रॅकेट सक्रिय
माजलगाव : शहरातील प्रमुख भागातील दुचाकी चोरी होण्याचे प्रमाण वाढले आहे. गाडी चोरी गेल्यानंतर तक्रारी दाखल होतात. एफआयआर दाखल होतो. पोलिसांना चोरांचा माग लागत नसल्याचे चित्र आहे. यामुळे नागरिक त्रस्त झाले आहेत.
कारवाईची मागणी
बीड : सध्या कोरोनामुळे जनजीवन विस्कळीत होत आहे. प्रशासन योग्य निर्णय घेत असले तरी त्याची अंमलबजावणी होत नाही. एकीकडे रुग्णांची संख्या वाढत चालली आहे. हे लोक दुसऱ्यांना अडचणीत आणत आहेत. मास्क न वापरणाऱ्यांवर कारवाईची मागणी होत आहे.
बाजारतळाची दुरवस्था
बीड : तालुक्यातील चौसाळा येथील आठवडी बाजार भरणाऱ्या परिसराची दुरवस्था झाली आहे. यामुळे भाजी विक्रेत्यांना तसेच नागरिकांना त्रास सहन करावा लागतो. मागील अनेक दिवसांपासून बाजारतळाची दुरूस्ती करून सुस्थितीत करण्याची मागणी नागरिकांमधून होत आहे.
चोऱ्यांत वाढ
सिरसाळा : शहरात गेल्या आठवड्यापासून चोऱ्यांचे प्रमाण वाढले आहे. त्यामुळे बसस्थानक परिसरातील नागरिकांमध्ये भीती निर्माण झाली आहे. शहरात गस्त वाढविण्याची मागणी होत आहे.
धारूर घाटात कठडे तात्काळ उभारावे
धारूर : धारूर ते तेलगाव रस्त्यावरील धारूर घाटात दरीच्या बाजूने कठडे उभारावे. कठड्याची उंची रस्त्याच्या बरोबरीने झाल्याने व अनेक ठिकाणी कठडे पडल्याने वाहन चालकांत भीती निर्माण होत आहे. प्रवाशांना घाटातून प्रवास करताना जीव मुठीत घेऊन प्रवास करावा लागत आहे. त्यामुळे तत्काळ या कठड्याची उंची वाढवावी, अशी मागणी नागरिक, वाहनधारकांमधून केली जात आहे.