शहरं
Join us  
Trending Stories
1
केदारनाथमध्ये हेलिकॉप्टर कोसळलं; पायलटसह सात जणांचा मृत्यू, महाराष्ट्रातील भाविकांचा समावेश
2
राशीभविष्य, १५ जून २०२५: कामात समाधान लाभेल, आवडत्या व्यक्तीची भेट होईल, प्रवासाचा बेत आखाल !
3
इस्रायलचा इराणवर 'वार'! तेहरानमधील संरक्षण मंत्रालयाची इमारत, अणु मुख्यालय उद्ध्वस्त
4
CET: बीबीए, बीसीए, बीएमएसच्या परीक्षेसाठी सीईटी कक्षाकडून नोंदणी सुरू 
5
"मी एकावेळी ४-४ सिनेमे केले नाही...", दीपिकाच्या ८ तास शिफ्ट मागणीवर काजोलची प्रतिक्रिया
6
Maharashtra Govt: महावितरणची सौरऊर्जेत ३० हजार कोटींची गुंतवणूक!
7
Mumbai Local: तिकीट काढूनच फर्स्ट क्लासमधून प्रवास; नाही तर भरा दंड!
8
Navi Mumbai: नवी मुंबईत पाच आंतरराष्ट्रीय विद्यापीठे येणार
9
Ulhasnagar: धक्कादायक! डॉक्टरांनी मृत घोषित केलेला रुग्ण होता जिवंत
10
Air India: सोने तस्करीप्रकरणी एअर इंडियाच्या कर्मचाऱ्याला अटक
11
Mumbai Accident: लिंक रोड नेमका कोणासाठी बांधला? गोवंडी अपघातानंतर नागरिकांमध्ये संताप
12
Ahmedabad Plane Crash: चौकशीसाठी उच्चस्तरीय समिती स्थापन, मृतांची संख्या २७०
13
Palghar: आधी मृत अर्भकाला पिशवीतून नेऊ दिले, आता आरोग्य विभागाचे एकमेकांकडे बोट
14
अग्रलेख: ‘ती’च्यावर गर्भाशय काढण्याची वेळ का येते?
15
Mumbai Accident: गोवंडीत तीन लहान मुलांसह चौघांना भरधाव डम्परने चिरडले
16
WTC Final: अखेर २७ वर्षांनंतर दक्षिण आफ्रिकेने पुसला चोकर्सचा डाग; ऑस्ट्रेलियाला नमवून कसोटीचा नवा चॅम्पियन
17
विमान अपघातात सापडलेली भगवदगीता, कृष्ण मूर्ती कोणाची? एअर इंडियाची क्रू मेंबर असलेल्या पनवेलच्या लेकीची...
18
इराणच्या आकाशात इस्रायलची विमाने, गॅस रिफायनरीवर हल्ला; डिफेंस सिस्टीम उध्वस्त
19
आयुष्यात कधीच विमानात बसणार नाही; व्हिडीओ रेकॉर्ड करणाऱ्या आर्यनने घेतली धास्ती, पोलीस चौकशीनंतर...
20
अमेरिकेत मोठी घटना! दोन खासदारांवर घरात घुसून गोळीबार; महिला खासदार, पतीचा मृत्यू

वावटळीने मंडप उडाला; २० व-हाडी जखमी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 8, 2019 00:15 IST

विवाह सोहळ्याला अवघ्या काही मिनिटांचा अवधी होता. एवढ्यात मोठी वावटळ आली आणि मंडपात घुसली. यामुळे पूर्ण मंडप उडाला.

कडा : विवाह सोहळ्याला अवघ्या काही मिनिटांचा अवधी होता. एवढ्यात मोठी वावटळ आली आणि मंडपात घुसली. यामुळे पूर्ण मंडप उडाला. लाकडी, लोखंडी अँगल अंगावर पडल्याने २० ते २५ व-हाडी जखमी झाले. ही घटना आष्टी तालुक्यातील आनंदवाडी येथील चौधरी वस्तीवर मंगळवारी दुपारी दोन वाजेच्या सुमारास घडली.आष्टी तालुक्यातील आनंदवाडी येथील चौधरी वस्तीवर मंगळवारी दुपारी चौधरी आणि झांबरे यांचा विवाह सोहळा होता. लग्नाला काही मिनिटांचा अवधी असल्याने आलेले पाहुणे व वºहाडी लग्न मंडपात बसले होते. अचानक दोनच्या सुमारास जोरात वावटळ आली. ती मंडपात घुसल्याने मंडप उडाला आणि सगळी दाणादाण झाली. यातील लाकडी बल्ली अंगावर पडल्याने अनेक वºहाडी जखमी झाले. त्यांना तात्काळ कडा येथील खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले.दरम्यान शुभकार्यात वावटळीने अडथळा आणल्याने व-हाडी मंडळाच्या भोजनाचीही थोड्या फार प्रमाणात गैरसोय झाली होती.जखमींत या व-हाडींचा समावेशछबू मारूती घुले, सुशीला राजेंद्र साके, मथुरा निवृत्ती कर्डिले, नंदाबाई कोंडिबा झांबरे, नवनाथ नामदेव शिंदे, पद्माबाई साके, जनाबाई अंबादास पांडुळे, लहू दशरथ गांगर्डे, वैशाली संदीप गोरे, वैशाली तरटे, रमेश बोडखे, मथुराबाई गांगर्डे, संगीता संजय बोडखे, यमुना बबन झांबरे, शिवानी अंकुश गुंड, अश्विनी शिंदे, रावसाहेब गजघाट आदींचा जखमींत समावेश आहे. या जखमींवर कड्यासह नगर येथील रूग्णालयात उपचार सुरू आहेत.मंडप उडाल्याने लग्न लावले मंदिरातनियोजित ठिकाणी दिलेला मंडप लग्न लागण्याच्या अगोदरच उडाल्याने मोठ्या प्रमाणावर दाणादाण झाली होती. परत लगेच दुरूस्त करणे शक्य नव्हते. त्यामुळे बाजूच्या मंदिरात लग्न सोहळा पार पडला.

टॅग्स :Beedबीडweatherहवामानhospitalहॉस्पिटल