प्रधानमंत्र्यांच्या नावानेच सुरू असलेल्या सडक योजनेंतर्गत तयार होत असलेल्या रस्त्याचेच काम निकृष्ट होत आहे. यातून बांधकाम विभागाचे अधिकारी व कंत्राटदार प्रधानमंत्र्यांच्याच योजनेला डच्चू देत असल्याचा हा प्रकार दिसून येत आहे. रस्त्यांचा विकास करणे सोडून रस्त्यांचे थातूरमातूर काम करून आपला विकास साधण्याचे काम अधिकारी व कंत्राटदार करीत असल्याचेही गावकरी बोलत आहेत. पंतप्रधान ग्राम सडक योजना अंतर्गत आष्टी पिंपरी केळसांगवी ते धिर्डी रस्त्याचे काम निकृष्ट दर्जाचे झाले आहे. तरी पंधरा दिवसांच्या आत रस्ता दुरुस्त करण्यात यावा, नाही तर ग्रामस्थ उपोषण करण्याच्या तयारीत आहेत. गणेश पडोळे, महादेव बोराडे, सतीश घुले, गणेश घुले, अशोक करडूळे, यदू कडूळे, भानाभाऊ पडोळे व इतर ग्रामस्थांना घेऊन उपोषण करणार असल्याचे भाऊसाहेब घुले यांनी सांगितले.
पिंपरी-केळसांगवी, धिर्डीचा रस्ता दुरुस्त करा, अन्यथा उपोषण - A
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 7, 2021 04:30 IST