जिल्ह्याला कोरोना संसर्गाच्या दुसऱ्या लाटेचा मोठा तडाखा बसला होता. दुसरी लाट ओसरत असली तरी तिसऱ्या लाटेचा धोका अद्याप कायम आहे. या पार्श्वभूमीवर जिल्हा प्रशासन उपाययोजना करण्यासाठी जोमाने कामाला लागले आहे. दरम्यान, पालकमंत्री धनंजय मुंडे यांनी १४ ऑगस्ट रोजी जिल्ह्याच्या नियोजनाचा आढावा घेतला. यापूर्वी त्यांनी सर्वांना अँटिजन चाचणी करण्याचे आदेश दिले होते. जिल्हा नियोजन समिती सभागृहात प्रवेशापूर्वी अँटिजन चाचणी करणे बंधनकारक केले होते. पालकमंत्री धनंजय मुंडे यांनी स्वतः सर्वांत आधी अँटिजन चाचणी करून घेतली. यावेळी सर्व आमदार, नियोजन समितीचे सर्व सदस्य, विविध विभागांचे वरिष्ठ अधिकारी अशा एकूण ७५ जणांनी चाचणी केली. सुदैवाने यात सर्वच जण निगेटिव्ह आले. त्यामुळे दिलासा मिळाला आणि बैठक पार पडली.
कोरोनाच्या धास्तीने अँटिजन चाचणीचे 'नियोजन'; पालकमंत्र्यांसह ७५ जण निगेटिव्ह
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 15, 2021 04:35 IST