शहरं
Join us  
Trending Stories
1
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
2
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
3
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
4
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
5
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघतंय सामान्यांचं बजेट
6
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
7
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
8
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
9
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
10
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
11
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
12
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
13
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
14
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
15
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
16
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
17
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
18
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
19
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
20
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
Daily Top 2Weekly Top 5

लिफ्ट बंद पडल्याने रुग्णांचा झोळीतून प्रवास; 'स्वाराती' रूग्णालयातील विदारक स्थिती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 7, 2020 19:01 IST

या इमारतीत अतिदक्षता विभाग, मेडीसीन विभागाचे दोन वार्ड व बालरूग्ण कक्ष असे विभाग आहेत.

ठळक मुद्देलिफ्ट दुरूस्तीकडे मात्र रूग्णालय प्रशासनाची डोळेझाक

- अविनाश मुडेगावकर

अंबाजोगाई - येथील स्वामी रामानंद तीर्थ वैद्यकीय महाविद्यालय व रूग्णालयातील अतिदक्षता विभागातील लिफ्ट बंद पडल्यामुळे रूग्णांचा झोळीतून प्रवास सुरू आहे. रूग्णांच्या नातेवाईकांनाच एकत्रित येवून रूग्णाला झोळीतून अनेकदा खालीवर नेण्याची वेळ येते. ही स्थिती सातत्याने निर्माण होवूनही लिफ्ट दुरूस्तीकडे मात्र रूग्णालय प्रशासनाची डोळेझाक होत असून हे रूग्णांना त्रासदायक ठरत आहे. 

अंबाजोगाई येथील स्वामी रामानंद तीर्थ वैद्यकीय महाविद्यालय व रूग्णालय हे सामान्य रूग्णांसाठी आधार केंद्र आहे. रूग्णालयात उपचारासाठी दुरून रूग्ण येतात. अंबाजोगाई रूग्णालयातील अतिदक्षता विभागाच्या इमारतीत दोन लिफ्ट बसविण्यात आल्या आहेत. 10 वर्षांपूर्वी बसविण्यात आलेल्या या लिफ्ट प्रारंभीपासूनच त्रासदायक ठरल्या आहेत.  बसविण्यात आलेल्या लिफ्ट या उच्चप्रतिच्या नसल्याने त्यात सातत्याने बिघाड होतो. वर्षभरात किमान 7 ते 8 महिने या लिफ्ट बंदच स्थितीतच असतात. याचा मोठा फटका रूग्ण व त्यांच्या नातेवाईकांना सहन करावा लागतो. 

विशेष म्हणजे या इमारतीत अतिदक्षता विभाग, मेडीसीन विभागाचे दोन वार्ड व बालरूग्ण कक्ष असे विभाग आहेत. यातील सर्वच रूग्ण एक तर वृद्ध किंवा बालके असतात. लिफ्ट बंद पडल्यास या रूग्णांना एक्सरे, रक्ततपासणी, सोनेग्राफी, सिटीस्कॅन, एम.आर.आय.तपासणी अशा विविध तपासण्यासाठी सातत्याने इतरत्र न्यावे लागते. अशा स्थितीत रूग्णाच्या नातेवाईकाकडे किमान तीन ते चार नातेवाईक त्या रूग्णाला झोळी करून नेण्यासाठी अत्यावश्यक असतात. जिथे माणसांची कमतरता होते. त्या रूग्णाला इतरत्र तपासण्यासाठी न्यायचे म्हटले तर त्या रूग्णाच्या कुटुंबियासमोर मोठा प्रश्‍न निर्माण होतो. रूग्णालयातील चतुर्थश्रेणी कर्मचारी या कामी मदतही करत नाहीत. रूग्णाच्या नातेवाईकांनाच या कामी लोकगोळा करून आपल्या रूग्णासाठी खडपट करावी लागते. हा प्रकार रूग्णालयात सातत्याने सुरू आहे. 

दुरुस्ती अडकली लालफितीत रूग्णायातील लिफ्ट सातत्याने बंद पडते व ती दुरूस्तीसाठी रूग्णालय प्रशासन बांधकाम विभागाकडे पाठपुरावा करते. रूग्णालय प्रशासन व बांधकाम विभाग यांच्या लालफितीच्या कारभारामुळे नाहक त्रास रूग्ण व त्यांच्या  नातेवाईकांना होतो. ही स्थिती वारंवार येवून ही रूग्णालय प्रशासनाचे याकडे दुर्लक्षच आहे. यापुर्वी अनेक डॉक्टरांनी आपल्या वेतनातील पैसो जमा करून लिफ्ट दुरूस्ती केली होती. तरीही शासनाला याचे गांभीर्य नाही. आता ही लिफ्ट नादुरूस्त असल्याचा मोठा फटका रूग्ण निमुठपणे सहन करत आहेत. या संदर्भात रूग्णालयाचे अधिष्ठाता डॉ.शिवाजी सुक्रे यांच्याकडे विचारणा केली असता सदरील बंद पडलेली लिफ्ट दुरूस्तीसाठी बांधकाम विभागाकडे पाठपुरावा सुरू असल्याचे त्यांनी लोकमशी बोलताना सांगितले.

टॅग्स :hospitalहॉस्पिटलBeedबीड