परळी : विविध सामाजिक व सांस्कृतिक उपक्रमांत सदैव अग्रेसर राहून सामाजिक जाणीव जागृत ठेवणारे संघटन म्हणून परिचित असलेल्या परळी तालुका माहेश्वरी युवा संघटनेची नूतन कार्यकारिणी निवडण्यात आली आहे. अध्यक्षपदी युवा उद्योजक आशिष काबरा, तर सचिवपदी अक्षय भंडारी यांची सर्वानुमते निवड करण्यात आली आहे.
विविध सामाजिक उपक्रमांत अग्रेसर राहून कार्य करण्याचा निर्धार नूतन कार्यकारिणी पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केला आहे. बीड जिल्हा माहेश्वरी युवा संघटनेचे अध्यक्ष पंकज तापडिया, जिल्हा सचिव तपन मोदाणी, परळी तालुका माहेश्वरी युवा संघटनेचे अध्यक्ष सचिन सारडा आदी प्रमुख पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत झालेल्या बैठकीत सर्वानुमते नवीन कार्यकारिणी जाहीर करण्यात आली.
नूतन कार्यकारिणी पुढीलप्रमाणे: अध्यक्ष- आशिष जी काबरा, उपाध्यक्ष- डॉ.महेंद्र जाजू, महेश बजाज, अनुप सारडा, अक्षय लड्डा, सचिव- अक्षय भंडारी, सहसचिव- योगेश सोमानी, कोषाध्यक्ष- सूरज कोठारी, सहकोषाध्यक्ष- सचिन झंवर, संगठनमंत्री- सूरज बियाणी, आरोग्यमंत्री- शरद मानधाने, सांस्कृतिकमंत्री- सुमित नावंदर, प्रसिद्धीप्रमुख- सूरज भंडारी, राहुल भंडारी, क्रीडामंत्री- गोविंद पोरवाल, व्यवसायमंत्री- योगेश मल. परळी तालुका माहेश्वरी युवा संघटनेच्या माध्यमातून आपण जास्तीतजास्त समाजोपयोगी कार्य करून, संघटनेला उंचीवर नेण्याचा प्रयत्न करू, अशी ग्वाही नवनिर्वाचित अध्यक्ष आशिष काबरा यांनी दिली. यावेळी कृष्णा साबू, कृष्णा लाहोटी, अजय भंडारी, पंकज भन्साळी, सुरेश पोरवाल, शैलेश चांडक, शरद भुतडा, पवन बंग, सुशील मुंदडा, सुमित लाहोटी, आशिष मंत्री, रमण भराडिया, अक्षय रांदड आदी उपस्थित होते.