शहरं
Join us  
Trending Stories
1
आंतरराष्ट्रीय सीमेवर संशयित ड्रोन दिसले, अनेक ठिकाणी ब्लॅकआऊट केले; ‘त्या’ ४ तासांत काय घडले?
2
डोनाल्ड ट्रम्प यांचा ‘तो’ दावा फेटाळला; भारताने स्पष्टच सांगितले, “चर्चेत ते मुद्दे नव्हते”
3
“भारत-पाकने युद्धविराम केला नाही, तर व्यापार नाही, आम्ही अण्वस्त्रांचे युद्ध रोखले”: ट्रम्प
4
आयपीएलचं सुधारित वेळापत्रक आलं; कधी, कुठं रंगणार उर्वरीत सामने? A टू Z माहिती
5
Operation Sindoor: 'पाकिस्तानला जर जगायचं असेल, तर...'; PM मोदींनी दिला स्पष्ट मेसेज, जगालाही ठणकावले
6
दहशतवाद्यांचा 'आका' पाकिस्तानला भारताची 'लास्ट वॉर्निंग! वाचा PM मोदींच्या भाषणातील १० मोठे मुद्दे
7
"ऑपरेशन सिंदूर केवळ 'स्थगित' केलंय, संपलेलं नाही"; PM मोदींचा पाकिस्तानला सज्जड दम
8
Nagpur: धक्कादायक! नागपुरात पाण्याने भरलेल्या खड्ड्यात बुडून पाच जणांचा मृत्यू
9
'माता-भगिनींचं कुंकू पुसण्याचा परिणाम आता दहशतवाद्यांना कळलाय', PM मोदींचा पुन्हा इशारा
10
Operation Sindoor Live Updates: इंडिगो कंपनीकडून जम्मू, अमृतसर, चंडीगड, लेह, श्रीनगर आणि राजकोटला जाणारी विमाने रद्द
11
Narendra Modi : "भारत दहशतवादी हल्ल्यांना चोख प्रत्युत्तर देईल, न्यूक्लियर ब्लॅकमेलिंग सहन करणार नाही"
12
Pakistan Nuclear facilities: भारताने पाकिस्तानच्या अण्वस्त्र ठिकाणावर हल्ला केलाय का? एअर मार्शल भारती म्हणाले...
13
'सिंदूर' केवळ नाव नाही, ती एक भावना...; 'या' जिल्ह्यात आतापर्यंत १७ मुलांची नावे ठेवली 'सिंदूर'
14
'ऑपरेशन सिंदूर'मध्ये अदानी समूहाच्या ड्रोन्सचाही वापर, काय आहे स्काय स्ट्रायकर कामीकेज? 
15
"मला माझ्या वडिलांचा अभिमान, देशासाठी बलिदान देणाऱ्या..."; शहीद वडिलांना लेकाचा सलाम
16
Nalasopara: कपडे वाळवण्यासाठी गेला अन्...; नालासोपाऱ्यात बाल्कनीतून पडून तरुणाचा मृत्यू
17
"तुझ्यामुळे विराट कोहलीला रिटायर व्हावं लागलं", ट्रोलर्सच्या निशाण्यावर आली अवनीत कौर
18
पाकिस्तानच्या हल्ल्याने कुटुंब उद्ध्वस्त; १२ वर्षांच्या जुळ्या मुलांचा मृत्यू, वडील ICU मध्ये दाखल
19
Pune: भररस्त्यात १८ वर्षीय तरुणीची हत्या, शेजारीच निघाला आरोपी; तपासातून समोर आलं हत्येचं कारण
20
Operation Sindoor BJP: भाजप देशभर काढणार तिरंगा यात्रा; 'ऑपरेशन सिंदूर'चे यश देशवासीयांना सांगणार

विजयादशमी, बकरी ईद उमेदवारांच्या पथ्यावर

By admin | Updated: October 6, 2014 00:14 IST

बीड : विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत आलेल्या विजयादशमी व बकरी ईद या सणांचा उमेदवारांनी बरोबर फायदा उचलला आहे़ शुभेच्छांसोबत मतासाठी गळ घातला जात आहे़

बीड : विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत आलेल्या विजयादशमी व बकरी ईद या सणांचा उमेदवारांनी बरोबर फायदा उचलला आहे़ शुभेच्छांसोबत मतासाठी गळ घातला जात आहे़ आपणच समाजाचे कसे तारणहार आहोत? हे पटवून देण्याची उमेदवारांत जणू काही स्पर्धाच निर्माण झाली आहे़जिल्ह्यात लोकसभा पोटनिवडणुकीसोबतच विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी मोठ्या वेगात सुरु आहे़ १५ तारखेला होऊ घातलेल्या मतदानाच्या अनुषंगाने उमेदवार जोमाने कामाला लागले आहेत़ आमदार होण्याचे स्वप्न घेऊन आखाड्यात उतरलेल्या पक्षीय तसेच अपक्ष उमेदवारांनी मतदारांशी पोहोचण्यासाठी वेगवेगळे फं डे वापरायला सुरुवात केली आहे़ आरोप- प्रत्यारोपांच्या तोफा डागण्याबरोबरच आश्वासनांचा भडीमार सुरु आहे़ महत्त्वाचे म्हणजे निवडणूक ऐन रंगात आलेली असताना उमेदवारांना जास्तीतजास्त मतदारांपर्यंत पोहोचण्याचे तगडे आव्हान आहे़ विजयादशमी, बकरी ईद या हिंदू- मुस्लिम बांधवांच्या सणोत्सवामुळे उमेदवारांचे काम अगदीच हलके झाले आहे़ दोन्ही समाजाच्या लोकांपर्यंत पोहोचण्याची नामी संधी यानिमित्ताने उमेदवारांना मिळाली़ ही संधी ‘कॅश’ करण्याची सोडतील ते उमेदवार कसले? एऱ्हवी मतदारांकडे ढुंकूनही न पाहणारे नेते आता दारोदार शुभेच्छांचे संदेश देत फिरत आहेत़ सोबतच मतदान करायला विसरु नका? आमूक- आमूक चिन्ह आहे़़ लक्षात ठेवा़़़! अशी कळकळीची विनंतीही उमेदवार करु लागले आहेत़ विजयादशमीचा सण शुक्रवारी झाला तर बकरी ईद हा सण सोमवारी आहे़ विजयादशमीपाठोपाठ बकरी ईदच्या शुभेच्छांची सध्या रेलचेल सुरु आहे़ एक दिवस आधीच बकरी ईदच्या शुभेच्छा देण्यासाठी उमेदवार सरसावल्याचे चित्र आहे़ (प्रतिनिधी)