शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
3
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
4
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
5
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
6
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
7
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
8
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
9
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
10
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
11
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
12
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
13
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
14
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
15
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
16
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
17
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
18
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
19
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
20
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
Daily Top 2Weekly Top 5

परळीत २३ लाखांचा गुटखा पकडला, मात्र विक्री सुरूच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 11, 2019 23:50 IST

शुक्रवारी पोलिसांनी येथील गुटखा पुरवठादार व्यापारी ईश्वरप्रसाद लाहोटी यांचा २३ लाख ५० हजार रुपयांचा गुटखा पकडल्याने खळबळ माजली आहे.

ठळक मुद्देपुरवठादार व्यापारी फरार : कारवाई करण्याची सामाजिक कार्यकर्त्यांची मागणी

परळी : शुक्रवारी पोलिसांनी येथील गुटखा पुरवठादार व्यापारी ईश्वरप्रसाद लाहोटी यांचा २३ लाख ५० हजार रुपयांचा गुटखा पकडल्याने खळबळ माजली आहे. रविवारी मात्र शहरात सर्वत्र गुटका विक्री चालूच होती. लाहोटी हा गुन्हा दाखल झाल्यापासून फरार आहे.शहरात अनेक दिवसापासून गुटख्याची बिनधास्त विक्री चालू आहे. शासनाने गुटका विक्रीवर बंदी घातलेली असतानाही गुटख्याचा परळी व ग्रामीण भागात व्यापार सुरुच असून, यात दररोज १० लाख रुपयांची उलाढाल असल्याची माहिती आहे. प्रमुख गुटखा विक्रेते किरकोळ विक्रेत्यांना गुटख्याचा पुरवठा करतात. त्यापैकीच ईश्वरप्रसाद लाहोटी हा एक आहे. लाहोटी हा घरातून गुटखा पुरवठा करीत होता. संभाजीनगर पोलिसांनी त्यास ही विक्री बंद करण्याची सूचना दिली होती. त्यानंतर त्याने परळीतून गुटख्याचा साठा ग्रामीण भागात हलविला होता. टोकवाडी येथून गुटख्याच्या ९२ गोणी ट्रकमधून धमार्पुरीकडे नेताना अंबाजोगाई अपर पोलीस अधीक्षक स्वाती भोर यांच्या पथकाने पकडला.यापूर्वी अनेक गुटखाविक्री करणाऱ्यांविरुद्ध पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल आहेत तर काही गुटखा विक्रते आणखी कारवाईपासून दूरच आहेत. पोलिसांना गुटखा विक्रेत्यांचा मागमूस लागत नाही. त्यामुळे गुटख्याची विक्री जोरात सुरु आहे. शनिवारी तिघांविरुद्ध गुन्हे दाखल झाले असले तरी रविवारी मात्र गुटख्याचा पुरवठा सुरुच होता. अन्न व औषध प्रशासनास गुंगारा देऊन विक्री केली जाते. लाहोटी सारखे आणखी पाच मटका किंग असून त्यांच्यावरही कारवाई करण्याची मागणी सामाजिक कार्यकर्त्यांनी केली आहे.

टॅग्स :BeedबीडBeed policeबीड पोलीसFood and Drug administrationअन्न व औषध प्रशासन विभाग