शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

लोकांनीच अडवला रस्ता; मग कशी जाणार रुग्णवाहिका? तहसिलदारांनी उपस्थित केला प्रश्न

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 1, 2025 07:38 IST

चिखलातून वाट काढत तहसीलदार वैशाली पाटील आल्या वस्तीवर

लोकमत न्यूज नेटवर्क, कडा (जि. बीड): रस्ता नसल्याने प्रसूती झालेल्या बाळंतिणीला उपचारासाठी बाजेवरून एक किलोमीटर अंतरावर नेल्याची घटना आष्टी तालुक्यात घडली होती. यानंतर तहसीलदार वैशाली पाटील यांनी शनिवारी गावात जाऊन चिखलातून वाट काढत लोकांशी संवाद साधला. वस्तीवर जाण्यासाठीचा रस्ता लोकांनी अडवला. मग अशावेळी रुग्णवाहिका कशी जाणार? असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला. ‘लोकमत’च्या वृत्तानंतर प्रशासनाने याची पाहणी केली.

रस्ता आहे हो, पण...

प्रसूती झाल्यानंतर बाळंतिणीला उपचारासाठी बाजेवरून रुग्णालयात नेल्याचा व्हिडिओ शुक्रवारी व्हायरल झाला होता. पण, प्रकरण घडले आहे किंवा कसे? याबाबत तहसीलदार वैशाली पाटील यांनी खात्री केली.

त्यांनी सांगितले की, ही गरोदर महिला ससाणे वस्तीवरील असून, तेथे जाण्याकरिता रस्ता उपलब्ध आहे; परंतु साधारणत: ५०० ते ६०० फूट रस्ता त्यांच्यातीलच लोकांनी अडवलेला असल्यामुळे त्या रस्त्याचे मजबुतीकरण करण्यात आलेले नाही. तिथे मोठ्या प्रमाणात चिखल झालेला आहे. त्या ठिकाणी रुग्णवाहिका जाणे शक्य नव्हते. रस्त्याची मोजणी करून रस्ता करण्याबाबत सूचना दिलेल्या आहेत.

मला विनम्रपणे सांगायचे आहे की, या व्हिडिओमध्ये परिस्थिती व रस्त्याची परिस्थिती यामध्ये तफावत आहे व गावकऱ्यांनी त्याचा खूप मोठ्या प्रमाणात गाजावाजा केलेला आहे. तसेच आजअखेर या कार्यालयाकडे कोणीही रस्त्याची मागणी केलेली नाही.-वैशाली पाटील, तहसीलदार आष्टी

टॅग्स :Beedबीड