शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
2
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
3
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
4
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
5
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
6
भोंदू अशोक खरातला मदत करणाऱ्या महसूल अधिकाऱ्यांना घरी जावे लागेल: चंद्रशेखर बावनकुळे
7
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
8
अमली पदार्थ जप्ती प्रकरणात दोघांची अखेर निर्दोष मुक्तता; नियम पालनात सरकारी पक्ष अपयशी
9
पश्चिम रेल्वेच्या ताफ्यात १५ डब्यांच्या २ नवीन लोकल; ३३ टक्के क्षमता वाढणार
10
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
11
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
12
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
13
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
14
Fastest Delivery In IPL 2026 : भारताची नवी स्पीडगन! Ashok Sharma चा १५४.२ kmph वेग, Nortje चा रेकॉर्ड मोडला
15
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
16
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
17
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
18
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
19
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
20
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
Daily Top 2Weekly Top 5

‘दुखणे’ कायम, सूचनांचा पुन्हा ‘डोस’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 29, 2019 23:44 IST

साधारण सहा महिन्यांपूर्वी आरोग्य उपसंचालक डॉ.एकनाथ माले यांनी जिल्हा रूग्णालयाची तपासणी करून हे करा, ते करा अशा सुचना केल्या होत्या. तसेच सुविधांबद्दलही अश्वासन दिले होते.

ठळक मुद्देबीड जिल्हा रूग्णालय : आरोग्य उपसंचालकांकडून प्रत्येक विभागात जाऊन पुन्हा तपासणी

बीड : साधारण सहा महिन्यांपूर्वी आरोग्य उपसंचालक डॉ.एकनाथ माले यांनी जिल्हा रूग्णालयाची तपासणी करून हे करा, ते करा अशा सुचना केल्या होत्या. तसेच सुविधांबद्दलही अश्वासन दिले होते. मात्र, यात कसलीच सुधारणा अद्यापही झालेली दिसली नाही. तोच शुक्रवारी पुन्हा रूग्णालयाची तपासणी करून नव्याने जुन्या प्रश्नांवरच सुचना करण्यात आल्या. कायमस्वरूपी उपाययोजना करण्याबाबत मात्र, आरोग्य विभाग उदासिन असल्याचे यावरून स्पष्ट होत आहे.जिल्हा रूग्णालयातील डॉक्टर, कर्मचारी वेळेवर रूग्णालयात येत नाहीत, आले तर वेळेच्या आत घरी जातात, अ‍ॅप्रन व गळ्यात ओळखपत्र घालत नाहीत, स्टेथोस्कोप वापरत नाहीत, रूग्णांची तपासणी करण्यास टाळाटाळ करतात, वॉर्डमधील ड्रेनेजचा प्रश्न, शौचालयांचा प्रश्न, अपुरे मनुष्यबळ, घाणीचे साम्राज्य आदींबाबत नागरिकांची ओरड होती. याबाबत ‘लोकमत’ने वारंवार वृत्त प्रकाशित करून हा प्रकार निदर्शनास आणलेला आहे.दरम्यान, याच प्रश्नांना अनुसरून उपसंचालक डॉ.माले यांनी जिल्हा रूग्णलायाच्या प्रत्येक विभागात जावून तपासणी केली होती. त्यांना अनेक त्रुटी आढळल्या होत्या. तसेच असुविधा, अस्वच्छतेबद्दल त्यांनी नाराजी व्यक्त करून सुधारण्याच्या सुचना केल्या होत्या. याबाबत अतिरिक्त जिल्हा शल्य चिकित्सक डॉ.सुखदेव राठोड यांना सुचनाही केल्या होत्या. मात्र, सहा महिन्यांनतरही रूग्णालयाची परिस्थिती जैसे थे असल्याचे दिसून येत आहे.शुक्रवारी डॉ.माले यांनी पुन्हा रूग्णालयाची तपासणी केली. नेहमीप्रमाणे त्यांनी त्याच त्या मुद्यांवर अधिकारी, कर्मचाऱ्यांना सुचना केल्या. जुन्या प्रश्नांवर त्यांना विचारणा करताच त्यांनी बोलण्यास नकार दिला.सोबत जिल्हा शल्य चिकित्सक डॉ.अशोक थोरात, अतिरिक्त जिल्हा शल्य चिकित्सक डॉ.सुखदेव राठोड, प्रशासकीय अधिकारी डॉ.ए.आर.हुबेकर, जिल्हा क्षयरोग अधिकारी डॉ.कमलाकर आंधळे, मेट्रन विजया सांगळे आदींची उपस्थिती होती.रुग्णालयात आजही नाक दाबून प्रवेशड्रेनेज, शौचालयांच्या दुरवस्थेमुळे रूग्ण व नातेवाईकांनी नाक दाबून रुग्णालयात प्रवेश करावा लागतो. याबाबत यापुर्वीही अनेकवेळा डॉ.माले यांनी सुधारण्याच्या सुचना केल्या होत्या. मात्र, काहीच झाले नाही. हाच प्रश्न त्यांना विचारला. यावर त्यांनी आपण पाहणी करून सांगतो, असे म्हणत काढता पाय घेतला. उशिरापर्यंत त्यांनी यावर कसलीच प्रतिक्रिया दिली नाही.

टॅग्स :BeedबीडBeed civil hospitalजिल्हा रुग्णालय बीड