड : राज्य शासनाने घेतलेल्या प्लास्टिक बंदीच्या निर्णयाला बीड वगळता जिल्ह्यात ठेंगा मिळाला आहे. केवळ बीड नगर पालिकेने कारवाईची मोहिम हाती घेतली आहे. इतर १० नगर पालिका व नगर पंचायतींचे अद्याप खातेच उघडले नसल्याचे समोर आले आहे. पालिका व पंचायतींच्या ‘अर्थ’पूर्ण दुर्लक्षामुळे प्लास्टिकचा सर्रास वापर होत असल्याचे दिसून येते. जिल्हा प्रशासनाकडूनही याचा आढावा घेतला जात नसल्याने त्यांना एक प्रकारे पाठबळच मिळत असल्याचा आरोप होत आहे.

प्लास्टिक बंदीचा निर्णय घेऊन चार दिवसांचा कालावधी उलटला. बीड नगर पालिकेने पहिल्या दिवसापासूनच कारवाईस सुरूवात केली. भाजी मंडई, कारंजा इ. भागांतील दुकानांची झाडाझडती घेतली. पहिल्या दिवशी ११ जणांना ५० रूपये दंड आकारला. दुसऱ्या दिवशी दोघांना ५०० रूपये, तिसºया दिवशी एकाला पाच हजार रूपये तर चौथ्या म्हणजेच मंगळवारी सुभाष रोडवरील एका दुकानाला पाच हजार रूपयांचा दंड वसूल करून शेकडो किलो कॅरीबॅक जप्त केली. मुख्याधिकारी डॉ.धनंजय जावळीकर यांच्या मार्गदर्शनाखाली अभियंता मंगेश भंडारी, जनार्दन वडमारे, सुरेंद्र परदेशी, विजय शेळके, शेख शब्बीर, शेख अजहर यांनी केली.

जिल्ह्यात केवळ बीड नगर पालिकेनेच दुकानांची तपासणी करून कारवाया करण्यास सुरूवात केल्याचे दिसते. अंबाजोगाई, माजलगाव, परळी, गेवराई या शहरांमध्ये सर्रासपणे मोठ मोठी दुकाने प्लास्टिकचा वापर करीत आहेत. असे असले तरी पालिकेकडून अद्याप तपासणीही करण्यात आली नाही. त्यांच्याकडून एकही कारवाई न झाल्याने पालिकाच आता संशयाच्या भोवºयात आहे.जिल्हा प्रशासनाचा कानाडोळाबीड वगळता इतर पालिकांनी एकही कारवाई केली नाही, तरी नगर विकास विभागाकडून त्यांना साधी विचारणाही करण्यात आली नसल्याचे सूत्रांकडून समजते. त्यामुळे प्लास्टिकवर कारवाई न करणाºया पालिका, पंचायतींना प्रशासनच पाठीशी घालत असल्याचे दिसून येते.धारूरमध्ये स्पीकरद्वारे आवाहनधारूरमध्ये अद्याप एकही कारवाई झाली नसली तर प्लास्टिकचा वापर करून नये, असे आवाहन लाऊड स्पीकरद्वारे केले जात आहे. परंतु प्रत्यक्षात याचा प्रभाव फारसा होताना दिसत नाही. सर्वत्र प्लास्टिकचा खुलेआम वापर आहे.

बीड पालिका अव्वलबीड पालिकेकडून रोज दुकानांची झडती घेतली जात आहे. दंड आकारून प्लास्टिकही जप्त केले जात आहे. जिल्ह्यात केवळ बीड पालिकाच सध्या दंड वसूल करण्यात अव्वल असल्याचे दिसते. मुख्याधिकारी डॉ.धनंजय जावळीकर यांच्याकडून रोज कारवाईचा आढावा घेतला जात आहे. तसेच पथकांनाही कडक सुचना दिल्यानेच कारवाया होत असल्याचे दिसते. इतर पालिका, पंचायतींनी बीड पालिकेचा आदर्श घेण्याची गरज आहे.

अंबाजोगाईत दिली समजअंबाजोगाई नगर पालिकेकडून केवळ दुकानदार, व्यापाºयांची केवळ समजूत काढली जात आहे. कारवाई किंवा दंड वसूल करण्यासाठी त्यांच्याकडून आखडता हात घेतला जात आहे. त्यामुळेच प्लास्टिकचा खुलेआम वापर होत आहे. पालिका यावर निर्बंध घालण्यात कुचकामी ठरत आहे. याचाच फायदा घेऊन आजही शहरामध्ये प्लास्टिकचा वापर होताना दिसून येत आहे.

टॅग्स :BeedबीडPlastic banप्लॅस्टिक बंदीMarathwadaमराठवाडा