शासनाने ३१ डिसेंबरपर्यंत दस्त नोंदणी केल्यास ३ टक्के मुद्रांक शुल्कात सवलत घोषित केलेली आहे. या सवलतीचा जास्तीत जास्त नागरिकांनी लाभ घ्यावा. यासाठी दस्तऐवज नोंदणीची सुविधा जिल्ह्यात सुटीच्या दिवशी म्हणजेच शनिवार २६ डिसेंबर २०२० रोजी सुरू राहणार आहे.
जिल्ह्यातील सर्व दुय्यम निबंधक कार्यालयात खरेदी-विक्री दस्तनोंदणी कामे चालू राहतील. ३१ डिसेंबर २०२० पर्यंत मुद्रांक शुल्कात सूट देण्यात आली असल्याने सध्या प्रत्येक दुय्यम निबंधक कार्यालयात पक्षकारांची गर्दी होत आहे. तथापि पक्षकारांनी येाग्य त्या मुद्रांक शुल्काचे चलन ३१ डिसेंबर २०२० पर्यंत काढून ठेवले असल्यास व दस्तसुध्दा ३१ डिसेंबरपूर्वी निष्पादन (दस्तावर स्वाक्षरी) केल्यास दस्ताची नोंदणी कार्यालयात येऊन पुढील ४ महिने म्हणजे एप्रिल-२०२१ पर्यंत याच दरामध्ये नोंदणी (सूट दिलेल्या) करता येईल. त्यामुळे एकाच वेळी सर्व नागरिकांनी गर्दी न करता ऑनलाईन मुद्रांक शुल्क चलन भरणा करावा व दस्त निष्पादित करावे, असे आवाहन सह जिल्हा निबंधक तथा मुद्रांक जिल्हाधिकारी नढे यांनी केले आहे.